Ayurved · Health

आजची आरोग्यटीप 

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

   आजची आरोग्यटीप 28.11.16

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
                *आहार रहस्य*
        *आहारातील बदल भाग 66*

               

           *चवदार आहार -भाग 28*
आपण आहारातील या चवी वेगवेगळ्या अभ्यासल्या. प्रत्यक्षात मात्र  अगदी एकाच चवीचे पदार्थ आपण खात नाही. किंवा जे पदार्थ खातो, त्यात अनेक चवी एकत्र झालेल्या असतात. किंवा असेही काही पदार्थ आहेत, ज्यांच्यामधे एकापेक्षा जास्ती चवी चाखायला मिळतात, काही पदार्थांचे परिक्षण करून कोणत्या कोणत्या चवी त्यांच्यात चवी मिळतात, हे ऋषींनी अभ्यासून ठेवले आहे.
जसे लसूण. हिचे संस्कृत नाव रसोन असे आहे. म्हणजे एक रस ऊन म्हणजे कमी. आंबट रस सोडून बाकी सर्व चवी लसणीमधे असतात. म्हणून लसूण आंबट पदार्थाबरोबर घेतली तर सहा चवी एकत्रितरीत्या पोटात जातात. म्हणून ताकाच्या कढीत लसूण हवीच ! किंवा लसणीच्या चटणीत चिंच हवीच. तर तो पदार्थ *पूर्ण* होतो.
 तसेच आवळ्याची मुख्य चव आंबट. इतर तुरट, गोड इ. चवी देखील कमी अधिक प्रमाणात आवळ्यात असतात. पण आवळ्यात खारट चव मात्र नसते. म्हणून मीठात मुरवलेला, मीठ लावून वाळवलेला, किंवा नुसता आवळा मीठाबरोबर का खातात, ते समजले ? 
नित्यं सर्व रसाभ्यासः !  चरकाचार्यांनी सहाही चवींचा आहार असावा असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. मग गोड खायचे नाही, आंबट चालत नाही, तिखट तर अजिबात नको असं नाकं मुरडत खाण्याची काही आवश्यकता नाही.
पहिलं खाल्लेलं पचवायला पुरेसा वेळ दिला तर, कोणताही पारंपारिक, आणि स्वतःला आवडणारा आहार, आपल्याला पचू शकतो. त्याचा उपद्रव न होता, शरीराचे आणि मनाचे उत्तम पोषण आणि प्रीणन होते. 
अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर 

गोड, आंबट खारट पदार्थ वात कमी करतात. आणि कफ वाढवतात.

कडू तिखट आणि तुरट चव वाताला वाढवतात आणि कफाला कमी करतात.

खारट आंबट तिखट चवी पित्ताला वाढवतात.

गोड कडू तुरट पित्ताला कमी करतात.
मन प्रसन्न करणारा, शरीर पुष्ट करणारा, एवढा चवदार आहार आपण एवढा बदलून टाकलाय, की या चवीष्ट बलीष्ट आहाराच्या अभावांमुळे नियमितपणे औषधे मात्र घ्यावी लागत आहेत.
वैद्य सुविनय दामले 

कुडाळ, सिंधुदुर्ग  9673938021

28.11.2016

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s