Uncategorized

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*आजची आरोग्यटीप २५.०८.२०१७*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
       *जगण्याची साधी सोप्पी तत्वे*

           *भाग एकशे छत्तीस*
      *आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे*

                   *भाग बारा*
     निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? 

                *भाग तीस*

 

                *बाबा सांगतात…*
किडामुंगीला देखील आपल्याप्रमाणेच कृपादृष्टीने पहावे. 
आत्मा ही संकल्पना समजली की नंतर किडा मुंगी आणि आपण यांच्यात आत्मिक स्तरावर काहीच फरक नाही असे समजेल. आपला जसा जीव आहे, आपल्याला जशी वेदनेची जाणीव आहे, तशीच जाणीव सृष्टीतील यच्चयावत जीवांना आहे. केवळ कीड मुंगी आणि पशुपक्षी यांनाच नाहीतर वनस्पतींना देखील जीव असतो, हे पण जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध करून दाखवलेच आहे.
जे जे देखीजे भूत ते ते मानावे भगवंत असे समर्थ देखील म्हणतात. सर्वाभूती परमेश्वर हे वचन प्रसिद्ध आहे.
एवढे सगळे माहिती असूनही उगाच किडामुंग्यांना का दुखवावे ? 

काहीजणांना झाडांची पाने जातायेता उगाचच तोडत जायची सवय असते. असं उगाचच झाडांची पाने तोडू नयेत. झाडांना दुखवु नये. त्यांच्या जगण्यामधे आपलाही फायदाच असतो. निसर्गाने दिलेल्या या संपत्तीचा आपण युक्तीने वापर करून घेतला पाहिजे. यासाठीच आपल्याकडे विशिष्ट सण विशिष्ट ऋतुमधे सांगितलेले आहेत. वटपौर्णिमा, नारळी पौर्णिमा, दिव्याची अमावस्या, गणेशचतुर्थी, इ. सण हे निसर्गाने दिलेल्या संपत्तीची आपल्याला ओळख व्हावी याकरीताच आहेत. पण आपण या सणामागील वैज्ञानिक जाणीवा विसरून केवळ कर्मकांडे करण्यात धन्यता मानायला लागलो, की बाबांना सांगावेसे वाटते, अरे, गणेशपूजा म्हणजे फक्त गणपतीची पूजा नाही, ती विशिष्ट  आकार दिलेल्या धरणीमातेची पूजा आहे. पृथ्वी तत्वाची उपासना आहे. तिची तशीच जोपासना व्हायला हवी. 
गणेशपूजा करताना गणपती बरोबर उंदीर पण पुजला जातो. साप पण पुजला जातो. यांनाही नैवेद्य दाखवला जातो. हे दोघेही एकमेकांना उपयोगी होणारे जीव आहेत. त्यांच्या जीवनसाखळीमधे आपण येऊ नये. यांची जीवनसाखळी डळमळीत झाली, की ते आपली निवासस्थाने सोडून माणसाच्या घरात आश्रयाला येतात. 
कोकणात या उंदरासाठी एक नैवेद्याचे पान शेतात नेऊन ठेवले जाते.त्याला चोरवा असे म्हणतात. गणेश चतुर्थीच्या दिवसात एक *वाडी* उंदरासाठी देखील काढली जाते. (वाडी हा शब्द कोकणातला आहे. वाडी म्हणजे नैवेद्याचे छोटे पान) त्यातील एक गाईसाठी, एक कावळ्यासाठी, एक अन्य जीवजंतुसाठी वाढली जाते.
हे मूषकराजा,  तू जिथे आहेस, तिथे शेतातच संतुष्ट रहा. तुला जे हवे आहे, ते तुला तिथेच देतो. पण आमच्या घरात येऊन आम्हाला छळू नकोस.! 
भारतीय परंपरेमधे किडामुंगी देखील तेवढीच महत्वाची आहे, जेवढे आपण आहोत, हे सांगणारे आपले भारतीय सण आणि उत्सव वैज्ञानिक, सामाजिक, मानवतावादी दृष्टीने किती उच्च दर्जाचे आहेत, ते कळते.
ही वैज्ञानिक बुद्धी तो बुद्धीदाता आपणा सर्वांना देवो, हीच त्याच्या चरणी प्रार्थना! 

जय गणेश, उंदीर मामा की जय !     
वैद्य सुविनय दामले.

कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021

02362-223423.

२५.०८.२०१७
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s