Ayurved · Health

#आला_पावसाळा_वातव्याधी_टाळा

#आला_पावसाळा_वातव्याधी_टाळा…!!
गेल्या चार दिवसापासुन पावसाने आपली हजेरी लावायला सुरवात केली आहे त्यामुळे हवेतील गारवा वाढलाय..त्यामुळे ज्या लोकांना वाताचा त्रास आहे..त्यांनाही ह्या गारव्यामुऴे.. पावसाच्या धारामुऴे..त्रास सुरु होतोय..
वात म्हणजे काय..जेथे जेथे रिक्तता आहे.पोकळपना आहे..आकाशीय भाग आहे व घनता म्हणजेच प्रुथ्वी वा वोल्युम कमी आहे ते वाताचे संचार स्थान आहे..
जेथे जेथे वेदना आहे..कुठे रग ..तर कुठे चमक आहे तेथे वात आहे..फक्त जागा बदल होते..कधी मान तर कधी पोट तर कधी गुडघे तर कुठे मनके..वात सर्विकडे पोहचु शकतो..त्रास देवु शकतो..
  शरीराचे धारन,चलन वलन हे सर्व वातामुऴे होते जेव्हा ते समतोल अवस्थेत असतो..त्यामुळे पावसाळ्यातील गारवा जाठराग्नी ला म्हणजे पोटातील अन्नपचन क्रियेसाठी आवश्यक असा अग्नी हा मंदावतो व भुक कमी लागते व आमाची म्हणजे शरीरीतील टोक्झीनची निर्मिती सुरु होते.
.हा आम सांध्यामध्ये ,रिक्त आशयामध्ये जावुन बसतो व वाताच्या प्रकोपाला कारनीभुत ठरतो..त्यामुळे

पक्वाशय जे वाताचे स्थान आहे..तेथे चिकित्सा करने गरजेचे आहे 
..मलावष्टभता..गुडघा दुखने,शरीर सुस्तावने,हात दुखने,मान दुखने,शरीर जड वाटने हे अशी लक्षने दिसु लागतात..वारंवार सर्दि होने.. हातापायाला मुंग्या येने.ही व अशी अनेक लक्षने दिसु लागतात..तेव्हा त्याला दुर्लक्ष कऱु नका…वेळीच जवळच्या वैद्याकडे जावुन चिकित्सा करुन घ्या..
काही दिवसांच्या औषधी चिकित्सेने व नंतर गरज पडल्यास पंचकर्म कर्मातील स्नेहन स्वेदन व बस्ती चिकित्सेने तात्काळ कायमस्वरुपाचा आराम पडतो व त्यासोबत दिलेली पथ्य पाळणे आवश्यक आहे…
बस्ती ही वातावरील श्रेष्ट चिकित्सा आहे..ही वाताच्या मुळ स्थानावर कार्य करते त्यामुऴे बस्ती ज्यात औषधी वनस्पतीच्या तेलाचा वा काढ्याचा इनिमा दिला जातो तो वर्षातुन ८ दिवस तरी घ्यावा…
शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी पंचकर्म जरुर करावे…
आय़ुर्वेदा सर्वासाठी
वैद्य सचिन मारुती भोर
Shreenagar,Thane.९८२१८३२५७८.
Pune:-

Rawet,Pune.9821832578
*******—**************——–***–*—*–****

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s