Ayurved · Health

​कुंकुम घृत – मेंदूसाठी वरदान 

​कुंकुम घृत – मेंदूसाठी वरदान 
नजीकच्या काळात जनमानसात स्वस्थ्याबद्दल विशेष जागरुकता उत्पन्न झाली आहे. त्यामुळे आहारात स्निग्ध पदार्थांचा वापर कमी होऊ लागला आहे. पूर्वी सणासुदीच्या काळात मिठीच्या दुकानांमध्ये जेवढी गर्दी दिसायची त्या तुलनेत लोकसंख्या वाढूनही गर्दी निम्म्यापेक्षा कमी झालेली दिसते. गोड आणि तेलातुपाचे पदार्थांचे सेवन चांगलेच कमी झाले आहे. शुद्ध तुपाची किंमतही बरीच वाढली आहे त्यामुळे लोअर मिडल क्लास लोकांमध्ये ह्याचा वापर कमी होत आहे. आहारात झालेल्या ह्या बदलाचा परिणाम शरीरातील काही महत्त्वाच्या यंत्रणांवर होतो. विशेषतः स्निग्धतेवर संपूर्णपणे अवलंबून असणाऱ्या यंत्रणा म्हणजे मेंदु. मेंदूची ८० % जडणघडण स्निग्ध पदार्थांमुळे होत असते. किंबहुना त्याचे कार्य सर्वतोपरी स्निग्धतेवरच निर्भर असते. पाचही ज्ञानेंद्रियांमार्फत होणारे ज्ञान मज्जायंत्रणेच्या माध्यमाने मेंदूपर्यंत पोचविले जाते. म्हणूनच “डोळ्यात तेल घालून लक्ष ठेव”, “कानात तेल घालून ऐक”, “तैलबुद्धी” असे वाक्प्रचार प्रसिद्ध झाले. स्निग्ध पदार्थांच्या मर्यादित वापरामुळे आजकाल अल्झेमर्स, डिमेन्शिया (विस्मरण) असे विकार बेसुमार वाढत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना आकलन शक्ती सुधारण्यासाठी आणि उतार वयात स्मरणशक्ती भक्कम राहण्यासाठी स्निग्ध पदार्थांपैकी गायीचे तूप सर्वश्रेष्ठ आहे. आहारात ह्याचा वापर वाढल्यास मेद (चरबी) वाढेल किंवा कोलेस्टेरॉल वाढेल अशी भीती वाटणे स्वाभाविक आहे. वास्तविक गायीच्या तुपाने कोलेस्टेरॉल वाढत नाही, तरीपण ज्यांचा अजूनही आयुर्वेदावर पुरेसा विश्वास नाही अशांना ही भीती वाटत राहते.
ह्याविषयात अधिक अभ्यास करून गायीच्या तुपात केशर आणि काही बुद्धिवर्धक वनस्पतींचा अंतर्भाव करून मी स्वतः “कुंकुम घृत” नावाने हे तयार केले आहे. हे “कुंकुम घृत” ४ – ४ थेंब सकाळी किंवा संध्याकाळी नाकात (नस्य) टाकावे. नाकातून प्रविष्ट केलेले औषध मेंदूमध्ये त्वरित शोषले जाते. पचन यंत्रणेत प्रवेश न झाल्यामुळे त्याने पचनाच्या संदर्भात कोणताही दुष्परिणाम होण्याची भीती रहात नाही. स्नेहन नस्याचे इतर लाभही त्याने आपोआप प्राप्त होतात.अर्धावभेदक (मायग्रेन), दृष्टी दोष, चष्म्याचा नंबर वाढत राहणे, कॉम्प्यूटर व्हीजन सिंड्रोम,स्मरणशक्ती विशेषतः ग्रास्पिंग (धी), वारंवार सर्दी, डिमेन्शिया, अल्झेमरची सुरुवात, केस गळणे, कंपवात अशा अनेक लक्षणांवर हे नस्य फारच उपयोगी असल्याचे लक्षात आले. पन्नाशीच्या सुमारास अल्झेमर्स रोगाची सुरुवात मेंदूच्या पेशींमध्ये सुरु होते. त्याची लक्षणे मात्र १५ ते २० वर्षांनंतर दिसू लागतात. लक्षणे दिसू लागल्यानंतर कोणतीही उपचार पद्धती लागू पडत नाही. म्हणून पन्नाशीच्या दरम्यान सर्वांनीच हे नस्य करावे. कोणताही साईड इफेक्ट न होता उलट असंख्य साईड बेनिफिट्स ह्याने होतात असे आपल्या लक्षात येईल. ४ – ४ थेंब रोज एक वेळा नाकात टाकल्यास एका महिन्याला १५ मिली पुरते. गायीच्या तुपात हे सिद्ध केले असल्यामुळे सामान्य हवामानात किंचित घट्ट राहते. नाकात थेंब टाकण्यापूर्वी बाटली गरम पाण्यात मिनिटभर ठेवावी म्हणजे तुपाला पातळपणा येतो. ह्या नस्याला औषध न समजता एक चांगली सवय म्हणून अंगवळणी पाडावी. कमी खर्चात पण अत्यंत उपयुक्त असा हा उपक्रम नियमितपणे करावा.
वैद्य संतोष जळूकर, मुंबई
+917208777773
srpljalukar@gmail.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s