Ayurved · Health

​#आयुर्वेदातुन_आरोग्याकडे

#आयुर्वेदातुन_आरोग्याकडे
🍚 दही 🍚
न नक्तं दधि भुंजीत न चाप्यघृतशर्करम्| नामुद्युगयूषं नाक्षौद्रं नोष्णं नामलकैर्विना| च.सु.७/६१
रात्रीला व गरम करून दही खाऊ नये. तुपसाखरेशिवाय दही खाऊ नये. मुगाच्या कढणाशिवाय दही खाऊ नये. मधाशिवाय दही खाऊ नये. किंवा आवळ्याशिवाय दही खाऊ नये.
☀ उन्हाळ्यातील दहीसेवन ☀
लघु चाम्लं भवेतग्रीष्मे चात्युष्णं रक्तपित्तकृत् |

शोषभ्रमपिपासाकृद्दधि युक्तं न ग्रीष्मके || हारितसंहिता
उन्हाळ्यातील दही हलके, आंबट, अतिउष्ण गुणधर्माचे रक्तपित्तकारक, शोष, चक्कर, तहान वाढविणारे असते. यामुळेच दही उन्हाळ्यात खाण्यासाठी प्रशस्त नसते.
🍀 वसंत ऋतुतील दही 🍀
वातलं मधुरं स्निग्धं किञ्चिदम्लं कफात्मरम् |

बलकृद्वीर्यकृत्प्रोक्तं वसन्ते न प्रशस्यते || हारितसंहिता
वसंत ऋतुतील दही वातकारक, गोड रसाचे, किंचित आंबट, कफवर्धक, बलवीर्यकारक असल्याने घेण्यास उपयोगी नसते.
☔वर्षा (पावसाळ्यातील) ऋतुतील दही☔
वार्षिकं हितकृत्प्रोक्तं दधि शस्तं न दोषलम्|

शोषवातभ्रमान्हन्ति श्रमातिसारनाशनम् || हारितसंहिता
पावसाळ्यातील दही हितकारक असते, दोषकारक नसते.

शोष (atropy), वात, चक्कर, श्रमामुळे होणारे loose motions कमी करण्याचे काम पावसाळ्यातील दह्याने होते.
🍀 शरद ऋतुतील दही 🍀
शारदं दधि गुर्वम्लं रक्तपित्तविवर्धनम्|

शोफतृष्णाज्वरार्तानां करोति विषमज्वरम्|| हारितसंहिता
शरदातील (oct मधील) दही पचावयास जड, आंबट, रक्तपित्त वर्धक, सुज, तहान, तापीने पिडीत लोकांत विषमज्वर (१ वा २ वा ३) दिवसातुन एकदा येणारा ताप निर्माण करणारे असते.
 🍚 हिवाळ्यातील दही 🍚
गुरू स्निग्धं सुमधुरं कफकृद्वलवर्धनम् |

वृष्यं मेध्यश्च हैमन्तं पुष्टिदं तुष्टिवृध्दिदम्|| 

वृष्यं बलकरं पैत्तं श्रमस्यापहरं परम्|

शैशिर सघनं चाम्लं मधुरं पिच्छलं गुरू||  हारितसंहिता
हेमंत ऋतुमधील दही पचावयास जड, स्नेहयुक्त, गोड कफबलवर्धक, बुध्दीवर्धक, तुष्टी पुष्टी, संतोषकारक असते.

शिशिर ऋतुमधील दही बलवर्धक, शुक्रवर्धक, पित्तवर्धक, श्रेष्ठ श्रमहरण करणारे, घन (घट्ट) गुणाचे, आंबट गोड चविचे, गुळगुळीत, पचावयास जड असे असते.
🍀विविध दह्याचे गुण🍀
गोड दही महाभिष्यंदी (शरीरात अत्याधिक प्रमाणात अवरोध निर्माण करणारे), कफ व मेद वाढविणारे असते.

      आंबट दही कफवर्धक असते. अत्याधिक आंबट दही रक्ताला दुषीत करणारे असते.

        नीट तयार न झालेले दही विदाही ( शरीराची आग करणारे), मलमुत्र अधिक प्रमाणात उत्पन्न करणारे असते, वात पित्त कफ रक्त यांना बिघडवणारे असते.
जर वरील नियमाशिवाय दहीसेवन केले तर खालील आजार निर्माण होतात. 
ज्वरासृकपित्तवीसर्पकुष्ठपाण्ड्वामयभ्रमान| 

प्राप्नुयात् कामलां चोग्रां विधिं हित्वा दधिप्रियः| च.सु.७/६२
    🍀दह्याने उत्पन्न आजार🍀

नियमानुसार दहीसेवन केले नाहीतर 

ज्वर( ताप), रक्तपित्त ( शरीरातील विविध openings मधुन रक्त बाहेर पडणे), विसर्प कुष्ठ ( त्वचाविकार सोरियासिस),पांडु( anemia), भ्रम ( चक्कर), उग्र कावीळ आदी आजार निर्माण होतात.
१.क्रमानुसार प्रथम आहारसापासुन बनणार्या रसधातुत अपाचित दही पोहचतो ज्वर म्हणजेच ताप निर्माण करतो.येथे योग्य उपचार न केल्यास तो पुढील रक्तात पोहचतो..

२. रक्तात पोहचलेला अपाचित भाग रक्तात आंबटपणा वाढवतो व हिरडे सळसळ करणे, हिरड्यातुन रक्त निघणे, मुळव्याधीचा त्रास, अशा प्रकारचे रक्ताचे आजार उत्पन्न करतो.योग्य चिकित्सा न केली गेल्यास पुढील मांसात हा अपाचित भाग पोहचतो.

३. मांसात पोहचल्यावर हा दुषीत आम कुष्ठ विसर्प  (त्वचाविकार सोरियासिस) निर्माण करते.

४.पुढील मेदात हा दुषीत भाग पोहचला की त्वचेतुन स्राव येणे,खाज सुटणे , blockages निर्माण करणे आदी आजार उत्पन्न करतो.

५, मेदानंतर या दुषीत आमाचा परिणाम हांडावर होतो हाडांची झीज होते, दात हालायला लागतात, किंवा पडायला लागतात, केस गळणे वाढते अशी लक्षणे निर्माण होतात.

६. हाडापर्यंत पोहचल्यासही दुषीत आमाची चिकित्सा योग्य चिकित्सा केली नाही तर मज्जेवर परिणाम होतो.नेहमी चक्कर येते जी सहजपणे दुरूस्त होत नाही. 

शेवटी सर्व शरीरात योग्यरित्या पचन न झालेले दही पोहचते आणि जिवघेणी कावीळ किंवा crf (kidney faulure) चा त्रास निर्माण होऊ शकतो जो दुरूस्त होण्यास अत्यंत कठीण असतो.

ग्रंथकारांनि सांगितले तसे दहीसेवन केले तर त्रास होत नाही पण त्याशिवाय दहीसेवन केले तर वरील क्रमाने आजार होतात. लवकर योग्य उपचार केले नाही तर आजारांची गंभीरता वाढत जाते. पुर्वी वा आता दहीसेवन केलेले असल्यास वरीलपैकी कुठलाही त्रास नाही ना हे पहावे. त्रास असल्यास योग्य चिकित्सने अटकाव करावा.
वैद्य गजानन मॅनमवार

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय

2nd floor, sharma chembers

Above Samudra hotel Nal stop pune

Mob no – 9130497856, 9028562102

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s