Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*आजची आरोग्यटीप 23.05.2017*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
   *जगण्याची साधी सोप्पी तत्वे*
           *भाग त्रेचाळीस*
      आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे 

                  क्रमांक दहा

  

        विज्ञान शाप की वरदान ?

                   भाग एक
आरोग्य तपासणी करण्यासाठी वेगवेगळी उपकरणे शोधून काढली, कंप्युटर, डिव्हाईस, सोनोग्राफी, एमआरआय, सीटी स्कॅन, इ. उपकरणे विज्ञानानेच दिली आहेत. युक्तीने त्याचा वापर करून घेता यायला हवा. आम्ही यंत्रावर एवढे अवलंबून रहायला लागलो कि, सामान्य बुद्धीचा किमान वापरदेखील करता येईनासा झाला. आणि यंत्र जे सांगेल ते अंतिम सत्य वाटायला लागले. “मला काय होतंय हे सुद्धा मला कळेनासे झालेय.” 
अंतिम निदान घेऊनच वैद्याकडे रूग्ण येताहेत.

“मला ब्लडप्रेशर आहे, 

मला डायबेटीस आहे, 

मला दोन वेळा अॅटॅक येऊन गेला आहे,

माझं रक्त सारखं कमीच असतं. कितीही पालक खाल्ला तरी रक्त वाढतंच नाही,

मला थायराॅईड आहे, 

किती प्रकारची लेबल लावून रूग्ण येतात. बरं त्यांना विचारावं, 

” तुम्हाला काय होतंय ?” 

 तर, त्यांना प्रश्नच कळत नाही, परत परत खोदून विचारावं लागतं,

 “तुम्हाला त्रास काय होतोय?”

तेव्हा खूप आठवून रूग्ण सांगतो, 

“मला तर त्रास काहीच होत नाही.”

“मग औषध कशासाठी घेताय ?” असं परत  विचारलं तर सांगतात, “डाॅक्टरनी रिपोर्ट केले आणि सांगितले म्हणून, रिपोर्ट मधे काहीतरी दोष होता म्हणून औषधे सुरू केली होती.”
आम्ही या रिपोर्टच्या एवढे आधीन झालो आहोत की त्रास असला तरच औषधे घ्यायची असतात, हे पण आम्ही विसरून गेलो आहोत. 
जितकं शक्य आहे, तितका मला माझा आजार यंत्राशिवाय कळला पाहिजे. मला काय होतंय, हे यंत्राशिवाय मला समजलं पाहिजे. एवढं तरी आरोग्य साक्षर व्हायलाच हवे ना ! 
वैद्य सुविनय दामले.

कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021

02362-223423.

23.05.2017
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s