Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

     

   *आजची आरोग्यटीप 19.04.2017*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
       *जगण्याची साधी सोप्पी तत्वे*
                    *भाग दहा*
 आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार
 *जगण्यासाठी औषध काम करत नाही.*
काही गोष्टी आपण गृहीत धरतो, जसे एकदा रक्तदाब वाढला म्हणजे तो रोग मला झाला, एकदा कधीतरी रक्तात साखर मिळाली म्हणजे मला डायबेटीस झाला, एकदा रिपोर्ट मधे कोलेस्टेरॉल वाढलेले दिसले, आता जेवणातले तेल तूप नारळ शेंगदाणे बंद करायला हवेत. असंही नाही.
काही जणांना मात्र उगाचच औषधे घेण्याची हौस असते, किंवा मी औषधांशिवाय जगूच शकणार नाही अशी भीतीदेखील असते. आणि औषधे सुरू केली जातात. ही औषधे घेतली की मी बरा राहीन, आता मला काही होणार नाही, अशी भाबडी आशा असते.
कायमस्वरुपी  औषध ही संकल्पना आयुर्वेदात नाही. जेव्हा रोग तेव्हा औषध. नाहीतर कशाला हवंय औषध ? रोग वाढू नये याकरीता औषध, रोग होऊ नये यासाठी औषध, प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी औषध, रक्तवाढीसाठी औषध, कॅल्शियम सप्लीमेंटसाठी औषध, फूड सप्लीमेंटच्या नावाखाली औषधं  हे केवळ बिझनेस फंडे आहेत, हे लक्षात घ्यावे. 
ताप आला तर औषध जरूर घ्यावे. ताप येऊ नये यासाठी औषध घ्यायचे नसते. तसे चक्कर वगैरे येत असेल तर औषधांचा विचार करावा, पण चक्कर येऊ नये यासाठी चक्क औषधे ? रोग  वाढला तर, हा भविष्याचा विचार अस्वस्थ करतो आणि भीतीपोटी कायमचे औषध सुरू होते.
औषध कसे असावे, यासाठी ग्रंथात एक प्रमाण दिले आहे. अल्पमोली बहुगुणी असावे. एका औषधाने दुसरा रोग निर्माण होऊ नये, किंवा एका औषधाचे दुष्परिणाम होऊ नयेत, याकरीता दुसरे, त्यासाठी तिसरे, चौथे औषध घ्यावे लागू नये. 
एखादे औषध डोकेदुखीसाठी जरी घेतले तरी जाते पोटातच !  पोटात गेल्यावर फक्त जिथे डोके दुखते, त्या डोक्यामधेच ते जाते का ? नाही. सर्व रक्तात ते औषध मिसळून जाते. एखाद्या अवयवाला ठीक करण्यासाठी अन्य पाच सहा निरोगी अवयवांना आपण जास्ती कामाला लावत नाही का ? 
ही औषधे शरीरातून बऱ्या बोलाने बाहेर पडतंच नाहीत. येतो तो मुक्कामीच येत असतो. आतडी, किडनी, यकृत, डोळे अशा नाजुक अवयवांना नाहक हा कचरा साठवून ठेवावा लागतो. 
आपले संविधान असे म्हणते, शंभर आरोपी सुटले तरी चालतील, पण एका निरपराध्याला शिक्षा होता नये. इथे तर सगळं उलटंच चाललेलं आहे. एका दोषी अवयवाला निर्दोष करण्यासाठी बाकी सर्व अवयवांना जणु काही वेठीला धरले जातंय, त्यांच्यावर अन्याय करीत, एखाद्या अवयवाला सांभाळण्याची कसरत केली जातेय. बरं इथे जनरली प्रत्येक अवयव प्रत्येक डाॅक्टरने वाटून घेतलेले. प्रत्येक तज्ञ धडपडतोय, माझ्या अवयवाचाच मी विचार करणार ! बाकीचं तुमचं तुम्ही बघा ! 
कुणी कुणाचे नाही राजा, 

कुणी कुणाचे नाही. 

लळा जिव्हाळा शब्दच खोटे.
पण शरीरातील अवयव जन्मापासूनच एकमेकांशी रक्ताने बांधलेले आहेत म्हणून काय कोण जाणे, पण हे सर्व अवयव एकमेकांना स्वतःच जीव धोक्यात घालून, त्यांच्यावरील हा औषधांचा मूक अत्याचार दूर करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावीत असतात. 
हे डाॅक्टरांचे नशीब ! 
वैद्य सुविनय दामले.

कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021

19.04.2017
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s