Uncategorized

झटपट व्हाट्स अँप डॉक्टर

‘ *झटपट व्हाट्स अँप डॉक्टर* !’ 
हल्ली मला खूप वाचक एकसारख्या आरोग्यावरील नाही ,,…तर रोगांवरील औषधे किंवा मॅजिक टिप्स प्रकारातील काही पोस्ट फॉरवर्ड करतात आणि विचारतात हे खरे आहे का ?आम्ही करून बघू का? 

त्यातील काही पोस्ट आता मला अक्षरशः इच्छा नसून पाठ झाल्यात. त्या पोस्ट मधील स्वतःला वैद्य अथवा डॉक्टर म्हणवणारे सन्माननीय व्यक्ती शिक्षणाने डॉक्टर अथवा वैद्य नाही आहेत.त्यातील एक व्यक्तीस तर अटक सुद्धा झालेली आहे. ते फोटो व बातमी मी सरळ उत्तर म्हणून वाचकांना पाठवते. वाचकांनी खूप वेळा विनंती केली कि या अशा पोस्ट विषयी काहीतरी लिहा किंवा ‘आम्ही काय करावे ?आम्हाला ते खरे वाटते त्यातले काही कळत नसल्याने कसे वागावे ? विषय नाजूक असल्याने लिहणे टाळत होते परंतु वाचक आणि सामान्य लोक आपल्या आरोग्याशी खेळत असतील तर ते चुकीचेच आहे म्हणून हि पोस्ट थोडक्यात लिहितेय.

आरोग्यावरील लिखाणाला आज सोशल मीडिया वर प्रचंड पेव फुटलंय. दिवसभरात वाचकांवर अश्या पोस्ट्स आणि टिप्स इतका भडीमार होतो कि त्या पोस्ट एकत्र करून छापून ” झटपट व्हाट्स अँप डॉक्टर व्हा !’ असे पुस्तक छापता येईल.

आरोग्यावरील लिखाण हा इतर कुठल्याच विषयावरील पोस्ट्स अथवा फॉरवर्ड जोक्स सारखा वर वर किंवा करून बघू म्हणयासारखा विषय नाही. या विषयावर खूप जबाबदारीने आणि त्या त्या विषयातील जबाबदार व्यक्तीनेच लिहणे गरजेचे आहे. लिखाण करताना मी स्वतःला शिस्तीत काही नियम घालून दिले आहे. 

माझ्या कुठल्याही लेखात तुम्हाला हे औषध घ्या, ह्या रोगावर हा घरगुती उपाय करा.आठ दिवस हे नाकात टाका ,पंधरा दिवस ह्याचा रस काढून प्या अथवा सर्व रोगांवर संजीवनी उपाय , किंवा कान फुटला तर त्याचे तीन थेम्ब टाका असे कुठलेही उल्लेख दिसणार नाही .

माझे लिखाण सामान्य आरोग्य,आयुर्वेदातील आरोग्याच्या संकल्पना,जीवनशैली ज्या वैद्याकडूनच सामान्य लोकांना चांगल्या समजतील आणि आयुर्वेदाच्या संकल्पनांनुसार आहार असे असते.

“घरच्या घरी कार ची सर्विसिन्ग” , “सर्व प्रकारच्या AC च्या बिघाडांवर ५ दिवसात इलाज”, “घरातील मीटर ची स्वतःच करा तपासणी”, “प्लम्बिंग  शिका ४ दिवसात” .

अशा पोस्ट्स येतात का हो कधी फेसबुक किंवा व्हाट्स अँप वर? आल्या तरी आपण त्या फॉलो करू का ?लावू का हात विद्युत उपकरणांना ? नाही ना?

मग खेळायला, करून बघायला आरोग्यच सापडते का? इतके स्वस्त आहे का आपले शरीर आणि त्याचे स्वास्थ्य?

मग आम्ही काय करावे ? 

खरंय ह्या सगळ्या गोंधळात काही पोस्ट्स खरेच इतक्या छान असतात,काही वैद्य लोक खरेच मेहनत घेऊन इतके अप्रतिम लिहतात पण ते वाचकांपर्यंत पोचत नाही. कारण त्या सनसनाटी नसतात ना,मॅजिक टिप्स देणाऱ्या हि नसतात.आम्हाला आश्चर्याने आ देखील वासायला लावत नाही त्या पोस्टस . मनुष्य स्वभाव दुसरे काय?

