Ayurved · Health

​नास्ति द्रव्यम् अनौषधम् !

​नास्ति द्रव्यम् अनौषधम् !
वनस्पतीजन्य, प्राणीजन्य, खनिजजन्य, अशा अनेक गोष्टी औषध म्हणून सिद्ध होऊ शकतात. एव्हढेच नव्हे तर कुणाचातरी आश्वासक शब्द, हव्याशा वाटणाऱ्या व्यक्तीचा सहवास,कुणाचातरी भावनेने ओथंबलेला स्पर्श, सुमधुर स्वर, उत्कृष्ठ कलाकृती, एखादा पदन्यास असे काहीही ‘औषध’ म्हणून सिद्ध होऊ शकते. 
प्रश्न आहे फक्त कुठे काय कसे किती प्रमाणात  वापरावे?
म्हणजेच ‘योजक: तत्र दु र्लभ:’!
निसर्गातील अथवा सभोवतालच्या कुठल्याही पदार्थाचा ‘औषध’ म्हणून उपयोग ‘नेमकेपणाने’ सांगणारा ‘योजक’ हा ‘दुर्लभ’ सांगितलाय, म्हणजे ज्याला हे ‘logic’ माहितेय असा व्यक्ती सहज सापडणे होत नाही. 
यासाठीच ‘वैद्य’ नेमकेपणाने तयार होत असतो. मुळातच ‘विद्’ म्हणजे ‘जाणणे’ या धातूपासून ‘वैद्य’ शब्द तयार झालाय. आपल्या अभ्यासक्रमानुसार आणि ‘गुरुकुल’ पद्धतीने रीतसर शिक्षण घेऊन एक ‘वैद्य’ तयार होतो आणि ‘औषधी’ योजना करण्यासाठी सिद्ध होतो. कुठले ‘औषध’ कुठे, किती प्रमाणात, कुणाला, कशाप्रकारे द्यावे या बद्दल त्याला रीतसर ज्ञान असते.
हि सगळी पार्श्वभूमी यासाठी लिहितेय की, सध्या ‘olive oil’, ‘जवस’,’ ‘मध-पाणी’,’पंचगव्य’ अशा अगणित गोष्टी फारच ‘HEALTHY’ म्हणून कुणीही, कुठेही, कशाचाही विचार न करता सरसकट ‘सेवन’ करतायेत.
अमुक एक गोष्ट उपयोगी अथवा ‘स्वास्थ्य वर्धक’ कशी याचा सांगोपांग विचार करणे गरजेचे आहे, पण स्वतंत्र विचार करण्याची पध्दत अथवा “CONCEPTUAL LEARNING” याच्या अभावामुळे फक्त ‘blind followers’ तयार होतायेत.
वर उल्लेख केलेल्या गोष्टी नक्कीच ‘औषध’ म्हणून उपयोगी ठरू शकतील फक्त त्यांची ‘योजना’ योग्य पद्धतीने आणि योग्य ठिकाणी केली जाणे आवश्यक आहे. 

सदर चित्रात ‘पंचगव्यघृत युक्त चवनप्राश’ हे औषध ‘कॅल्शिअम युक्त चवनप्राश’ या प्रकारा सारखेच ‘आक्षेपार्ह’ आहे. मुळातच या दोन्ही कल्पांचा रस,वीर्य, विपाक, प्रभाव आणि उद्देश पूर्णत: भिन्न आहेत. आणि अगदीच कुठल्या ‘वैद्याला’ असे वाटले की असाही काही प्रयोग करून बघावा तर, याची गणना ‘विशिष्ठ’ कल्पात होऊन काही ‘विशिष्ठ’ लोकांसाठी याची योजना करावी लागेल. सरसकट सर्वांना ‘so called healthy’ म्हणून घेता येणार नाही. 
एक व्यवसाय म्हणून जेव्हा एखादी गोष्ट बाजारात येते तेव्हा त्याचे विक्रीचे निकष आणि खप वाढवण्यासाठीचे प्रयत्न हा एक स्वतंत्र मुद्दा आहे. आरोग्याशी या गोष्टींचा  सुतराम संबंध नसातो.
आंधळे प्रशासन, वैचारिक स्वातंत्र्य नसलेली जनता, आणि आयुर्वेद शास्त्रात चालेलेली ढवळाढवळ पाहून स्वस्थ बसणारे वैद्य या तीनही गोष्टी मस्त जुळून आल्यात आणि त्यामुळे हे आणि असे अगणित products बाजारात येत राहणार …..पण जनतेला एक विनंतीवजा सूचना आहे की आपल्या माहितीतल्या योग्य ‘वैद्याला’ गाठून अमुक एक उत्पादन आपल्या आरोग्यासाठी योग्य आहे की नाही याची पडताळणी करून घ्यावी. 

कारण ‘योजक: तत्र दुर्लभ:’ आणि औषधी योजना करण्यासाठी ‘वैद्य’ हा योजक आहे.
धन्यवाद 

वैद्य ज्योत्स्ना पेठकर

९७६४९९५५१७  

परिवर्तन आयुर्वेद 

सुख प्रसव आणि संगोपन

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s