Ayurved · GarbhaSanskar

​आपलं बाळ आणि आपण 

​आपलं बाळ आणि आपण 
      पुनरुत्पत्ती किंवा आपला वंश सुरु ठेवणं ही प्रत्येक सजीवाची एक महत्वाची गरज आणि इच्छा असते .प्राणीच नव्हे तर वनस्पती देखील पुढची पिढी तयार करत असतात .माणूस हा तर या ब्रह्मांडातील सर्वात बुद्धिमान प्राणी मानला गेला आहे .आपल्या शास्त्रांमधून सुरुवातीपासून शरीर संबंध हे प्रजननासाठी असावेत यावर अधिक भर दिला गेला आहे .पूर्वीच्या काळी एकेका स्त्रीला सहज ८ /१० मुले असत पण आता मात्र बदलत्या काळानुसार “हम दो हमारे दो ” म्हणता म्हणता “एक मूल सुंदर फुल” वगैरे वर आपण येऊन ठेपलो आहोत .याची अनेक सामाजिक,आर्थिक कारणे आहेत ज्यांच्या खोलात जाणं हा आपला आत्ता संबंधित विषय नाही ,पण त्यामुळे जी काही एक किंवा दोन मुले असणार ती अतिशय गुणवान ,बुद्धिमान असावी ,आई आणि वडील या दोघांचे चांगले गुण त्यांनी घ्यावे असं वाटणं काही चुकीचं नाही .

      पूर्वी असं मानलं जाई की एकदा गर्भधारणा झाली की आपोआप काही गुण दोष येणारच पण एकूणच गर्भ आणि त्याचं गर्भाशयातील नऊ महिन्याचं अद्भुत विश्व हा नेहमीच सगळ्या शास्त्रज्ञांनाही आकर्षित करणारा विषय राहिलेला आहे .अनेक वर्षांपासून आणि अनेक देशांमधून या विषयी सतत संशोधन सुरु आहे आणि त्यातून नवनवीन अतिशय आश्चर्य कारक आणि अचंबित करणारी तथ्ये समोर येत आहेत .

     बाळ प्रत्यक्ष या जगात जन्म घेत नाही तोपर्यंत त्याला काही कळत नाही असा गैरसमज अनेक वर्षं होता पण आता असं सिध्द झालंय की बाळाच्या संवेदना आईच्या पोटात असतानाच जागृत होतात आणि आसपास सुरु असणाऱ्या घटना ,संवाद इतकंच नव्हे तर आईच्या खाण्यापिण्याचाही बाळावर नुसता परिणामाच होत नाही तर या प्रत्येक गोष्टीला बाळ प्रतिसादही देते .

     याच शास्त्रीय सत्याचा आधार घेऊन ” गर्भसंस्कार ” हा विषय खरं तर सुरु झाला पण आयुर्वेदाचा या विषयीचा अभ्यास हा खूपच खोल आहे आणि बाळाची वाढ कोणत्या महिन्यात कशी होते ,काय होते या विषयी अतिशय विस्तृत माहिती ५००० वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या ग्रंथांमध्ये सापडते .सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी की तेव्हा कोणतीही अद्ययावत् सामुग्री नसताना देखील त्यांनी ज्या नोंदी ठेवलेल्या आहेत त्या आज सोनोग्राफी केल्यानंतर तंतोतंत तश्याच सापडतात .

    या सगळ्या शास्त्रीय तथ्यांच्या आधाराने गर्भसंस्कार हा विषय आपल्या अपत्याच्या एकूण शारीरिक ,मानसिक,बौद्धिक सगळ्याच वाढीसाठी महत्वाचा आहे हे आता सिद्ध झाले आहे आणि आपली पुढची पिढी सर्वच बाबतीत आपल्यापेक्षा अधिक सक्षम असावी असं तर आपल्याला नेहमी वाटतच ना ? तेव्हा सगळ्या would be mother आणि fathers यांनी या विषयाचा फायदा अवश्य करून घेतला पाहिजे .

अधिक मार्गदर्शनासाठी आम्ही आहोतच .

या विषयी विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी आमचे “आयुर्वेदीय गर्भसंस्कार ” हे पुस्तक अवश्य वाचा .

वैद्य राजश्री कुलकर्णी 

M .D .( आयुर्वेद )

आयु:श्री आयुर्वेदिक हॉस्पिटल 

स्वामी समर्थ केंद्राजवळ 

रथचक्र सोसायटी मागे 

इंदिरानगर ,नाशिक ९ 

( ०२५३ ) २३२२१००

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s