Ayurved · Health

म्हातारपण आणि वात

🌹🌹 *म्हातारपण आणि वात*🌹🌹
   बापू लै गुडघे दुखायलेत रं….!!!!
 दिवसातून 4-5 वेळा GP असो की आयुर्वेद चिकित्सक यांच्या कानी येणारे हे वाक्य आहे😇 ।
        जे आयुर्वेद वाले आहेत ते लगेच पायाला हात लावून allopathy मध्ये सांगितलेले examination आयुर्वेदाच्या नजरेने करून पाहतात।

      आता वय म्हातारपणाच पण काही तरणे बाँड असणारे आजोबा त्यांना जर विचारलं *इस प्रकृती के पिछे का राज क्या है!!!???*
तर 75% उत्तर येत 

जवानी किया हुआ व्यायाम और घर के गाय भैसो का दूध😇😇
म्हणजेच काय तर……

मुबलक प्रमाणात पोटात गेलेला स्नेह आणि व्यायाम करून पिळदार(मिशी सारख) बनवलेले शरीर …..

     पण खेड्यातली काही शेतात काम करणारी किंवा आताच्या तूप तैल बंद चुकीच्या प्रक्रियेने मज्जा धातूचे पोषणच नाही मग हाडे ठिसूळ होणार ज्या हाडाचे पुरण मज्जेने केले तेच नाही मिळाले तर ….??????

       मग calcium ची कमी ह्याची कमी त्याची कमी ते उष्ण औषधी अजून पित्ताची दुष्टी होऊन मज्जाधरा जीवतोडून ओरडते(हाडे एक मेकांना घासून वाजायला लागतात)

      हे घासन्यातून उत्पन्न झालेली उष्णता अजून झीज निर्माण करते पण त्यात शरीर काही सूचना देत असते ते *वेदना* स्वरूपात पण आम्ही त्या वेदना *जेवढे मेडिकल वर वेदनाशामक मिळतील* तेवढे खाऊन शांत करतोत पण मला सांगा *तोंड दाबून बुक्क्यांचा मार* दिल्यानंतर एक वेळा जीव जाणार की नाही🙏🏻🙏🏻

      म्हणजेच जे काम प्रेमाने करून घ्यायला पाहिजे तिथं जर जोर लावला तर 100% काम व्यवस्थित न होता नात्यात दुरावा येणार(गुडघे घासून दुरावा येणार)

         *मग काय उपाय करता येईल?!* 

        स्नेहन करावे ।

मालिश करावी।

म्हातारे आणि बाळ हे दोन्ही वागण्यात सारखे असतात असे म्हणतात बालकांना (पूर्वीच्या काळी बरं का!!) अंघोळी पूर्वी तैल लावले जायचे त्याला टाळू माकने असे म्हणत😇😇

      मालिश केली आणि कोमट पाण्याने अंघोळ झाली की ढारढूर झोपायचं पठया आता स्वतःच्या लेकरांना ते सुख देतच नाही पण औषधी खाऊ घालून झोपी मात्र घालतो आणि मग लेकरं होतात मंद😷😷

      आपले आजोबा आजी ह्यांना पण मालिश हवीय डोक्यापासून -कानभरून-तळपाया पर्यंत *तैल* लावले पाहिजे ।

चला तर सुरुवात करून आपल्यापासूनच👍🏻👍🏻👍🏻

तयारी जवान राहण्याची😜

*वैद्य जिंतूरे सचिनकुमार*

श्री विश्वेश्वर आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सालय

तामसा

ता.हदगाव जि.नांदेड

9405688950
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s