Uncategorized

​हर्बल गार्डन

हर्बल गार्डन
                  औदुंबर/उदुंबर/उंबर

श्री दत्तात्रय ह्या देवाला प्रिय असणारा हा पवित्र वृक्ष.हा १०-१६ मी उंच असून गर्द सावळी देतो.ह्याची त्वचा तांबूस धुरकट असते.पाने ७.५-१० सेंमी लांब व भालाकार,व तीक्ष्ण टोक असलेली असतात.तसेच पाने तीन शिंरांनी युक्त असतात.ह्याचे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर गर्द लाल असते.फळ गोल असून २.५-५ सेंमी व्यास असलेले असते.फळे गुच्छात उगवतात.फळात लहान किडे असतात.खोडाचा छेद घेतल्यास पावसाळयात बुंधा व मुळातून पिवळे जल स्त्रवते.
ह्या झाडाचे उपयुक्तांग आहे त्वचा,फळ,क्षीर व रस.ह्याच्या फळाची चव तुरट,गोड असून त्वचा चवीला तुरट असते.हि थंड गुणाची असते व जड आणी रूक्ष असते. हा कफपित्तनाशक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)वेदना युक्त सूज व जखम ह्यात उंबराचा चीक लावतात.
२)वर्ण सुधारायला उंबराच्या पानांचे शृंग लेपासाठी वापरतात.
३)जखम धुवायला व तोंडात उष्णतेचे फोड आल्यास गुळण्या करायला पानांचा काढा उपयोगी आहे.
४)लहान मुलींना जुलाब होत असतील अथवा आव पडत असेल तर आणी आजार साम अवस्थेत नसेल तर उंबराचा चीक साखरे सोबत देतात.
५)जळजळ होत असल्यास उंबराचे पाणी उपयुक्त असते.
६)दात दुःखावर उंबराचा चीक लावतात.

(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर

आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,

म्हापसा गोवा.

संपर्क:९९६०६९९७०४

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

Leave a comment