Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*आजची आरोग्यटीप 19.05.2017*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
   *जगण्याची साधी सोप्पी तत्वे*
           *भाग एकोणचाळीस*
      आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे 

                  क्रमांक नऊ
   कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र

                   भाग चार
कमळ दिवसा उमलते, सायंकाळी मावळते.
समांतर पर्णविन्यास असलेल्या गुलमोहोर,   चिंच, लाजरी इ. वनस्पतींची पानेदेखील दिवसा उघडतात आणि सायंकाळनंतर बंद होतात.
वनस्पतीमधील फोटो सिंथेसिस ही अन्न निर्मितीची प्रक्रिया या सूर्यावरच अवलंबून असते, हे पण आपण शाळेत शिकलोय.
पक्ष्यांचा चिवचिवाट, कोंबड्यांचे आरवणे, कावळ्यांची कावकाव सूर्योदयानंतर सुरू होते.
ब्राह्म मुहूर्तावर उठून आपले आह्निक आवरून दिवसाच्या कामकाजासाठी सज्ज व्हावे, असे आयुर्वेदातही लिहिले आहे. 
सर्व शुभकार्ये दिवसाचीच होतात. दिवसा सकारात्मक उर्जा कार्यशील असते. रात्री नसते. सत्वगुण दिवसाचा असतो तर रात्र ही तमोगुणी असते.
उगवत्या सूर्याचे दर्शन घ्यावे. म्हणजे सकारात्मक उर्जा मिळते, तर सूर्य अस्ताला जाताना त्याला पाहू नये, नकारात्मक शक्ती वाढते, हे पण भारतीय दर्शनशास्त्रामधे लिहिले आहे.
आरोग्यम् भास्कराद इच्छेत, म्हणजे आरोग्य हे सूर्यावर अवलंबून आहे. आरोग्याचा स्वामी सूर्य आहे. चांगल्या आरोग्यासाठी सूर्यापासून आपल्याला उर्जा मिळत असते. 
सर्व आहारीय पदार्थ गोळा करण्याचा कालावधी पण सूर्योदयाला सुरू होतो, त्याचप्रमाणे औषधी संग्रह करायला सुद्धा दिवसच सांगितलेला आहे.
हे सर्व नियम निसर्गाने ठरवलेले आहेत. माणूस हा पण त्याच निसर्गातील एक घटक आहे. त्यामुळे या निसर्ग नियमांना  आपणही बांधील आहोत, हे कदापि विसरून चालणार नाही. 
यावरून पुनः पुनः हेच सिद्ध होते, की दिवस हा कामे करण्यासाठी तर रात्र ही विश्रांती घेण्यासाठी आहे. त्यात ढवळाढवळ करू नये. 
हे नियत काम नियत वेळी करणे हेच आरोग्य, हे नियम पाळणाऱ्या सर्वांना नियत आयु मिळते. हे पण आपण व्यवहारात पहातो.
पर्णाळी पाहोन उचले ……..

…..आणि पुरूष भ्रमिले

याला काय म्हणावे, 

असे समर्थ देखील विचारत आहेत. 

पानावरून चालणारी अळी पुढे पाय टाकताना, पुढे आधार आहे का, हे चाचपून बघते आणि मगच पाय पुढे टाकते, म्हणून पानावरून ती खाली पडत नाही, एवढा सावधपणा एवढ्याश्या अळीमधे सुद्धा आहे, आणि मनुष्यप्राणी (दासबोधामधे देखील ‘पुरूष’ हा शब्द लिंगवाचक नसून, स्त्री आणि पुरूष या दोघांनाही एकत्रित म्हणून वापरला आहे. गैरसमज नसावा. )  मात्र आपल्या सुरक्षेसाठी जे जे उपाय सांगितले आहेत ते सर्व नियम पुरूष आपणहून मोडतो, आणि नंतर दैवाला दोष देत बसतो. 
अखंड सावधान असावे 

दुश्चित्त कदापि नसावे.
वैद्य सुविनय दामले.

कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021

02362-223423.

19.05.2017
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s