Ayurved · Health

​Let’s talk about the concept ‘स्व’ ‘स्थ’!

Let’s talk about the concept ‘स्व’ ‘स्थ’!
Health किंवा healthy हा शब्द सध्याचा trendy शब्द आहे.अन्न,औषधे,सौंदर्य प्रसाधनं,हवा,इतकेच काय तर कपडे, घरं वगैरे कशालाही हे विशेषण लावले जातेय.या शब्दाचा सर्रास अर्थ ‘स्वास्थ्य’ म्हणून घेतला जातो. खरे तर हे भाषांतर खूप वरवरचे आहे. 
HEAL शब्दापासून HEALTH शब्दाची निर्मिती झाली आहे. बरे होणे या अर्थी health शब्द येतो. पण ‘स्वास्थ्य’ शब्द हा फक्त बरे होण्यासाठी अभिप्रेत नाहीये. ‘स्व’ त्याच्या ‘स्थानी’ असणे म्हणजे स्वास्थ्य! हा असा ‘स्व’ चा अर्थ ‘पिंडापासून’ ते ‘ब्रम्हांडा’ पर्यंत अपेक्षित आहे.

 

भूमीतून अन्न धान्य प्रसवण्यापासून ते आपण ते पचवण्यापर्यंत सातत्याने त्यावर ‘प्रक्रिया’ घडत असते. या सर्व स्थूल आणि सूक्ष्म पचन व्यापारात सारभूत आणि मल असे दोन्ही भाग तयार होतात आणि ते त्या त्या वेळी आणि त्या त्या जागी तयार होणे म्हणजेच ‘स्व’ स्थानी असणे हे ‘नैसर्गिक’ अथवा ‘स्वाभाविक’ आहे. हि ‘स्वभाविकता’ म्हणजेच ‘स्वाथ्य’ होय. 
याच ‘स्वभाविकतेपासून’ दूर जाणे म्हणजेच ‘आजारी’ पडणे होय. आणि यानंतर केली जाणारी उपाययोजना म्हणजे ‘healing’ अथवा ‘curing’ होय. स्वाभाविकता जपण्यासाठी ‘दिनचर्या’ ‘ऋतुचर्या’ सांगितली गेली. यांच्या आधाराने शरीरातील सगळेच ‘घटक’ ( दोष,धातू,मल) ‘स्व’ ‘स्थानी’ राहून उत्तम ‘स्वास्थ्य’ लाभते. 
हीच अवस्था ‘सर्वदेह व्यापी’ मनाला ‘पोष्य’ असते, आणि यामुळे ते देखील ‘स्व’ ‘स्थ’ असते. जसे सात सूर एका विशिष्ठ लयीत सुरात एकत्र येऊन सुश्राव्य आनंददायी ठरतता, तसेच ‘स्व’ ‘स्थ’ शरीर आणि ‘स्व’ ‘स्थ’ मन एका लयीत आनंददायी निरोगी आयुष्य जगतात. 
मनाच्या ‘स्वस्थतेचा’ विचार करताना शरीर या ‘अधिष्ठानाचा’ विचार अवश्यमेव ठरतो. शरीर आणि मन यांच्यातील harmony लक्षात घेता डळमळीत ‘अधिष्ठान’ मनाच्या ‘स्वास्थ्यासाठी’ योग्य नाही हे लक्षात येते.
त्यामुळे आजच्या दिवशी मायबाप WHO ने दिलेला ‘नैराश्याचा’ नारा नेमके कुणाचे ‘स्वास्थ्य’ लक्षात आणून देतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

 शरीर स्वास्थ्या बरोबरच, उत्तम पोषक विचार, आणि आचार या गोष्टीही नितांत आवश्यक आहेत. 
आपल्या भोवतीच्या अनेक गोष्टी ‘स्व’ ‘स्थ’ नाहीत. जैविक साखळीतील एक क्षुद्र घटक आहोत आपण आणि यातील एकही शृंखला ‘स्व’ ‘स्थ’ नाही. परिणामी सर्व बाजूंनी नैराश्याच्या लहरी आल्या तर नवल करायला नको.
त्यामुळे let’s talk about depression जेव्हा म्हणतोय तेव्हा let’s talk about all these things which are affecting ‘स्व’ ‘स्थ’!
धन्यवाद 

वैद्य ज्योत्स्ना पेठकर 

परिवर्तन आयुर्वेद

सुख प्रसव आणि संगोपन 

९७६४९९५५१७

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s