Uncategorized

​हर्बल गार्डन

हर्बल गार्डन
                     अर्क/रूई
।। कपिलाय नम: अर्कपत्रं समर्पयामि ।।
मारूतीला प्रिय असणारी व वाहीली जाणारी रूईची पाने हि गजानन प्रिय देखील आहेत.तसेच ह्यामध्ये बरेच औषधी गुणधर्म असल्याने ह्याचा पत्रीमध्ये समावेश केला आहे.
ह्याचे १-२ मीटर गुल्म क्षुप असते.ह्याचे काण्ड कठीण असून वरची त्वचा हि धुरकट,रेषायुक्त असून पाने १०-१५ सेंमी लांब व २.५-७ सेंमी रूंद आयताकार असतात.पानांचा वरचा भाग गुळगुळीत असून मागील भागावर पांढरी लव असते.ह्याची फुले पांढरी व वरच्या अर्ध्या भागात तांबूस वांगी रंगाची असतात.फळे लांब व आतल्या बाजूस वळलेली असतात.वाळल्यावर फुटून त्यातून मऊ कापूस बाहेर येतो व त्याला बि चिकटलेली असते.हाच तो कापूस ज्याला आपण लहानपणी म्हातारीचे केस म्हणायचो व तो उंच उंच उडवायचो आठवले ना!
ह्याचे उपयुक्तांग आहे मुलत्वचा,चीक ,फुले,पाने.

आता आपण ह्याचे गुणधर्म पाहुयात:

ह्याची चव कडू,तिखट असून उष्ण गुणाची असते.तसेच हल्की,रूक्ष व तीक्ष्ण असते.रूई कफ व वातनाशक असून पित्तकर आहे.
चला तर मग आता आपण ह्याचे उपयोग पाहू:
१)सूज व वेदना असणाऱ्या भागावर रूईची पाने गरम करून बांधली जातात.
२)पानांचा काढा जखम धुण्याकरीता उपयोगी आहे.
३)कोडावर रूईचा चिक लावतात.
४)दम्यामध्ये रूईच्या फुलाची व मिरीची राख उपयोगी आहे.

(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,

आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,

म्हापसा गोवा.

संपर्क:९९६०६९९७०४

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s