Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

   आजची आरोग्यटीप 25.11.16

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
                *आहार रहस्य*
        *आहारातील बदल भाग 63*

               

           *चवदार आहार -भाग 25*
औषध म्हणजे कडू. हे लहान मुलांनापण माहिती आहे. औषध लागू पडते, ते त्याच्या अंगभूत गुणांमुळे. 
त्याची चव, त्याचे गुण, त्याची मात्रा, त्याची कार्यकारी शक्ती,  त्याचा पोटात गेल्यावर होणारा परिणाम, त्याचे विभिन्न अवयवांवर होणारे वैयक्तिक किंवा एकत्रित परिणाम, त्याचा प्रभाव, त्यामुळे आतमधे होणारे भौतिक अथवा रासायनिक किंवा भावनिक बदल या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो. शिवाय औषध देत असताना वैद्याने रूग्णांशी काही वेळा गोड आंबट कडू बोलत, आपली शक्ती औषधांमधे मिसळायची असते. औषधाबद्दल विश्वास वाढवायचा असतो. तरच ते औषध विशिष्ट ठिकाणी जाऊन विशिष्ट काम करते. असे आयुर्वेद मानतो. त्यामुळे एखादे औषध प्रत्येकावर तोच, तसाच परिणाम दाखवेल असे नाही.
जसे पॅरासिटामोल हे औषध समजा आयुर्वेदीय मानले तर त्याची गोळी कडू चवीची असते. आणि सिरप गोड चवीचे असते. आयुर्वेदानुसार गोड चव कफ वाढवते. त्यात लहान मुलांचे वय हे कफाला वाढवणारे असते. म्हणजे लहान मुलांना हे औषध वापरायचे झाले तर सिरपपेक्षा  गोळी वापरावी, जी चवीला कडू आहे. कडू चव वात पित्ताला वाढवते. पण लहान मुलांचे कफाचे वय हे पित्ताला विरोध करणारे असल्यामुळे त्यांना फायदाच होईल. असे मत माझे मित्र संगमेश्वर स्थित वैद्य अजित जोग म्हणायचे. 
आयुर्वेदाचे हेच वैशिष्ट्य आहे फक्त जीभेला गोड लागावे एवढाच त्या गोड किंवा कडू चवीचा उद्देश नसून वय आणि प्रकृतीचाही संबंध चवीशी येतो. फार खोलात जाऊन विचार करू नका. सहज आठवलं ते लिहिलं.
वैद्य सुविनय दामले 

कुडाळ, सिंधुदुर्ग  9673938021

25.11.2016

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

[27/11, 10:56] ‪+91 98197 74205‬: 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

   आजची आरोग्यटीप 26.11.16

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
                *आहार रहस्य*
        *आहारातील बदल भाग 64*

               

           *चवदार आहार -भाग 26*
सहा चवीपैकी शेवटची राहिली तुरट चव.

तुरट या नावातच तुरटीची चव ज्याला ती तुरट असे लक्षात येते. 
हिरडा, पालेभाज्या, कात, सुपारी, त्रिफळा चूर्ण  ही काही तुरट चवीची उदाहरणे आहेत.
सर्व तुरट पदार्थ वातवर्धक आणि कफ शामक आहेत.
हिरडा सोडला तर बाकी सर्व तुरट पदार्थ मलविबंध करवतात. (म्हणजे मराठीत काॅन्स्टीपेशन. )
स्तंभन म्हणजे आकुंचित करणे हे महत्वाचे काम ही चव करते. या एका अति महत्वाच्या गुणामुळे ती वैद्यकीय क्षेत्रात कमालीची प्रिय झाली आहे.
रक्तवाहिनींचा संकोच करीत असल्यामुळे रक्तस्राव थांबवणारी,त्यामुळे शस्त्रकर्मींना हुकुमी शस्त्रच जणु ! 
आतड्यांचे, गुदमार्गाचे आकुंचित करत असल्यामुळे अतिसार कमी करणारी, सहन होत नाही, सांगताही येत नाही वाले सगळे खुश !  
तसेच पित्त वाहिनीचा संकोच झाला तर पित्ताचे स्रवण पण कमी करण्यासाठी वापरली जाणारी, म्हणजेच पित्तशामक गुणाची त्यामुळे गॅस्ट्रोएन्टराॅलीस्टना भक्कम आधार देणारी.
रोमकुपांचा संकोच झाल्यामुळे घाम कमी करणारी, त्यामुळे त्वचारोग तज्ञांना सावरून घेणारी.
शुक्रवाहिनीचा संकोच झाल्यामुळे शुक्राच्या बाहेर पडण्यावर बंधन आणणारी, म्हणून शीघ्रस्खलनामधे उपयोगी ठरणारी, म्हणजेच सेक्स स्पेशालिस्टच्या भात्यातील मदनाचा बाणच जणु !
केस जिथून उगवतात, त्या पेशींना आकुंचित करत असल्यामुळे केस गळणे कमी करण्यासाठी सुद्धा वापरता येते. म्हणजे स्त्रीयांची जीवश्च कंठश्च सखी ! 
मूत्रमार्गाचा अवरोध करत असल्यामुळे लघवीचे प्रमाण कमी करवणारी, म्हणून मधुमेह तज्ञांना मदत करणारी
स्थूलता कमी करण्यासाठी, भूकेवर संयम आणण्यासाठी पण ही तुरट चव वापरता येते. म्हणजे ढेरपोटे, तुंदीलतनु कमी करण्यासाठी धडपडणारे स्लीम सेंटर वाले भी खुश !  
हिरड्यांना बलदायक आहे. म्हणून प्रत्येक दंतमंजनामधे वापरली जातेच जाते. दातांची हलणारी मुळे या संकोच गुणामुळे मजबूत होतात. म्हणजे सर्व दात पाडणारे तज्ञ पण खुश ! 
गुणांचा अभ्यास केला की द्रव्य कोणतेही असो, ते कसे काम करेल, याचा अंदाज बांधता येतो आणि इच्छित ठिकाणी जावून औषध काम करते.

 

यासाठी युक्ती वापरावी लागते. ही ज्याच्याकडे आहे तो बुद्धिमान यशस्वी होतो.
वैद्य सुविनय दामले 

कुडाळ, सिंधुदुर्ग  9673938021

26.11.2016

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s