Ayurved · Health

गर्भाशय निरहरण

*।।गर्भाशय निरहरण।।*      

*फायदे???*

स्त्रियांना मासिक पाळी चालू असे पर्यंत प्रमेह होत नाही।

म्हणजे क्लेद संचिती होत नाही,असे गृहीत धरून  या न झालेल्या संप्राप्ती चा विचार करावा।

आता गर्भाशय निरहरण चा विचार 2 प्रकारे करावा।

*एक रज प्रवृत्तीचे वेगधारण!*

*दुसरे, क्लेद संचिती मुले होणारे विकार!*
प्रथम वेग धारण चा विचार !

शुक्र वह स्रोतासाचा विचार महत्वाचा!

 स्पष्ट आर्तववाह स्रोतासाचा विचार नाही पण शुक्रवाह चा विचार केल्यास

*शुक्रस्त्राव* -इथे graphian follicles चे mature होणे व rupture होऊन release होणे हे अभिप्रेत आहे!
*गुह्यवेदना*वृषणात वेदना असा अर्थ मराठी भाषांतरात आहे।

स्त्री बीज निर्मिती जिथे होते तिथे म्हणज ovaries च्या ठिकाणी inflammation व मंद वेदना असतात.
 *श्वायथुर्जवर*

Cyst and mild fever ही लक्षणे सापडतात।
*हृदव्यथा* याचे 2 प्रकार पडतात ।

धारण झालेली स्त्री ही स्वभावत: चीड चीड करणारी असते तर 

हृदयाशी सबंधनदीत विकार पहावयास मिळतात।

 *मूत्रसंग*

लघवी कोंडणे हे लक्षण इंटर्नल inflammation मुले पाहायला मिळते।

 

*वृषण रोग*

इथे बीज निर्मिती चे स्थान म्हणजे ovaries अभिप्रेत आहेत।

Inflammation ,cyst व इतर विकार।

  

*षंढता*

याचे वर्णन करायची गरज आहे का?
गर्भाशय निरहरण हे आर्तववाह स्रोतासाचा मोठा अवरोध तर आर्तवचे धारण या दृष्टीने विचार केलाय।

दुसरा विचार, 

*प्रमेहतील सूत्र प्रमाणे*

रज प्रवृत्ती चालू असे परंत मेह होत नाही हा निसर्ग नियम झाला!

पण आजकाल चा मिथ्या आहारविहार जो रजप्रवृत्ती ला influence करतो, स्त्रियांना प्रमेह——मधुमेह होण्यास मदतच करतो!

मी या सूत्राचा विचार असा करतो,

*जर प्राकृत रज प्रवृत्ती चालू असताना मेह होत नाही, तर ही प्रवृत्ती पूर्णपणे कृत्रिम रित्या थांबवली तर भोगावे लागेल ,त्या दहा दुष्यंना जे प्रमेहतील main targets आहेत!*
क्रमाने विचार करू.

@रस धातू किंवा ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे रसौज असा विचार!

रस दुष्टी ची लक्षणे पहा।

यात प्रमुख्याने स्वभाव ,त्वचा,धातूंचे प्रीणन, थकवा, इत्यादी चा विचार व्हावा।

व्यान वायू विक्षेपीत करीत असलेला हा धातू क्लेदाने गुरू झाल्याने 

essential hypertension, atherosclerosis, endothelial dysfunction, चा विचार व्हावा।

*रक्तधातु*

चा विचार करताना त्वक वैवर्णय, मानसिक अस्वस्थता, रक्त पित्त,आम्लपित्त,तर आधुनिक दृष्टीने 

हार्मोन्स, anaemia, पोलीसायथेमीया, व इतर रक्त विकारांचा विचार करावा।

रक्ताचे उपधातु असलेल्या सिरा व कंदरा यांचा विचारही महत्वाचा

वातज दुष्टी असल्याने atherosclerosis, मी brachial artery चा 2D ECHO करून घेतो।कफज मध्ये cholesterol व पित्तज मध्ये hypertension due to hormonal imbalance असे पाहावे।

हार्मोनल assay केल्याने चित्र समोर येते।

*मांसधातू*

मुख्य तक्रार अतिशय थकवा,पडवसे वाटणे(असयासुखम  )

पिंडीकोद्वेष्ट्ण पहावयास मिळते।

Electrolyte imbalance पाहणे उत्तम।

*मेद धातू*

या संप्रपतीतील मुख्य धातू।

याने वातज असेल तर क्षय तर कफ पित्तज असेल तर मार्गावरोधजन्य wt gain पाहायला मिळते।

BMI

BMR

Stool exam करा।

विकृती लक्ष्यात येते।
*मजजा धातू*

संप्राप्ती वाढल्यास बऱ्यापैकी hammer होणारा धातू।

भ्रम ,तिमिर दर्शन,इंद्रिय ज्ञान मध्ये अडचण(tingling व numbness, retinopathy इत्यादी  )

MRI,EEG वै तपासण्या महत्वाच्या!

*शुक्र धातू* 

वर सर्व वर्णन आलेच आहे।

*अंबु*

या स्रोतांसाची विकृती होते,

खूप तहान लागणे वै लक्षणे

जास्त प्रमाणात विकृती असल्यास उदर, ccf या व्याधींची पुरवरूपे दिसतात।

*लसीका*

प्रतिकार क्षमते शी संबंधित व्यधी।

ऑटो immune evaluation करावे।

असे *विकार* माझ्या डोक्यात येतात जेव्हा मी गर्भाशय निरहरण  केलेल्या स्त्री शरीराचा विचार करतो।

धन्यवाद!

———————————–

*EXPLORING AYURVEDA*

*वैद्य भरत कुमार प्र जाधव*

*फोन नं 9552361074*

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s