Ayurved · Health

दिवाळीचा आहेर

​#सामान्य_आयुर्वेद
#Diabetes
#प्रमेह
दिवाळीचा आहेर

भाग २
१-

दिवाळी झाली, फराळ झाला. आता अंग दुखतंय, सांधे धरलेत, पोट साथ देत नाही, डोकं दुखतंय आणि बरंच काही. त्यामुळे रक्त चेक् करायला आलो. म्हटलं साखर वाढली असेल. रक्त तपासलं तर साखर वाढलेली.
हे पहिल्या प्रकारचे रुग्ण. ज्यांच्यामधे रक्त तपासणी आणि लक्षणे दोन्ही डायबिटीज दाखवतात.
दिवाळीमधे भरपूर लाडू, पेढे, अनारसे, करंज्या खाल्ल्यामुळे रक्त तपासणीचे रिपोर्टस् जे दाखवतात ते साहजिकच असतं; आणि वाढलेल्या साखरेमुळे होणारी लक्षणे सुद्धा साहजिकच असतात. अशा अवस्थेमधे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. आणि म्हणून सर्व लक्षणे दिसू लागतात. 

त्यामुळे अशा रुग्णांनी सावध रहावे.
२-

दुसऱ्या प्रकारच्या रुग्णांमधे लक्षणे काहीच नसतात, पण रक्त तपासणी एकदम घाबरवणारी असते. दिवाळीनंतर रेग्युलर चेकअप् म्हणून तपासणी करतात आणि कागद हातात येताच कापरं भरतं.

काय होतं यांमधे? आधीच डायबिटीज, त्यात फराळ; म्हणजे रक्त तपासणी घाबरवणारच. पण लक्षण मात्र काहीच नसतात. कारण लक्षण तेंव्हाच दिसतात जेंव्हा धातूंना पोषणाची कमतरता असते. अशा रुग्णांमधे जरी रक्तात साखर दिसत असली तरी आवश्यक तेवढं पोषण त्यांच्या शरीराला मिळत असतं. म्हणून कुठल्याही त्रासाशिवाय हे लोक आरामात असतात, आणि रक्त तपासणीचे रिपोर्टस् पाहिले की कोसळतात. [हे कोसळणं सुद्धा फक्त टेंशनमुळे, आजारामुळे नव्हे]
पहिल्या प्रकारचे रुग्ण हे लक्षणे आणि रिपोर्टस् एकसारखे असल्यामुळे ‘कूल’ असतात. पण काही लक्षणं नसून रिपोर्टस् असे आल्यामुळे दुसऱ्या प्रकारच्या रुग्णांचा मात्र ‘कूलनेस्’ सुटतो.
अशा रुग्णांनी खूप घाबरायचं काही कारण नाही. तुम्ही अगदी व्यवस्थित आहात, आणि थोड्या गोष्टी पाळल्या म्हणजे एकदम ठणठणीत व्हाल. [पण गाफील राहिलात तर मात्र रिपोर्टवरील त्रास शरीरावर दिसायला वेळ लागणार नाही.]
आपल्याला होणाऱ्या सर्व बारीकसारीक त्रासांची नोंद करून ठेवा. लवकरात लवकर आपल्या वैद्याचा सल्ला घ्या. किमान औषधांनी या अवस्थांवर मात करता येते. दिवाळीचा आहेर तर मिळाला, आता तो पचवा. (विषय मोठा आहे, आणि खूप मोठी पोस्ट वाचायला कंटाळा येतो, म्हणून सध्या एवढंच)
©वैद्य अमित पाळ

email- dramitsva@gmail.com

Ph- +919890493371

Vaidya Amit Pal
(लेखक हे मधुमेह आणि संबंधित समस्यांमधील आयुर्वेदीय उपचारतज्ज्ञ आहेत.)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s