Uncategorized

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*आजची आरोग्यटीप ३१.०८.२०१७*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
       *जगण्याची साधी सोप्पी तत्वे*

         *भाग एकशेबेचाळीस*
      *आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे*

                   *भाग बारा*
     निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? 

                *भाग छत्तीस*

 

                *बाबा सांगतात…*
टीप क्रमांक चुकत होते ते आजपासून दुरूस्त करतोय.

26/8 -137-12-31

27/8-138-12-32

28/8-139-12-33

29/8-140-12-34

30/8-141-12-35

31/8-142-12-36
सांगेन गोष्टी हिताच्याच चार….
निरोगी राहण्यासाठी काय करावे, हे आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहात आहोत.   केवळ औषधे घेणे म्हणजे आरोग्याची प्राप्ती नव्हे. 

तहान लागल्यावर विहिर खणण्यापेक्षा पुढे तहान लागणार आहे, हे आधीच ओळखून, पाण्याचा शोध घेऊन ठेवावा. पाण्याला “जीवन” असा आणखी एक पर्यायवाची शब्द सांगितलेला आहे. जीवन सुखी होण्यासाठी सावध तो सुखी. नाहीतर सुखाच राहाणार. समुद्री चहुकडे पाणी पिण्याला थेंबही नाही. अशी अवस्था होऊ नये, याकरता आधीच विचार करावा, असे आयुर्वेद सांगतो.
याचा अर्थ असा नव्हे की, भविष्यात हाताच्या एखाद्या बोटाला चुकुन, अपघाताने, जखम झाली तर,  “या जखमेचे रूपांतर पुढे कर्करोगात होऊ नये, म्हणून आत्ताच हे चांगले बोट आपण ऑपरेशन करून काढून टाकूया” असे म्हणण्यासारखे आहे. नाही का ? याला “प्रिकाॅशन” असे म्हणता येईल का ? आज व्यवहारात याला “प्रिकाॅशन” असे गोंडस असे नाव दिले जात आहे, आणि भीती उत्पन्न करून नको ती शस्त्रकर्मे जसे गर्भाशय निर्हरण, सिझेरीयन, अपेंडिक्स, थायराॅईड, पित्तखडे, मूतखडे आणि अगदी ह्रदयातील ब्लाॅकदेखील, लगेच इमर्जन्सीच्या नावाखाली, ही शस्त्रकर्मे  केली जात आहेत. हे मी नव्हे तर अमीरखान सारखा सत्यशोधक सत्यमेव जयते मधून सांगतोय. पद्मभूषण डाॅ. बी एम हेगडे देखील आपल्या युट्युब मधील अनेक व्हिडिओ मधून सांगताहेत. हे व्हिडिओ शांतपणे यु ट्युबवर जरूर पहावेत.
मनात भीती कधी उत्पन्न होते ?  जर अभ्यास नसेल तर. जर एखाद्या विषयाचा अभ्यास झालेला असेल तर परीक्षेत नापास होऊ अशी भीती वाटण्याचं काही कारणच नाही. अमुक गोष्ट केल्यावर, ती जाणून घेतल्यावर, तुला भीती वाटण्याचे काही कारणच नाही, याची खात्री पटली की, भीती उत्पन्न होतच नाही, असे विवेकानंद म्हणतात. म्हणजेच अज्ञान हीच सर्वात मोठी भीती आहे. ही अंधश्रद्धा नाही. मी जर आरोग्याच्या नियमांचे योग्य रितीने पालन करत असेन, तर मला भविष्यात काही रोग होईल, अशी भीती वाटण्याचे काही कारणच नाही. 
रोग झाल्यावर काय करावे, हे अभ्यासण्यापेक्षा रोग होऊ नयेत, म्हणून काय काय करावे, हे आयुर्वेदात खूप सखोल सांगितलेले आहे. 
रोग होऊ नये, यासाठी शारीरिक मानसिक सामाजिक आणि  आध्यात्मिक या चारही गोष्टींचा साकल्याने विचार करावा. केवळ दिनचर्या, रात्रीचर्या, ऋतुचर्या, आहार विहार पथ्यापथ्य पालन करणे म्हणजे स्वस्थवृत्त नव्हे, हा शारीरिक अंतर्गत एक भाग झाला. इतर गोष्टी दुर्लक्षून कश्या चालतील ? आपल्याला जर पूर्ण आरोग्य मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असतील, तर सर्व गोष्टींचा विचार आणि अभ्यास करायलाच हवा. म्हणून हा *आयुर्वेदीय हितोपदेश.* 
काही जणांच्या मनात अज्ञानामुळे, अजूनही शंका आहेत, की ” आई बाबा सांगतात”  हे आयुर्वेदाच्या कोणत्या पुस्तकात सांगितले आहे ? 

कृपया आपली जातीयवादी विकृत दृष्टी, निदान आरोग्याच्या क्षेत्रात तरी,  जरा बाजुला ठेवावी. 
जसे अग्निवेश, चरक, सुश्रुत होऊन गेले, तसे त्यानंतरच्या काळात ‘वाग्भट’ हे ग्रंथकार होऊन गेले. नागार्जुन, शारंगधर, काश्यप इ. अनेक ऋषी, आणि त्यांचे शिष्योत्तम, ही आरोग्य रहस्ये काळानुरूप त्यात योग्य ते बदल करीत,  पुढील पिढीला देत गेले.  
गुरूशिष्य संवाद रुपात हे ज्ञानदान करण्याची भारतीय परंपरा जशी भगवद्गीता सांगितली, तशीच गुरूशिष्य संवादरुपी विवेचन या आयुर्वेदीय ग्रंथामधे देखील दिसते. शिष्य प्रश्न विचारतात, आणि गुरू त्या शंकेचे समाधान करतात. अशी ही परंपरा. पण दुर्दैवाने ही गुरुकुल शिक्षण परंपरा बंद पडली आणि महाविद्यालयीन चाकोरीबद्ध शिक्षण सुरू झाले….
 आई आणि बाबा हेच मोठे गुरू आहेत. जीवनाचे सार, चार हिताच्या गोष्टी, तेच अधिकाराने सांगत असतात. गुरुशिष्य परंपरा आई बाबा सांगतात, या नावाखाली सांगण्याचा हा प्रयत्न “वाग्भट” या ग्रंथाधाराने सुरू आहे.
वैद्य सुविनय दामले.

कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021

02362-223423.

३१.०८.२०१७
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s