Ayurved · GarbhaSanskar · Gynaecology

गर्भसंस्कार आणि आयुर्वेद चिकित्सा

गर्भसंस्कार – विज्ञान आणि प्राथमिकता… असा लेख मुंबईच्या प्रसिध्द महाराष्ट्र टाईमस् दैनिकात आलेला आहे…. त्यात गर्भसंस्कार हास्यापद असून त्यात अजिबात तथ्य नाही असे सांगितले आहे….यावर माझं मत…. 
गर्भसंस्काराला…. अप्रत्यक्षपणे आयुर्वेदाला थोतांड म्हणणारे यांना आयुर्वेदाचा कवडीचा अभ्यास नसतो…

IUI आणि IVF च्या नावाखाली लाखोंच्या घरात  package घेणारे आयुर्वेदाच्या पंचकर्माने जर pregnancy राहत असेल तर घाबरणारच ना !!!

Package घेताना failure chances किती आहेत याची कल्पना किती patients ला दिली जाते???पंचकर्म चिकित्सेत कोणताही व्याधी बरा करण्याची ताकद आहे . Infact संधीवात (जिथे आधुनिक शास्त्रात painkillers व steroids शिवाय पर्याय नाही ), सोरायसिस, कावीळ, जुनाट पोटाचे विकार, Allergic rhinitis (सर्दि) अशा कित्येक विकारांना आयुर्वेद संजीवनी ठरते..

       बरं… गर्भसंस्काराबद्दल बोलायचे तर हा सुद्धा षोडश संस्कारांपैकी एक संस्कार आहे.त्याला ”गर्भाधान संस्कार” असे म्हटले आहे.

      गर्भाधान संस्कार हा गर्भधारणा राहण्याआधीपासूनच केला जातो (Pre- conceptional) ज्यामध्ये पंचकर्म, आहार- विहार बदल, प्राणायाम इ.चा समावेश होतो.

पंचकर्माच्या वापराने शरीराची संपूर्ण शुद्धी होते (Detoxification). आणि हो…. उत्तरबस्ती या चिकित्साकर्माने  गर्भाशयाची शुद्धी होते. उत्तरबस्ती म्हणजेच  योनिमार्गाव्दारे औषधी द्रव्य गर्भाशयात प्रविष्ट करणे.

त्र्यावर्तयोनी (हे शब्द समजण्यासाठी आयुर्वेदाचा अभ्यास गरजेचा आहे.)… त्र्यावर्तयोनीची रचना व कार्य सुस्थितीत असणे हे अपत्यप्राप्तीसाठी आवश्यक असते.  या संपूर्ण भागावर अपानवायूचे वर्चस्व असते.अपानवायूच्या दुष्टिमुळेच गर्भपात/ गर्भस्त्राव संभवतात.

स्नेहन,स्वेदनपूर्वक पंचकर्मासोबत उत्तरबस्ती केल्यास गर्भाशय दुष्टी संभवत नाही व गर्भाशय गर्भधारणेस पोषक ठरते.आहार-विहार व पंचकर्म हे सर्व प्राकृत झाले की राहणारा गर्भ हा चांगल्यारित्या पोसला जाणार आहे…आणि collectively याचा फायदा गर्भवर्ण व गर्भाचे इतर features उत्तम करण्यात होतो.

वात- पित्त- कफ तसेच त्यांचे प्रत्येकी ५ भेद पंचकर्माने सुस्थितीत येतात.त्यातीलच पित्ताचा भेद भ्राजक पित्तानेच त्वचेचा वर्ण ठरतो. हे भ्राजकपित्त जेवढे प्राकृत असेल तेवढा वर्ण चांगला होतो.

याशिवाय specific महिन्यात specific अवयवांची निर्मिती होत असते. आयुर्वेदीय औषधी चिकित्सा ती त्या त्या अवयवाला पोषण देऊन ते उत्तम बनविते.

याशिवाय मंत्रोच्चार करणे वा आचार रसायन यात काय वाईट आहे????

    यामुळे मनाची सात्त्विकता वाढून रज-तम हे मनाचे दोष कमी होतात.

आयुर्वेद हे एक असे शास्त्र आहे,जिथे शरीरासोबत मनाचाही विचार केला जातो…

        गर्भसंस्कारात या सर्व गोष्टींची समावेश असल्याने कोणत्याही गैरसमजात अडकून न राहता आयुर्वेदाचा पुरेपूर फायदा घेण्यात  काही वावगे आहे असं मला वाटत नाही…

उलट IUI,IVF च्या आधी नक्कीच आयुर्वेदाचा विचार करावा.

     

– Dr.Rajashri.Patil 

  M.D.(panchakarma)

  Urja multispeciality clinic, koperkhairane, navi mumbai

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s