Ayurved · GarbhaSanskar · Health

आयुर्वेद कट्टा

🍃 !! *आयुर्वेद कट्टा*!!

    # *गर्भावस्थेतील मधुमेह* #

आई होण्याची चाहूल हे स्त्री च्या आयुष्यातले वरदान आहे… पण जर याला मधुमेह या व्याधीची जोड़ मिळाली तर या वरदानाला एक प्रकारे  ग्रहण लागते..त्या स्त्रीला असुरक्षित वाटायला लागते..!! कधी कधी या अवस्थेचा उगाचच बाऊ केला जातो अस लक्षात येतं..!! अर्थात योग्य ती काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं ठरतं कारण शेवटी हा प्रश्न पोटात वाढत असलेल्या एका नाजूक जिवाचा असतो.. चला या विषयी जरा अधिक समजून घेवू…!!

      एखादी मधुमेही स्त्री गरोदर रहाणे आणी गरोदर रहिल्यानंतर मधुमेह होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत हे आधी लक्षात घ्यायला हवे… जर आधीच मधुमेह असेल तर अश्या व्यक्तींनी वैद्यकीय सल्ला घेवुन मग बाळाचा विचार करावा म्हणजे आधीपासूनच रक्तातील ग्लूकोस नियंत्रणात आणता येईल आणी योग्य ते औषध घेऊन बळावर होणारे दुष्परिणाम टाळता येतील..!!

    गरोदर झाल्यावर मधुमेह होणे हा दुसरा प्रकार.. याला gestational diabetes असेही म्हणातात.. हा शक्यतो 24 ते 28 आठवडयात सुरू होतो..कारण या काळात शरीर आवश्यक तेवढे इन्सुलीन निर्माण करू शकत नाही.. याचे निदान ग्लूकोस टोलरन्स टेस्ट द्वारा केले जाते..गर्भधारने पूर्वी  जर वैद्यांच्या सल्ल्याने शास्त्रोक्त वमन करुन घेतले तर गर्भारपनात मधुमेह होण्याचा धोका कमी असतो..!! तसा हा प्रकार कोणालाही होऊ शकतो पण खालील लोक जास्त रिस्क मधे असतात:-

1- खूप जास्त वजन असलेले 

2- अधिक चर्बी (फॅट )असलेले 

3- वयाची पस्तीशी ओलांडल्यानंतर राहिलेली गर्भावस्था 

4- आनुवंशिकता 

काही स्त्रीयांमधे या मधुमेहाची काही लक्षणे दिसत नाही तर काहींमध्ये  खालील लक्षणे आढळतात

1- खूप तहान लागणे 

2- वारंवार होणारी मूत्रप्रव्रूत्ति 

3- अति प्रमाणात थकवा येणे 

   आता या स्त्रीयांनी कोणती काळजी घ्यावी ??

 * वैद्यानी सांगितलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळावे… त्यात कोणताही हलगर्जीपणा नकोच..

* वेळोवेळी रक्तातील साखरेची चाचणी करुन घेणे आवश्यक आहे.. त्यामुळे योग्य ते औषध घेऊन साखर नियंत्रित राहण्यात मदत होइल 

* आहार हा भारतीय पद्दतीचा घेतला तर अति उत्तम…डाळ भात पोळी भाजी भाकरी इ. सर्व पदार्थ खावेत( पण प्रमाणात.. ) हे सर्व बनवण्यासाठी वापरले गेलेले धान्य हे कमीत कमी 2 वर्ष जुने असेल तर अति उत्तम..नसेल तर धान्य आधी भाजून मग पीठ करुन वापरावे… साखर ही कमीत कमी घ्यावी..फळांचे रस शक्यतो घेऊ नये.. खूपच गरज वाटल्यास फळ चावून खावे..

* जेवणानंतर कमीत कमी 15 मिनट चालावे.. डॉक्टर ने बेड रेस्ट संगीतला याचा अर्थ 24 तास बेडवरच रहावे असा होत नाही.. आवश्यक तेवढा आराम करुन थोडी हालचालही करावी नाहीतर अनावश्यक चर्बी वाढून मधूमेहाचा धोका वाढतो..

कोणतीही औषध वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावी.. घरगुती प्रयोग जीवघेणे ठरू शकतात.. आमचे हे चूर्ण घेऊन मधुमेहा पासून 100% मुक्ति मिळवा अश्या खोट्या आश्वासनांना बळी पडू नये..

* तुमच्या वैद्यांना तुमची काळजी आहे ते नक्कीच योग्य आणी आवश्यक तेवढी औषधे देतील.. त्यांच्यावर विश्वास ठेवा..

* आणी सर्वात महत्वाचे प्रेग्नेन्सी हा काही आजार नाही..येणाऱ्या बाळाकडे साकारत्मक द्रुष्टीने पहा.. कधी कधी मधूमेहाचे नाही तर आई ने घेतलेल्या अनावश्यक ताण तणावांचे दुष्परिणाम बळावर होताना दिसतात…त्यामूळे शरीरातील साखर कमी करुन मनातील गोडवा कसा वाढेल या कडे लक्ष दयावे आणी येणाऱ्या नवीन पाहुण्याचे आनंदाने स्वगत करावे

  *वैद्य शुभंदा गुंजाळ-चौखंडे*

        *अकोला*

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s