Uncategorized

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*आजची आरोग्यटीप ०९.०८.२०१७*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
       *जगण्याची साधी सोप्पी तत्वे*

             *भाग एकशे वीस *
      ~*आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे*~

                   ~*भाग बारा*~
खाली लिहितोय ते आयुर्वेदातील नाही, तर माझ्या मनातील आहे. अशास्त्रीय गोष्टी, शास्त्रीय म्हणून मी फसवतोय, असं काहींना वाटायला नको. म्हणून टायटलवर काट मारली आहे.  
     निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? 

                    *भाग चौदा*
नित्यं हिताहारविहारसेवी 

समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।

दाता समः सत्यपरः क्षमावान

आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
कालच्या आरोग्य टीपेवर फक्त एका गटात प्रचंड टीका झाली. हे सर्व संस्कार काय फक्त आईनेच करायचे का ? केस, पोशाख, स्वच्छंदी वागणे यावर फक्त स्त्रीयांनाच बंधने कशाला ? हा विषय होता. बाकी काही नाही.  पुरूषांनी काहीच करायचे नाही, आणि स्त्रीला वारंवार कमी लेखायचे, तिला पुरूषी दास्यात अडकवून ठेवायचे, तिच्या कमी कपड्यावरून तिची टिंगल टवाळी करायची, तिलाच बंधनात ठेवायचे आणि तिच्यावरच अत्याचार करायचे, मुलीने फक्त घरी लवकर यावे, मुलांना मात्र ही अट नाही,  हीच का भारतीय संस्कृती ?  असा एकंदरीत चर्चेचा रोख होता. नऊवारी साडी नेसायला आवडू शकणाऱ्या दोन तीन जणी आणि धोतर नेसायला आवडणारे एक दोन पुरूष सोडले तर अन्य चर्चाकार, बाॅबकट आवडणारे, टीशर्ट आणि पॅन्ट घालणारे, दुर्दैवाने  स्त्रियांच्या जन्माला आलेले पुरूष होते. हे वेगळे सांगायला नको.

माझी लिहिण्याची शैली ही funny😜😝😜😝 आहे. पण वाचण्याचा रोख😡👹 बदलल्यामुळे गटात मीच funny वाटायला लागलो. क्षणभर वाटले, मी किती पाप करतोय ? कालच्या टीपेमधे जे सांगितले ते म्हणे आयुर्वेदात कुठे लिहिले आहे का ? तुम्ही आमचा आयुर्वेद बदनाम केलात,  इथपर्यंत टीकेचा सूर पोचला.   नंतर लक्षात आले, की मी म्हणे यापूर्वीच्या सर्व टीपामधून फक्त स्त्रीयांनाच दोष देत आलोय. गर्भाशय पिळणारे व्यायाम स्रीयानी करावेत त्याबरोबर प्रोस्टेट पिळणारे व्यायाम पुरूषोत्तमांना करायला मी त्याचवेळी सांगायला हवे होते. माझं हे चुकलंच ! हातापायात घालायचे दागिने फक्त स्त्रीयांनीच का घालावेत, पुरुषांनी देखील घातलेच पाहिजेत. किंवा स्त्रीयांनीच हे सर्व दागिने गुलामगिरीचे जोखड समजून टाकून द्यावेत. पूर्वी आपल्या देव देवता देखील दागिने घालत होत्याच. आता सर्व पुरूषांनी दागिने घालायचे सोडून दिले आहे, हा स्त्रीयांवर होत असलेला अन्यायच आहे. गर्भाशय किंवा स्त्री विशिष्ट शरीर, फक्त स्त्रीयांनाच देणारा देव सुद्धा एक पुरूषच. म्हणून असा भेदभाव करणाऱ्या देवाची मी बाजू घेतो, हे पण माझे चुकलेच.
मासिक पाळीच्या काळात तिला सक्तीची विश्रांती हवी, त्या निमित्ताने तरी तिला विश्रांती मिळेल हे सांगणही चुक. तिने तर आता अश्या अवस्थेत फूटबाॅल, राॅक क्लायबिंग वगैरे करायलाच हवे. त्यासाठी विशिष्ट कंपनीची पॅडस् वापरली की, मुलगी शिकली प्रगती झाली, म्हणणंही चुकलंच माझं.
हे देवा

असा कसा रे तू 

असमतोल निर्माण करणारा.

