Ayurved · Gynaecology · Health

​स्रीयांमधील रक्तप्रदराची कारणे उपद्रव 

स्रीयांमधील रक्तप्रदराची कारणे उपद्रव 
१.खारट आंबट पचावयास जड पदार्थ खाणे

२.तिखट शरीरात विदाह निर्माण करणारे स्निग्ध चिकटा निर्माण करणारे पदार्थ खाणे

३.मेदस्वी प्राण्यांचे मांस खाणे

४.खिचडी (कृशरा) खीर दही दह्यावरचे पाणी यांचे सेवन करने

५.मद्यपान करणे

पाळीच्या कालातील सांगितलेले नियम न पाळणे आदी कारणांनी बिघडलेला वात अगोदर सांगितलेल्या कारणांनी वाढलेल्या रक्ताला मासिक स्रावासोबत शरीराबाहेर काढतो. मासिक स्रावाचे प्रमाण वाढल्या कारणाने रक्तप्रदराचा त्रास निर्माण होतो. अशावेळी रक्त निर्मितीमध्ये आहार औषधीद्वारे दुरूस्ती आवश्यक असते.

फक्त औषधींद्वारे शरीरातील बाहेर पडणारा स्राव बलपुर्वक अडवणे असंख्य उपद्रव स्वरूपी आजार निर्माण करू शकते 👇🏻👇🏻👇🏻
रक्तपित्तं ज्वरं तृष्णामग्निसादमरोचकम् |

कामला श्वयथुं शुलं गुदवक्षंणसंश्रयम् ||

कण्ड्वरूःकोठपिडकाः कुष्ठं पाण्ड्वाह्रयं गदम् | 

वातमुत्रपुरीषाणां विबन्धं शिरसो रूजम्||

स्तैमित्यं गुरूगात्रत्वं तथा$न्यान् रक्तजान् गदान् |

तस्मात् स्रुते दुष्टरक्ते रक्तसंग्रहणं हितम् ||
          अशावेळी जर दुषित रक्ताला बाहेर पडु न देता अडविण्याचे प्रयत्न केले तर दुषीत रक्ताद्वारे पुढील त्रास सुरू होऊ शकतात.

        रक्तपित्तं (शरीरातील इतर विवरातुन रक्तस्राव), ताप, तहान अधिक लागणे, भुक कमी होणे, तोडांला चव नसणे, कावीळ, सुज, वेदना, खाज, त्वचेवर चकते पिटिका निर्मिती, पांडु सहित अनेक आजार होऊ शकतात. तसेच मल मुत्र अधोवायुचा अवरोध होणे कष्टाने मल मुत्र होणे, डोकेदुखी, ओलसरपणाची जाणीव होणे, सर्वांग जड पडणे तसेच अन्य रक्तदुष्टी जन्य आजार उत्पन्न होऊ शकतात.

  त्यामुळे दुषीत रक्त शरीराबाहेर पडल्यानंतर रक्त थांबवण्यासाठी प्रयत्न करणे शरीरासाठी हितकारक असते. अन्यथा रक्त शरीराबाहेर पडावयाचे थांबते पण दुषीत रक्त आडवल्यामुळे उत्पन्न अन्य आजारांचा सामना करावा लागु शकतो.

नेहमी नेहमी दुषीत रक्त अडविणारे उपाय केले की शरीरातील दुषीत स्राव व रक्ताचे प्रमाण अत्याधिक वाढत जाते. मग अत्याधिक रक्तस्राव मासिक स्रावासह होतो जो औषधांनी थांबत नाही. ज्यामुळे स्री शरीरातील अतिशय महत्वाचा असणारा अवयव म्हणजे गर्भाशय (uterus) काढुन टाकावा लागतो.

नंतर वजन वाढणे हाडे झिजणे निद्रानाश harmonal imbalance जन्य thyroid सारख्या असंख्य उपद्रव स्वरूपी आजारांचा कायम स्वरूपी सामना करावा लागतो.

सुरूवातिलाच नजिकच्या तज्ञ आयुर्वेदिय वैद्याकडुन तपासणी करून स्वतच्या आहार विहारातील दुरुस्ती दिनचर्या ऋतुचर्या औषधी यांची माहिती घेतली तर भविष्यातील असंख्य उपद्रव स्वरूपी आजांरापासुन दुर राहता येईल.
पाळीच्या काळातील पाळावयाचे  नियम
१.झोपण्यासाठी चटईचा वापर करणे गादी वैगेरे न वापरणे.

२. शारीरीक व मानसिक हिंसा न करणे, ब्रह्मचर्य पालन करणे.

३.सात्विक आहाराचे सेवन करावे.

४.या काळात रडणे, नखे काढणे, अंगाला तैल उटणे लावणे, डोळ्यात काजळ वा अंजन लावणे, स्नान करणे, दिवसा झोपणे, धावणे, मोठे शब्द एेकणे, फार हसणे, फार बोलणे, फार श्रम करणे, भुमिखनन करणे, वारा लागेल अशा ठिकाणी बसणे, अशा वायुला बिघडवणारया प्रकुपित करणारया गोष्टी करू नयेत.

वैद्य गजानन मॅनमवार

श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय

2nd Floor Sharma Chembers

Above Samudra Hotel Nal Stop Pune

Cont. No – 9028562102, 9130497856

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s