Uncategorized

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*आजची आरोग्यटीप ०९.०९.२०१७*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*जगण्याची साधी सोपी सूत्रे*

      *एकशे एकावन्न*
 *आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे*

             *भाग तेरा*

      

*सांगेन गोष्टी हिताच्याच चार*

              *भाग नऊ*

ग्रंथकार किती सावध करत आहेत पहा. ते म्हणतात, एकट्याने बाहेर फिरायला जाताना विशेष काळजी घ्यावी. ते म्हणतात, पहाटेचा किंवा रात्रीचा अंधार पडलेला असताना आकाशात ढग जमून आले असताना, भर दुपारी सूर्य तळपत असताना, आवश्यकता भासल्यास मधे कुठे पाणी सुद्धा मिळण्याची शक्यता नाही, अशा रस्त्यावरुन, फार जलद गतीने किंवा  एकदम धीम्या चालीने, शत्रुवृत्ती असलेल्या किंवा अनोळखी व्यक्ती समवेत, किंवा अधार्मिक व्यक्तीबरोबर, एकट्याने जाऊ नये. रुग्णाच्या घरी देखील जाताना सोबतीला बरोबर कोणीतरी न्यावा. 
आजच्या काळात या सूचना किती आवश्यक वाटतात ना ! सकाळी घराबाहेर पडलेली व्यक्ती सायंकाळी सुस्थितीत घरी परतेल, याची खात्री नसलेल्या बेभरवंशी काळात याची काळजी जास्तीच घ्यावी लागेल. अबल  असलेल्या व्यक्तींना जास्त सावध रहावे लागते. (‘अबला’ म्हटलेलं नाही. ज्यांचे ‘बल’ कमी आहे, असे पुरुष देखील ! )
या व्यक्तींना नेहेमीच सोबत कुठुन मिळणार ? अशा वेळी मोबाईल कामास येतो. आपत्कालीन प्रसंगी, मोबाईल बंद असला तरी, बॅटरी संपली असली तरी, कुणाचा नंबर पाठ नसला तरी, एकट्याने, अनोळखी जागी, रात्रीच्या अथवा पहाटेच्या वेळी, सुनसान राहोंपर, एखाद्या रिक्शेतून प्रवास करताना, खोटंखोटं फोनवर बोलायची सवय करून ठेवायला काहीच हरकत नाही. आपण कोण आहोत, कुठे जात आहोत, याचा पत्ता एखाद्या प्रवासी वाहतुक करणाऱ्या चालकाला लागू देऊ नये, याउलट चातुर्याने असे बोलणे करावे की, चालकाला जरासुद्धा शंका येऊ देऊ नये, की आपण घाबरलेलो आहोत. दगाफटक्याची  शंका येईल तेव्हा चुकुनसुद्धा चालकाकडे माझा मोबाईल बंद पडलाय, आपल्या मदतीला कुणीपण येणार नाही,  हे समजू देऊ नका. एवढी समयसूचकता आपल्यात हवीच.
तरुण पिढीला तंत्रज्ञान माहिती आहे, पण समयसूचकता नाही, आणि जुन्या पिढीला अनुभवाने समयसूचकता प्राप्त झाली आहे, पण नवीन तंत्रज्ञान अवगत नाही. 

आपल्यातील ड्राॅ बॅक आपणच शोधून काढले पाहिजेत, कारण ते आपल्यालाच माहिती असतात. स्मार्ट फोन वरील नवीन यंत्रणा जुन्या पिढीने शिकून घेतलीच पाहिजे. त्यातील गुगल मॅप, जीपीआरएस, इमर्जन्सी काॅल करणे, मेसेज टाकणे, या गोष्टी नवीन पिढीकडून शिकून घेतल्या पाहिजेत.    
आपत्कालामधे केवळ एखाद्या व्यक्तीमुळेच प्राणभय असेल असे नाही तर क्षुद्र किटक, वा हिंस्त्र पशु पक्षी, नैसर्गिक आपत्ती यापासून  देखील आपल्याला आपले जीवरक्षण करायचे असते.  
यासाठी एखादे लहानसे शस्त्रदेखील आपल्याबरोबर असावे. अगदी लायटर, खिळा, टाचणीसुद्धा उपयोगी ठरू शकते. फक्त त्यावेळी ते नवीन पिढीला कसे वापरायचे ते सुचले पाहिजे. यासाठी जाणकार मंडळीबरोबर त्यांचा इतिहास जाणून घ्यावा.  मनात त्याची रंगीत तालीमही करून ठेवावी. 
पानीपतच्या लढाईत विश्वासराव हरवल्यानंतर माणसामाणसावरचा विश्वास कमी होत चाललाय. यासाठी आपण सावध रहाणे हे जास्त हिताचे असेल. 
वैद्य सुविनय दामले.

कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021

02362-223423.

०९.०९.२०१७
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a comment