Ayurved · Health

​#संधिवात

​#संधिवात 

भाग १
परवा सकाळी म्हणजेच सोमवारी वैभव चा फोन आला , 

डॉक्टर गुढघे खूप दुखत आहेत , तुम्हाला सांगायचं म्हणतोय एक महिना झालं पण वेळच मिळत न्हवता (आजाराकडे दुर्लक्षित करण्याच पेटंट कारण) 

मी विचारलं दोन्ही कि एकच दुखतोय ? अन नक्की केव्हापासून दुखतोय ? 

तसं दुखतोय सहा महिने झाले पण एक महिन्यापासून जास्तच दुखतोय अन दोन्ही दुखतायत जास्त करून सकाळच्या वेळी.

‘वैभव’ वय वर्षे 30 , मल्टि नॅशनल कंपनी मध्ये स्व कर्तृत्वावर मॅनेजर पदी पोहोचलेला एक प्रातिनिधिक तरुण …

असे किती तरी वैभव हे वयाच्या तिशीतच संधिवाताचे रुग्ण बनू लागलेत, कुणाचे गुढघे तर कुणाची कंबर कुणाची मान तर कुणी छोट्याश्या अपघातात फ्रॅक्चर चा बळी…

#ऑस्टिओपोरोसिस हा शब्द तर आता सर्दी शब्दा इतका सामान्य झाला आहे,

तिशीतच वाढलेलं वजन, व्यायामाचा पूर्ण अभाव किंवा  अतिरेक (हो, हे देखील संधीवाताच कारण आहे)

पण कॅलशियम चा अभाव व अनुवंशिकता सोडून इतर कारणांकडे कायम दुर्लक्ष केले जाते ती म्हणजे…

1) प्रवास – अत्याधिक स्वरूपातील प्रवास ( जी आजकालची व्हाट्सअप सारखी गरज बनत चालली आहे) शरीरातील वात वाढवून संधिवात निर्माण करतो.

2)जागरण- रात्री 1 ला झोपणे व पहाटे 9 वाजता उठणे हि मॉडर्न दिनचर्या कमी वयात संधिवात निर्माण करण्यास कारणीभूत ठरते.

3) उपवास- डाएट च्या नावाखाली असो किंवा देवाच्या नावाखाली असो अधिक प्रमाणात उपवास हा सांध्यांची झीज लवकर घडवून आणतो.

4) मानसिक ताणतणाव – हो, अत्यंत चिंता हि चिता लवकर प्राप्त करून देते मग ते सांधे असोत वा हृदय वाईट परिणाम हा होणारच
शिवाय , #मद्याचे अतिरिक्त सेवन, पूर्वी झालेला आघात व फक्त ठराविक पदार्थ जास्त खाण्याची सवय आदी करणे संधिवातास कारणीभूत ठरतात…

संधिवातास कारणीभूत आहार, प्रतिबंधात्मक उपचार  व काळजी पुढील लेखात …

डॉ निलेश पाटील 

वेदाग्नि आयुर्वेद 

9970278707

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s