Uncategorized

आजची आरोग्यटीप 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*आजची आरोग्यटीप २६.०८.२०१७*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
       *जगण्याची साधी सोप्पी तत्वे*

           *भाग एकशेसदतीस*
      *आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे*

                   *भाग बारा*
     निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? 

                *भाग एकतीस*

 

                *बाबा सांगतात…*
देव, गाय, ब्राह्मण, वृद्ध, राजा, आणि  अतिथी यांची यथायोग्य पूजा करावी. याचकाला काही न देता घालवू नये, त्यांचा अवमान करू नये आणि कठोर शब्दानी बोलू नये.
इथे देव म्हणजे केवळ मूर्ती नव्हे ! देवत्व जिथे जिथे दिसेल त्याची पूजा व्हायला हवी. देवत्व म्हणजे चांगले गुण. आणि पूजा म्हणजे हे गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करणे होय.  

देव ही संकल्पना फक्त हिंदू संस्कृती मधेच आहे असे नाही. सुप्रीम पाॅवर जिला गाॅड अल्ला, निसर्ग, नेचर आहे कोणत्याही नावाने ओळखा. तिचे अस्तित्व मान्य करावेच लागते. ज्या शक्तीमुळे निसर्ग चालतो, ती अत्युच्च पातळीवरील एक तत्व म्हणजे हिंदू धर्मनुसार देव. समजून घेण्यासाठी त्याचे तेहेतीस प्रकार केले आहेत. हे विषयांतर होईल.

 चाले हे शरीर, कोणती ही शक्ती, कोण बोलवितो, हरिवीण. हा हरि समजून घ्यायचा असतो. जाणून घ्यायचा असतो. ज्याने जाणला त्याच्या मनातील द्वैत संपते आणि तो आणि मी एकच आहे, ही अनुभुति येते. हाच मोक्ष ! विचार जेवढा करावा तेवढा थोडाच आहे. अध्यात्माचा पसाराच एवढा मोठा आहे, की त्यात आरोग्य म्हणजे पदार्थांनी गच्च भरलेल्या पानातील डाव्या बाजूचे चिमूटभर मीठाप्रमाणे आहे. 
देव ही संकल्पना समजून घेण्यासाठी त्याला सगुण साकार केले. जाणून घ्यायचा आहे तो, निर्गुण निराकार. पण हे जाणून घ्यायच्या शिकवण्याच्या तासाला अॅबसेंट राहिले की, काय शिकवले हे शेवटपर्यंत कधी कळतच नाही. स्वार्थापुरते, पोटापुरते शिकलो, आता बाकी देव हा ऑप्शनचा विषय. मग त्याची टिंगल टवाळी सुरू होते. विनोद निर्मिती सुरू होते. अज्ञानाने श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील तात्विक वाद सुरू होतो. यातूनच आम्हाला मान्य नाही, आम्ही तुमच्यापासून वेगळे. मग आमचा रंग वेगळा आणि झेंडाही वेगळा!!!
देव समजून घ्यायचा असतो, जो प्रत्येकाच्या स्थूल शरीरात सूक्ष्मत्वाने असतो. हे शिकवणारे बाबाच असतात. जर बाबांना हे ज्ञान नसेल तर ज्यांच्याकडे हे ज्ञान आहे, त्याच्याकडून शिकून घ्यावे. भगवान श्रीकृष्णांनी गुणकर्म विभागणी करताना यांना ब्राह्मण म्हटले आहे. इथे ब्राह्मण हा शब्द जातीवाचक नाही तर वर्ण वाचक आणि गुण वाचक आहे. हे पण समजून घ्यावे. जो ब्रह्म जाणतो, तो ब्राह्मण. बा म्हणजे “मोठा” या अर्थीदेखील वापरला जातो. 
 या न्यायाने पैगंबरवासी मा.अब्दुल कलाम हे देखील अगदी उच्चकोटीचे ब्राह्मण होते. त्यांचे विचारधन ऐकले की फक्त ज्ञान ज्ञान आणि विज्ञान. दुसरा भेदाभेदच नाही. जन्माने ब्राह्मण असणाऱ्यांनी हे ज्ञान इतरांना देऊन सर्वांनाच ज्ञानी बनवावे, सूज्ञ बनवावे, ब्रह्म बनवावे. समाजपुरूषाचे काम व्यवस्थित चालण्यासाठी हे चातुर्वर्ण्य आवश्यक आहेत. सोयीस्कर अर्थ काढून जातीभेद वाढवण्याचे काम, काही धूर्त राजकारणी मंडळी करीत आहेत. हे आपण समजून घेऊया. आणि *बा बा* होऊया ! 
वैद्य सुविनय दामले.

कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021

02362-223423.

२६.०८.२०१७
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s