Ayurved · Health

​असं का ?

असं का ?
मागच्या आठवड्यात TV वर “वजनदार” सिनेमा झाला .त्यादिवशी बघणं शक्य नव्हतं म्हणून रेकॉर्ड करून ठेवला होता तो जशी सवड मिळेल तसा बघितला.सचिन कुंडलकरचा सिनेमा,सई आणि प्रिया बापट या आपल्या आवडत्या अभिनेत्री आणि वेगळा विषय अशी बरीच अट्रक्शन्स होती बघण्यासाठी!!
मला आवडला सिनेमा ! मुळात वजन हा विषय किंवा शब्द सध्या फारच परवलीचा झाला आहे. तरुण पिढीला तर याचं फारच अतिरेकी कौतुक झालंय म्हणायला हरकत नाही. zero फिगर म्हणजे शुद्ध मराठीत अगदी पाप्याचं पितर म्हणजे काहीतरी ग्रेट अशी भावना निर्माण झालीय हल्ली.चवळीची शेंग वगैरे संकल्पना पूर्वीही होत्याच पण मला वाटतं जसजसे आपण पुढची शतक गाठतोय त्या वेगानं विचार नाही बदलत आपले !!
अजूनही रंग,रूप,कपडे,फिगर, लुक्स याला किती महत्त्व देतो आपण .वजन जास्त असेल तर शाळा, कॉलेज यात थट्टेचा विषय असतो ,काहीतरी टोपण नावं ठेवली जातात ,पुढे नोकरीच्या ठिकाणी यांना दुय्यम् वागणूक दिली जाते, लग्न ठरताना तर प्रचंड अडचणी, अपमान सहन करावे लागतात. ती व्यक्ती कोणत्या मनःस्थितीत असेल,काय विचार करत असेल,त्यांच्यात किती न्यूनगंड निर्माण होत असेल याचा कोणीही विचार करत नाही. मग कधीतरी ती व्यक्ती डिप्रेशन मध्ये जाते .कधी स्ट्रेसमुळे जास्तच खाऊ लागते,कधी काहीतरी अघोरी डाएट वगैरे फॉलो करू लागते ,कधी जास्तीची चरबी शस्त्रक्रिया करून काढायच्या नादात जीवही गमावून बसते ,तर कधी लग्न ठरत नाही म्हणून तणावाखाली येऊन आत्महत्या देखील करते .
बरेचदा स्वतः त्या व्यक्तीला वजनाविषयी फार अडचण नसते पण आसपासचे लोक कावळ्यासारखी नेहमी चोच मारून त्या व्यक्तीला हिणवत राहतात .त्या सिनेमात दाखवल्याप्रमाणे बऱ्याच जणांना तसं वजन ,तो भारदस्तपणा खुलून दिसतो,शोभतो. वजन मध्यम असावं ,फार कमी किंवा जास्त नसावं हे योग्यच आहे, पण त्याहीपेक्षा आनंदी असणं, निरोगी असणं हे जास्त महत्वाचं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.

योग्य आणि healthy आहार,आहाराच्या नियमित वेळा, पुरेसा व्यायाम आणि चांगली विश्रांती ही स्वास्थ्य टिकवण्यासाठी गरजेची गुरुकिल्ली आहे .

मुळात आपण जसे आहोत तसं आपण स्वतःला स्वीकारलं पाहिजे तरच समोरचे स्वीकारतील .कोणी आपल्या वैयक्तिक आयुष्यात गरज नसताना ढवळाढवळ करतंय, नको ते सल्ले देतंय असं वाटत असेल तर तसे स्पष्ट सांगायला शिकलं पाहिजे .कोणाचेही चुकीचे सल्ले ऐकून आपल्या आयुष्याचे नुकसान होता कामा नये .
गेली पंचवीस वर्षे मी प्रॅक्टिस करतेय ,अनेक मुली वजन कमी करण्यासाठी माझ्याकडे येतात ,वरचं सगळं मी त्यांना समजावून सांगतेच पण आता हा सिनेमा बघा असं मी आवर्जून सांगेन.सिनेमा हा खोटा असतो आणि तस आपल्या आयुष्यात कधीच घडत नाही हे जरी खरं असलं तरी आपल्याला काहीना काही स्फूर्ती तर नक्कीच मिळते ना !त्याचा फायदा आपण करून घ्यावा. आता या सिनेमासाठी सई आणि प्रिया यांनी वजन वाढवलं ,पुन्हा घटवलं, अतुल कुलकर्णी, आमिर खान ,शाहरुख खान अशी कितीतरी उदाहरणे आपण बघतो .फक्त प्रयत्न करताना आपलं सातत्य कमी पडत .नाहीतर जगात अशक्य असं काय आहे ? तुम्हाला काय वाटतं?

पोस्टमध्ये वापरलेले फोटो किंवा चित्रं इंटरनेट वरून साभार घेतलेली असून केवळ विषय स्पष्ट करण्यासाठी दिली आहेत.

कृपया पोस्ट आवडली आणि share करावीशी वाटल्यास माझ्या नावासहित share करावी.
वैद्य राजश्री कुलकर्णी

M .D .(आयुर्वेद )

नाशिक

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s