Uncategorized

आजची आरोग्यटीप 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*आजची आरोग्यटीप ०२.०८.२०१७*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
       *जगण्याची साधी सोप्पी तत्वे*

                 *भाग एकशे तेरा*
      आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे

                 क्रमांक *•बारा•*
     निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? 

                    *भाग सात*
नित्यं हिताहारविहारसेवी 

समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।

दाता समः सत्यपरः *क्षमावान*

आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
ग्रंथकार म्हणतात, निरोगी राहायचे असेल तर नेहेमीच क्षमावान असावे. काही वेळा प्रश्न पडतो, क्षमावान असण्याचा आरोग्याशी संबंध कसा काय बुवा ? 
क्षमाशीलता हे वीराचे भूषण आहे. ज्याच्या मनगटात ताकद आहे, तोच म्हणू शकतो, ” जा, तुला क्षमा केली ! ”
क्षमा याचना कधी केली जाते ? जेव्हा  आपली चुक आपल्याला उमजते तेव्हाच. माझी चुकच नाही तर मी क्षमा कशाला मागू ? आणि क्षमा मीच का मागू ? हा प्रचंड अहंकार पाठी लागतो. एकदा का अहंकाराची कीड आत गेली तर तिला बाहेर काढणे खूप कठीण होते. म्हणून वेळीच सावध होऊन मनाला आवरावे.
I am sorry.

हे तीन शब्द मोठमोठ्या चुका माफ करून जातात. व्यवहारात अशी परिस्थिती अनेक वेळा येत असते. एक शब्दाचा कमीपणा स्विकारायला आपण तयार नसतो आणि काट्याचा नायटा होतो. ठिणगीचे रूपांतर आगीत, आणि आगीचे रुपांतर फुफाट्यात होते. जेव्हा समजते तेव्हा खूप काही गमावलेले असते. परस्परांवरील विश्वास ! मन दुखावते, माणसे दुरावतात. यासाठी हे तीन शब्द  उपयोगी पडतात, आय अॅम साॅरी. 
जर मनात असूनही हे शब्द जर वेळीच ओठात आले नाहीत, तर वेळ निघून जाते. गैरसमज वाढत जातात. *ताण* निर्माण होतो. आणि अनेकानेक व्याधी जन्माला येतात. 
ज्याची क्षमा त्याच्याकडेच मागावी. तर ती माफ होते.  आणि विनाअट मागावी. अट ठेवून माफी मागणे याला क्षमा म्हणत नाहीत, “जर माझ्या शब्दाने, कृतीने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर, मी माफी मागत आहे” ही अशी सशर्त क्षमा मागणे फक्त राजकारण्यांना जमू शकते. तो आपला प्रान्त नाही.
आज व्यवहारात त्याचे परिणाम देखील दिसतात. साध्या पोटदुखीपासून जाडी वाढणे, रक्तदाब, मधुमेह, ह्रदयरोग, पॅरालेसीस, कॅन्सर, हे शारिरीक. नैराश्य, चंचलता, निद्रानाश, चिडचिड  इ. मानसिक तर  खोटे बोलणे, चोरी करणे, पापकर्म करणे, व्यसन जडणे, असे आध्यात्मिक व्याधी जन्माला येतात. 
क्षमा करणारा मोठा असतोच, पण क्षमा मागायला सुद्धा दिलदारपणा असावा लागतो. मन तेवढं मोठ्ठं असावं लागतं. पण आपल्या मनात नसताना, पटलेलं नसताना, कधीही दुसऱ्याची क्षमा मागू नका, कारण जर मनाला पटलेले नाही आणि पटल्याचे नाटक जर करीत राहिलात तर आयुष्यभर स्वतःला माफ करू शकणार नाही. तुम्ही दुसऱ्याला फसवू शकता, पण स्वतःला नाही. 
यातून *तणाव* जन्माला येतो. म्हणजेच *ताण आणि तणाव* वाढण्याचे कारण सत्पात्री क्षमा न मागणे आणि कुपात्री क्षमा मागणे हे आहे.
षड्रिपू पैकी सर्वात मोठा जो अहंकार, याचा शत्रू क्षमा आहे. म्हणजेच अहंकाराचा नाश क्षमेने होतो. तेथे सुद्धा भेदभाव नको. समानता हवी.
तुकोबाराया एका ठिकाणी म्हणतात, 

क्षमा करणे जे पुत्रांसी, 

तेची दासा आणि दासी ।

याचा अर्थ सरळ आणि सोपा आहे.

“तुला म्हणून साॅरी म्हणतो, नायतर….” ही वृत्ती नको, जी क्षमा असमानता दाखवते.
अहो, साधं वाॅटसप गटात जे नियम अॅडमिननी केलेले असतात, ते चुकुन मोडले तर शिक्षा भोगावीच लागते ना ! आणि “साॅरी… चुकुन… ” या दोनच शब्दात माफी देखील मिळते, हे तर आपण दररोज पाहातोच. तरीदेखील क्षमा मागायला आपल्याला कमीपणा वाटतो. 
वाढत्या रोगांची संख्या लक्षात घेतली तर फक्त तीन शब्दात ती निश्चितपणे कमी करता येईल.

बस्स म्हणायचे.

“आय अॅम साॅरी.”

“गलती मेरी है, मुझे माफ करो.”

“हं, जरा चुकलंच तेव्हा ! ” 
वैद्य सुविनय दामले.

कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021

02362-223423.

०२.०८.२०१७
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s