GarbhaSanskar

​सुर्यग्रहण,चंद्रग्रहण व गर्भवती भाग २

सुर्यग्रहण,चंद्रग्रहण व गर्भवती भाग २
   चंद्राच्या गुणांचा विचार केला तर शितलता हे प्रमुख गुण आहे..तसेच ग्रंथातही चंद्राच्या प्रकाशातील सिध्दजल वा दुध  शित  गुण य़ुक्त असते असे वर्णन केलेले आहेत..
    ससितंमाहिषं क्षीरं चन्द्रनक्षत्रशीतलम्..!!अ.ह्र ३/३२

तसेच,
 नक्षत्रांचा,सुर्याचा , चंद्राचा तसेच नक्षत्रांचा प्रुथ्वीवरील जलावर परिणाम होतो..
  तप्तं तप्तांशुकिरणै: शीतं शीतांशुरश्मिभि: !

  समन्तादप्यहोरात्रमगस्त्योदयनिर्विषम् !शुचि हंसोदक नाम….!!३/५१
  शरदात दिवसास चोहोॆकडुन सुर्यकिरनांनी संतप्त झाल्यानंतर व रात्री चंद्रकिरनांनी शीत झाल्यामुळे व अगस्ती नक्षत्रांच्या उदयाने विषरहित झाल्यामुळे पाणी निर्मल व शुध्द होते त्यास हंसोदक म्हणतात..
तसेच  
ग्रंथामध्ये बर्याच ठिकाणी भुत ,ग्रह म्हणुऩ वर्णन केले आहे ह्याचा अर्थाचा संशोधन केल्यास असे समजते की ज्या गोष्टीमुळे शरीरावर दुष्टी होते..त्रिदोषांमध्ये बदल निर्माण होतो परंतु ते कारण उघड्या डोऴ्यांनी दिसत नाही त्यास आपन Viral or Bacterial infections म्हणु शकतो जे डोऴ्यांनी दिसत नाही..जसे..काही Infection मुळे मेंदुवर व CSF ( सुषुम्नाजलावर परिनाम होतो) त्यामुळे त्याचा दबाव वाढल्याने रुग्न विचेष्टा व क्रुती करतो..
  हा प्रभाव काही नक्षत्रामध्ये तसाच पौर्णिमा व अमावस्येमध्येही दिसुन आला होतो त्यामुळे ग्रंथकारांनी नक्षत्रावरुन त्या आजाराला नाव दिले…म्हणजेच नक्षत्रांचा मनुष्य शरीरावर परिणाम हा होतो तो विशेषत ..
  तसाच परिणाम हा उन्माद (वेडेपना) व अपस्मार ( Fits येने) ह्या रुग्नावर ही पोर्णिमा व अमावस्येला होतो..
  चंद्र असेल वा नक्षत्र असतील तर त्याच्या अति शितलतेचा हा जलमहाभुतावर परिणाम होतो व तो ताकदीने होतो की त्यात गुरुत्वाकर्षण व आकर्षण दोन्ही दिसुन येते ते काही काळा पुरते जास्त प्रमानात दिसते.
  तसेच सुर्याच्या बाबतीत ही ग्रहणामध्ये ग्रहण लागल्यापासुन वा लागनार असेल त्या काळापासुन सुर्याची किरने ही रोखली जातात व त्यामुळे प्रचंड उष्मा तयार होवुन तो प्रुथ्वी,तेज,जल ,वायु व आकाश ह्या महाभुतांवर प्रखरतेने आकर्षिला जातो
धातु म्हणजेच लोखंड,सोने,चांदी वा प्रुथ्वी महाभुतात्मक द्रव्य व तेज महाभुताला सामावुन घेनारे ..Heat conductor,तसेच जलमहाभुतावर परिणाम करताच त्यामुळे ग्रहण काऴात धातु,शस्र,दागीने झाकुन ठेवावेत असे सांगीतले आहेत..
ग्रहण लागल्यानंतर वातावरनात बदल निर्माण होतो ,साधे सुर्याभोवती ढग जरी जमा झाले तरी वातावरण दमट होते व वायरस व बेक्टिरियांची पैदास होन्यास मदत होते त्यामुळे उपवास वैगेर काही करु नये जेणे करुन आपली प्रतिकारशक्ती कमकुवत होईल त्यामुळे 

ग्रहनापुर्वीच जेवन करुन घ्यावे..
तसेच ग्रहनापुर्वी व नंतर स्नान करावे..आपन बाहेरुन येत असाल वा घरीच असाल तर वातावरनातील फरकाचा शरीरावर परिनाम होतो त्यामुळे आधी व अगोदर स्नान केल्याने Infection पासुन बचाव होतो..
जसे धातुवर परिनाम होतो तसाच जलावर व अग्नीवर ही परिणाम होतो त्यामुऴे पाणी साठवले असल्यास..ग्रहण काळातील संचित जल नंतर फेकुन द्यावे ते सेवन करु नये..
तसेच त्या काऴात झोपु नये कारण झोपल्याने कफ निर्मिती होते व कफामुळे आम निर्मितीस मदत मिळते..तसेच शरीरातील जलमहाभुत धातु स्थिर होतात

व त्याचे चलन वलन मंदावते त्यामुळे त्याकाळी न झोपता जागरुक राहावे व काही ना काही काम करावे.
बाहेर फिरु नये वा प्रत्यक्ष संपर्कात येवु नये..त्याकाऴात वातावरणातही बदल होतो त्यामुऴे गर्भवतीने टाळावे..
तसेच आपण ज्या धर्मांचे असाल त्य धर्मातील मंत्र,चांगली वचने तसेच ग्रंथ वाचन करुन मनावरील ताण कमी करावा..
धन्यवाद…
वैद्य सचिन मारुती भोर

साईनाथ आयुर्वेद व पंचकर्म सेंटर

पुणे.(रावेत.)

ठाणे.

9821832578

Dr.sachin_bhor@yahoo.com,

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s