असो वाचक लोक खाली गोष्टी सहज करू शकतील 

१. पोस्ट च्या लेखक लेखिकेची आणि त्याच्या तिच्या पात्रतेची खात्री आणि विश्वासार्हता 
२.आजार आणि त्यावरील औषधी अशा पोस्ट्स आपल्या वैद्याच्या सल्ल्या शिवाय अजिबात फॉलो न करणे 
३. अशा पोस्टस कृपया ‘लावले बोट केले धपाधप फॉरवर्ड’ असे करून पुढे पाठवणे नक्कीच टाळा. ती लगेच डिलीट करा .कुणाच्यातरी आरोग्याला यातून धोका होऊ शकतो.
४. आयुर्वेदाच्या नावाखाली सांगितल्या जाणाऱ्या अघोरी टिप्स आयुर्वेदाच्या नसतात किंवा कुठलाही सुजाण मेंदू असलेला वैद्य उपचार असे लेखातून सांगत नाही.
५. रोगावर उपचार पदवी घेतलेली ,नोंदणी असलेले डॉक्टर/वैद्य  च करतात हे कायम लक्षात ठेवा. घरी स्वतःवर प्रयोग करून स्वतःचा गिनिपिग करून घेऊन  नंतर आयुर्वेदाला दोष देऊ नका. बाबा बुवा महाराज दादा म्हणजे डॉक्टर किंवा वैद्य का? अति आधुनिक असलेले आपण सुशिक्षित लोक तरीही असे प्रयोग ?
६.जगात जादू नाही ,जादूचे औषध नाही हे कृपया स्वतःला बजावून सांगा आणि कुठल्याही भूल थापा ऑडिओ ,विडिओ, बंडू औषधें यांच्या मागे न लागत  योग्य तद्न्य व्यक्तीचीच मदत घ्या.
७.टिप्स ह्या आजारावर इलाज म्हणून नव्हे तर जीवनशैलीतील बदल म्हणून असतील तरच फॉलो करा . उदाहरणार्थ रोज सकाळी सूर्योदयापूर्वी उठणे, रात्री जेवणानंतर लगेच झोपू नये, दूध निरसे पिऊ नये अशी काही उदाहरणे देता येतील परंतु किडनी स्टोन विरघळवा, गँगरीन बारा करून पाय वाचावा, कॅन्सर मुक्त व्हा प्रकारातील पोस्ट्स निव्वळ फसवणूक असते.
८.संबंधित लेखकाचा लेखिकेचा फोने नंबर असेल तर लगेच फ़ोन करून खात्री करून घेणे आवश्यक असते. 
९. अश्या काही पोस्ट्स आढळल्या आणि त्या चुकीच्या वाटल्या तर निश्चित त्याची माहिती द्या. अशा व्यक्तींविरुद्ध वेगवगेळ्या फळींवर जोरात कार्य सुरु आहे. त्यांची शैक्षणिक पात्रता, पदवी इत्यादी लगेच तपासून त्यापरमाने पुढील कारवाई होते.
१०. सर्वात महत्वाचे तुमचे आरोग्य फुटकळ नाही त्याला तसे समजूही नका. ब्रँडेड कपडे,4G नेट पॅक एवढाच आवश्यक खर्च आणि लक्ष आरोग्यावर हि करा.योग्य तद्न्य व्यक्तीकडून च सल्ला हे वाक्य लक्षात ठेवा.
वरील लेख वैद्य रुपाली पानसे ,दिनांक ६ ऑगस्ट २०१७, यांचा आहे.

वैद्य रुपाली पानसे ,आद्यं आयुर्वेद,पुणे 

rupali.panse@gmail.com

9623448798

लेखिकेचे इतर लिखाण वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा  

drrupalipanse.wordpress.com

(लेख आवडल्यास कृपया लेखिकेच्या नावासकट ,जसाच्या तसा,लिखाणात बदल न करता शेअर करावा. आपल्या या कृतीने काढलेला वेळ आणि वापरलेली बुद्धी सत्कारणी लागेल.)

One thought on “झटपट व्हाट्स अँप डॉक्टर

  1. सुंदर .अतिशय सुंदर लिखाण. अगदी बरोबर आहे आपले म्हणणे. काळाची गरज आहे ही.कुणीही काहीही मार्गदर्शन करत असतात दिवसभर सोशियल मिडीयाच्या माध्यमातून. आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम ज्ञान अवगत असेल तरच आपण आरोग्याच्या संबंधित लिखाण करावे.

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s