Uncategorized

​हर्बल गार्डन

हर्बल गार्डन
                      अगस्त्य/हादगा
।। सर्वेश्वराय नम: अगस्तीपत्रं समर्पयामि।।
अगस्त्याचे ७-१० सेंमी उंचीचे अल्पायूषि व लवकर वाढणारा वृक्ष असतो.काण्ड सरळ व विरळ फांद्याचे असते.पाने १५-३० सेंमी लांब असतात  व त्यास ४१-६१ पत्रके असतात.फुल पांढरे,नौकाकार,मंजिरी स्वरूपात असते.फळ ३० सेंमी लांब वाकडे असते व त्यात १५-२०बिया असलेली शेंग असते.
ह्याचे उपयुक्त अंग पंचांग असून हा चवीला कडू,व थंड गुणाचा असतो व गुणाने हल्का व रूक्ष असतो.हा कफपित्तशामक आहे.
चला आता आपण ह्याचे उपयोग पाहुयात:
१)अगस्त्याची त्वचा व पाने जखमेवर लावायला व सुजेवर उपयुक्त आहेत.
२)अगस्त्याच्या पानांची व फुलांची भाजी कृमीमध्ये उपयुक्त अाहे.
३)अगस्त्याचा सालीचा रस हा कफमोकळा करतो म्हणून ह्याचा उपयोग सर्दी,खोकला ह्यात होतो.
४)अगस्त्याच्या फुलांचा उपयोग स्त्रीयांच्या अंगावर पांढरे जाणे ह्या आजारावर होतो.
५)अगस्त्याचे पिकलेले फळ हे मेध्य आहे.

(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,

आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,

म्हापसा गोवा.

संपर्क:९९६०६९९७०४

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s