Ayurved · Health

आजची आरोग्यटीप 

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*आजची आरोग्यटीप 20.05.2017*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
   *जगण्याची साधी सोप्पी तत्वे*
           *भाग चाळीस*
      आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे 

                  क्रमांक नऊ
   कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र

                   भाग पाच
सगळे पशुपक्षी आपले पोट भरण्यासाठी दिवसा (खाण्याचे ) काम करतात. रात्रीचा दिवस करत नाहीत. त्यामुळे या सर्व प्राण्यांचे आरोग्य चांगले असते. माणसाला मात्र डाॅक्टर लागतो. पूर्वी वैद्यावर काम भागायचे, आता वैद्य पुरत नाही.
रात्रीचे खाल्लेलं पचवायला जास्ती शक्ती संपते. आणि वेळ ही जास्ती लागतो. दिवसा उजेडी सकाळी जेवलो तर अन्न पचायला फक्त आठ तास लागतात. आणि पुनः सायंकाळी चरचरीत भूक लागते. तर  रात्रीचे जेवलेले पचायला तब्बल सोळा तास लागतात. रात्री आठ वाजता जेवलो तर पुनः चरचरीत भूक लागते दुपारी बारा वाजता ! म्हणजे जवळपास दुप्पट वेळ लागतो. 
रात्री कामही बेताचेच असते.  सर्व वेळ झोपेतच असतो, त्यामुळे शरीराच्या हालचाली पण कमीच. श्रम कमी आणि अन्न जास्ती वेळ एकाच ठिकाणी पडून राहते. त्याचा परिणाम म्हणून पोटात चिकटपणा तयार होतो. चरबी वाढते, पोट सुटते, रक्तातील साखर किंवा आम म्हणजे आजच्या भाषेतील चरबीचे अनेक प्रकार म्हणजे ट्रायग्लीसराईड, कोलेस्टेरॉल वगैरे वगैरे, वाढतात. 
दिवसा ही चरबी तेवढ्या प्रमाणात वाढत नाही,  कारण ही चरबी किंवा चिकटपणा कमी करणारा सूर्य फक्त दिवसाचाच असतो. त्यामुळे दिवसा घेतलेल्या अन्नावर अग्निची प्रक्रिया पटकन होते, शारीरिक हालचाली नीट होत असतात. पोट हलत असते, चिकटपणा कमी निर्माण होतो. शरीर प्रमाणबद्ध रहाते. स्वास्थ्य मिळते.
निसर्गाने  दिलेले नियम पाळले तर औषधांची गरजच उरणार नाही. नाहीतर कृत्रिम औषधांचा अक्षरशः बाजार झालाय. एकदा डाॅक्टरांकडे जावे लागले तर एक औषध कायम स्वरूपात सुरू होते. त्यातही आपली मूळ तक्रार राहते बाजूलाच, नवीनच रोग, ज्याचा आपल्याला त्रास काहीच नाही, तो शोधून काढला जातोय. आणि आपण तो अगदी सहज मान्य पण करतोय. त्यासाठी पुनः कृत्रिम औषधे आहेतच. एक नसलेला त्रास कमी होण्यासाठी दुसरे त्रासदायक औषध घेणे हा पर्याय.
असो ! काय करणार ? 

आरोग्याच्या मूळ व्याख्याच बदलून गेल्यात. 

ते पूर्वीचे फॅमिली डाॅक्टर बदलले, ती आपुलकीही संपून गेली.

ऋतुही बदलले, हवामानही बदलले, 

पाच दिवसाची कसोटी आता एका ओव्हरपर्यंत कमी होत आली. 

रात्रही बदलली आणि आता दिवसही बदलले.

रोग बदलले, आरोग्यही बदलले ! 

कामाचे दिवस आणि विश्रांतीची रात्रही बदलली !!
वैद्य सुविनय दामले.

कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021

02362-223423.

20.05.2017
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s