Uncategorized

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*आजची आरोग्यटीप १२.०८.२०१७*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
       *जगण्याची साधी सोप्पी तत्वे*

             *भाग एकशे तेवीस*
      *आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे*

                   *भाग बारा*
     निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? 

                    *भाग सतरा*
नित्यं हिताहारविहारसेवी 

समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।

दाता समः सत्यपरः क्षमावान

आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
*पंगतीत ढेकर देऊ नये*

*मधेच पंगतीतून उठून जाऊ नये*
“सहनाववतु सहनौ भुनक्तु” या श्लोकाने सुरवात झालेली असताना या सर्वांमधून एकट्यानेच उठून कसे जायचे ? 

असे मधेच उठून जायचे नसते. 

एकतर आपणाला जेवण आवडलेले नाही, अशा प्रकारचा संदेश यजमानांना दिला जातो. नाहीतर आपले काहीतरी चुकले असावे असे यजमानांना वाटते.
खरंतर ढेकर हा वेग आहे. आयुर्वेदात सांगितलेले  आहे, वेगान् न धारयेत. मग आई असं चुकीचं कसं सांगते ? 

चुकीचं मुळीच नाही. 

पंगतीमधे आपण जेव्हा मोठ्याने आवाज करत, विचित्र आवाजात ढेकर देतो, तेव्हा इतरांना ऐकायला थोडे अवघडल्यासारखे वाटते.
पंगतीमधे मधेच उठून जाणे हा यजमानांचा आणि अन्नपूर्णेचा अपमान समजला जातो. जर काही अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी जसे डाॅक्टरना आत्ययिक अवस्थेतील एखाद्या रुग्णाला तपासायला जायचे असते, किंवा एखाद्याला (एक करंगळी) लघुशंका किंवा (दोन नंबरी व्हिक्टरी) बृहतशंका असते तेव्हा, बाजूला बसलेल्याची परवानगी घेऊन उठावे असा अलिखित अघोषित नियम आहे. जो नियम आईला तिच्या आणि त्याच्या आई आणि बाबांनी सांगितलेला असतो. 
पंगत हा प्रकार पूर्णपणे भारतीय. याच धर्तीवर पाश्चात्य देशात जे होते त्याला पार्टी म्हणतात. 
पंगत म्हणजे डिसीप्लीन- शिस्त.

पार्टी म्हणजे धांगडधिंगा. 
पंगत म्हणजे सहभोजन.

पार्टी म्हणजे स्वभोजन.
पंगत म्हणजे बैठक ठोकून जेवावे.

पार्टी म्हणजे उभ्याउभ्यानेच हादडावे.
पंगत म्हणजे शारिरीक मानसिक आणि आध्यात्मिक साजशृंगार

पार्टी म्हणजे सामाजिक दिखाऊपणाचा अधिभार.

 

पंगत म्हणजे हवं तेवढं जेवा.

पार्टी म्हणजे हवंतर जेवा.
पंगत म्हणजे उदबत्यांचा घमघमाट.

पार्टी म्हणजे बाटल्यांचा खणखणाट.
पंगत म्हणजे श्लोक म्हणायची घाई

पार्टी म्हणजे मोठ्या आवाजाची महागाई
पंगत म्हणजे एका रेषेत ताटे वाढलेली

पार्टी म्हणजे रांग लावून अन्न घेतलेली
पंगत म्हणजे ताटाला काढलेली रांगोळी

पार्टी म्हणजे रिकाम्या वाट्यांची रोषणाई
पंगत म्हणजे मिळते पावती तृप्तीची 

पार्टी म्हणजे गोष्ट कोल्हा करकोच्याची

कोल्ह्याला बाटलीतून दिलेल्या खीरीची
पंगत म्हणजे हर हर महादेवा 

पार्टी म्हणजे डान्सचा जलवा
पंगत म्हणजे जय जय रघुवीर समर्थ

पार्टी म्हणजे डीजे नाय तर सगळं व्यर्थ
पंगत म्हणजे निकोप स्पर्धा खाण्याची

पार्टी म्हणजे भीती उपाशी राहाण्याची
पंगत म्हणजे सत्व रजाची आरास

पार्टी म्हणजे रज तमाची नुसती रास
पंगतीमधे यजमानी पाहुण्यांना शोधतात.

तर पार्टीत पाहुणे यजमानांना हुडकतात.
पंगत म्हणजे काय काय सांगू !!!

पार्टी म्हणजे आणखी काय सांगू ???
वैद्य सुविनय दामले.

कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021

02362-223423.

१२.०८.२०१७
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s