Uncategorized

आजची आरोग्य टीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
आजची आरोग्यटीप
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

शिळे नको, ताजेच हवे !

अन्न ताजे असावे, गरम असावे,  म्हणजेच शिळे नको आणि गार नको. असे आपण सर्वजण शिकलोय. यात तरी मतमतांतरे नसावीत.

अन्नाचा कधीही अपमान करू नये, अन्न हे पूर्ण ब्रह्म असते.

आमच्या घरात शिळे अन्न फुकट जावू नये,  म्हणून ते गारेगार केले जाते, त्यासाठीच विकत घेतला ना फ्रीज….. !

अन्न ताजे असताना ते पूर्ण ब्रह्म, परब्रह्म, ब्रह्मदेव ! पण तेच अन्न शिळे झाले की..
ब्रह्म राक्षस ! मग ते तुम्हाला खाते.

उरलेली भाजी, मळलेली कणीक,  काय काय ठेवले जात नाही फ्रीजमधे ???

अंदाज चुकला तर उरणारच ! चुकुन उरले तर ठीक आहे, पण रोज अन्न उरायला लागले की, चुकतेच ना कुठंतरी काहीतरी !

(उरलं म्हणून फ्रीजमधे ठेवतो, असं सांगणाऱ्या साठी लिहिलंय हे खास !)

पाश्चात्य देशात माझ्या माहितीप्रमाणे स्वयंपाकघरात ( डोमेस्टिक युज ) फ्रीज सहसा वापरला जात नाही. अंडी आणि औषधे टिकवण्यासाठी वापरला जातो, हे खरं आहे.  पण भारतात मात्र चटणी लोणचं पापडदेखील फ्रीजमधे जातात.

निसर्ग चक्राप्रमाणे जे अन्न फुकट जाणारे, नासणारे असते, ते जाऊदेत ! गुणधर्माचा विचार करता ते हीन प्रतीचे होते. मग त्याला टिकवण्याचा अट्टाहास  (की हट्टाहास ) का करावा ?

फ्रीजमधे CFC (क्लोरोफ्लूरोकार्बन) नावाचा वायु तयार होतो, जो हानीकारक आहे, असे आजचे विज्ञान म्हणते, आणि असा वायु रोज घरात तयार होतोय…..
याने म्हणे ओझोनचा थर देखील नष्ट होतोय. मग विषाची परीक्षा का पहावी.?

बरं,  एकदा गार झालेले अन्न परत गरम करू नये, ते गरम असतानाच संपवावे, नाहीतर त्यातील पोषक अंश कमी होतात. फायदा नाही, तोटाच होणार.
पण आमची “सोच” एवढी बदलली आहे की, शिळे आणि गार झालेले अन्न ताजे आणि गरम ” वाटण्यासाठी ” फ्रीजबरोबरच मायक्रोवेव्ह देखील आणला.  एका मिनीटात पाणीपण उकळते.

पाणी 100 डिग्रीला येण्यासाठी काही मिनीटे जावी लागत होती, आता तो वेळ वाचवून काही सेकंदात ( इन्स्टंटली ) पाण्याला उकळी फुटू लागते.

हे जे ” इन्स्टंट” आहे ना ते फार गडबड करणारे आहे.

लवकर वयात येणाऱ्या सैराट गोष्टीचा अंत कसा असतो माहित आहे ना ????

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग  9673938021
27.05.2016
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

One thought on “आजची आरोग्य टीप

Leave a comment