Ayurved · Health

​#सामान्य_आयुर्वेद

​#सामान्य_आयुर्वेद
#Diabetes
#प्रमेह
बऱ्याच वैद्यांकडून औषधं घेतली, पण काही फरक नाही. म्हटलं आयुर्वेद आहे, सावकाश काम करेल, पण एवढ्या वर्षात थोडा तरी फरक पडायला हवा होता ना. आपली अवस्था जशीच्या तशी. अशा रुग्णांमधे काही वेळा चिकित्सेमधे बदल करावा लागतो, तर काही वेळा सवयींमधे.
बऱ्याच मधुमेहाच्या रुग्णांमधे असलेली एक सवय म्हणजे दुपारची झोप. आणि बऱ्याचदा फक्त तेवढी एक सवय बदलली की फरक दिसायला लागतो. मुख्य म्हणजे जी चिकित्सा सुरू होती आणि ज्यापासून आतापर्यंत काहीच फरक पडत नव्हता, तीच चिकित्सा फरक दाखवायला लागते.
दुपारी झोपणे ही सवय वाईट. वामकुक्षी मात्र ठीक आहे. दिवसा झोपल्यामुळे शरिरात कफाचं प्रमाण वाढतं. वामकुक्षी घेतली असता मात्र जास्त कफ वाढत नाही. लोक वामकुक्षी घेतो म्हणून जेवण झाल्याबरोब्बर झोपतात आणि तास दोन तासांनी उठतात आणि त्यामुळे कफ वाढतो. आधीच विकृत द्रवगुणामुळे झालेला प्रमेह, त्यात अजून कफ वाढतो. वाढलेला कफ प्रमेहामधे हातभार लावतो अाणि त्रास वाढवतो. त्यामुळे जर तुम्ही या रोगाने पीडित असाल, आणि दुपारच्या झोपेचे चाहते असाल, तर वेळीच जागे व्हा.
©वैद्य अमित पाळ

email- dramitsva@gmail.com

Ph- +919890493371

Vaidya Amit Pal
(लेखक हे मधुमेह आणि संबंधित समस्यांमधील आयुर्वेदीय उपचारतज्ज्ञ आहेत.)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s