आणि असमतोलातून सौंदर्य निर्माण करणारा ? 

सर्वानाच पाचच बोटे दिलीस ती तरी एका आकाराची द्यायचीस ना. 

त्यातही विषमता. 
ही सर्व बोटे एकाच आकाराची केल्याने आम्हाला कपड्यांची बटन सुद्धा लावता आली नसती, हा भाग वेगळा  ! 
हे पुरूषोत्तमा,

स्त्री आणि पुरूष ही एका संसार रथाची चाके म्हणवतोस आणि प्रजननाचा अधिकार फक्त स्त्रीयांनाच ! 

आणि प्रसूतीवेदना पुरूषांना कधी भोगायला लावणार आहेस ?

तू पण ना अगदी स्वार्थीच आहेस बघ. ! 
बुद्धीबळ कोणी शोधून काढला मला माहिती नाही.  

देवा, तू तर नाही ना शोधलास ?  

नक्कीच नाही.  

कुणीतरी अल्पमतीच्या मानवाने शोधला असेल.

मग त्यामधे एवढी विषमता का ? 

राजाची चाल निश्चित 

उंट म्हणे तिरपाच चालणार. 

घोडा अडीज घरे उडून जाणार.

हत्ती फक्त नाकासमोर चालणार.

वजीराला फिरायला सर्व कुरण मोकळे 

आणि

प्यादे बिचारे एकच घर पुढे जाणार, त्याला मागे पण फिरता येत नाही. स्वतःच्या संरक्षणासाठी दुसऱ्याला मारायचे ते पण तिरपेच युद्ध करून.  

किती अन्याय हा ? 
ही विषमता, भेदभाव, शक्तींचे वाटप कुणी केले ? ही असमानता हाच खेळ आहे. त्यातच तर खरी गंमत आहे, असे तू कितीही सांगितलेस तरी आम्हाला पटणारच नाही.  
या विषमतेलाच संसार म्हणतात.
हे पुरूषप्रधान संस्कृतीमधल्या रखवालदारानो, 

जरा घरातही लक्ष द्या.

घरातील रांधा वाढा उष्टी काढा करणाऱ्या आपल्या एका चाकाला जरा मदतीचा हात द्या. ती विमानात एअर हाॅस्टेस जरी बनली तरी, तिथेही तिला रांधा वाढा उष्टी काढा, या चाकोरीतच बांधून ठेवले आहात. ! 
तिने कपडे धुतले तर त्याने वाळत घालावेत, एकाने पसरले तर दुसऱ्याने आवरावे.

तिने सारवले तर त्याने तिला सावरावे.

एकमेकांना आधार द्यावा. 
हे कुठेही आयुर्वेदात लिहिलेले नाही. ग्रंथात लिहिलेले नाही, म्हणजे तो आयुर्वेद नाही. 
आयुष्याचा वेद म्हणून आयुर्वेदाच्या इयत्ता पहिली अ पासून आम्ही शिकत आलोय. सद्वृत्त पालन, स्वस्थवृत्त आदि नियमावली आम्ही परीक्षेसाठी पाठ केलेली होती.  
आयुर्वेद शिकताना अनेक ठिकाणी “पुरूष” असा शब्द ग्रंथकारांनी योजला आहे. मग तो लोकपुरूष सिद्धांत असो, वा षड् धात्वात्मक पुरूष असो, किंवा चिकित्स्य पुरूष असो. इथे “स्त्री” असा शब्द का वापरला नाही, असं माझ्याबरोबर भांडून उत्तर मिळणार नाही.

हा वाद कधीच संपणार नाही. कारण असा वाद करण्यातही “फन” आहे.
शेवटी आपल्याला आरोग्य मिळवायचं आहे. जे हरवलेलं आहे. जर वेळीच सावध झालो नाही, आणि खोट्या प्रतिष्ठेपायी निसर्गाने आखून दिलेले नियम जर आपण मोडणार असू तर विनाश ठरलेला आहे.  परंपरागत आजीबाईचा बटवा हरवलेला आहे. आता हा बटवा आजोबांनीही ताब्यात घ्यावा आणि आरोग्य समानता आणावी.

ही देवाजवळ आणि (देवींजवळ सुद्धा ) प्रार्थना! 
वैद्य सुविनय दामले.

कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021

02362-223423.

०९.०८.२०१७
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s