Ayurved · Health

​#सामान्य_आयुर्वेद

#सामान्य_आयुर्वेद 
#आयुर्वेदीय_राखी
राखी घेतली का? नसेल घेतली तर एक सुंदर आयडिया अाहे. आपल्या भावासाठी राखी स्वतःच बनवा. एक वेखंडाचा तुकडा घ्या. आणि त्या तुकड्याला छानसा धागा बांधा. झाली राखी. आयुर्वेदीय राखी.
आयुर्वेदात लहान मुलाच्या स्वास्थ्यासाठी त्याच्या हाताला वेखंडाचा तुकडा बांधायला सांगितलं आहे. त्यामुळे बाळाची अाभा वाढते आणि आजार पसरवणाऱ्या हेतूंपसून त्याचं रक्षण होतं. वेखंड हे रक्षोघ्न द्रव्य आहे. म्हणून त्यापासून केलेलं बंधन हे रक्षा बंधन. 
अशी वेखंडाची राखी बनवा आणि बांधा आपल्या भावाच्या मनगटाला. तो कदाचित वैतागेल, म्हणेल हे काय हाडुक बांधलं? राखी कुठाय? मग त्याला समजावून सांगा, ‘माझं रक्षण करायला आधी तू व्यवस्थीत असायला पाहिजे ना! तू ठणठणीत रहावं म्हणून ही आयुर्वेदीय राखी. ही बांधल्यावर तुझी आॅरा अजून बलवान होईल. तुझ्यावर जीवजंतूंची आक्रमणं सहजासहजी होणार नाहीत, आणि रोगांपासून तुझं रक्षण होईल.’ समजुत्दार असेल तर समजेल.
ही राखी दिसायला एवढी सुंदर नसेल जेवढी तुम्ही दर वर्षी बांधता. खरं तर भावाच्या हातला फक्त एक धागा बांधला तरी ती राखी होते. कारण बहिण भावाचं प्रेम राखीच्या सौंदर्याचं किंवा किमतीचं गुलाम नसतं. काय करणार आहोत अापण त्या सुंदर राख्यांचं?
रक्षण करते ती रक्षा. आणि असं रक्षण करणारं बंधन ते रक्षाबन्धन. आयुर्वेदात अशी रक्षाबंधनं सांगितली आहेत जी स्वास्थ्याचं रक्षण करतात. काळ बदलतो, आणि फक्त रूढी राहतात. त्यामागचं  विज्ञान सगळेच विसरतात. शेवटी राख्यांवर फुलं येतात, बाहुल्या येतात, घड्याळं येतात, तर कुणी राखी म्हणून घड्याळच बांधतात.
खरं तर दर वर्षी याच विषयावर आणि त्याच दिवशी लिहित असतो. पण या वेळी जरा आधी लिहितोय. कारण त्याच दिवशी लिहिणं म्हणजे ‘अरे जेवण झालं तुझं? सुभ्याकडे पार्टी होती मस्त’ किंवा ‘आज दुपारी तीन वाजता पिच्चर पहायला ये आयनाॅक्सला’ असं संध्याकाळी पाच वाजता सांगण्यासारखं होतं. या वेळी आधिच सांगतोय, म्हणजे राख्या बनवायला वेळ मिळेल. 
अशी राखी बनवा अाणि भावाला पाठवा, सोबत पत्र सुद्धा पाठवा, म्हणजे खऱ्या अर्थाने उपयुक्त असा रक्षाबन्धन साजरा होईल. राखी बनवलीच तर #आयुर्वेदीय_राखी या hashtag सोबत अवश्य पोस्ट करा.
©वैद्य अमित पाळ. MD(Ayu)
Also read- (2016)

https://m.facebook.com/story.php?story_fbid=1154903911214835&id=100000857103639

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s