Ayurved · Health

​#आयुर्वेद_कोश ~ ‘प्रशस्त पुरुष ‘ !!

​#आयुर्वेद_कोश ~ ‘प्रशस्त पुरुष ‘ !!
एरवी स्त्रियांना ”किती तो नट्टापट्टा ?” म्हणून खेकसणारे आता स्वतः आरशासमोर तासंतास बसतात . पूर्वी फक्त स्त्री वर्गा पुरते मर्यादित असलेले फेशिअल , ब्लिचिंग , थ्रेडींग वगैरे पुरुष मंडळी स्त्रियांपेक्षा नियमित करतात . मॉल मध्ये तर ‘पुरुषांसाठी सौन्दर्यप्रसाधने ‘ या विभागात तासंतास घालवण्यास वयाची अट नाही . अर्थात ही गोष्ट सर्वथा चुकीची आहे किंवा आम्ही याला विरोध करत आहोत असे नाही . आमचे म्हणणे इतकेच आहे की , झाडाची पाने रंगवून त्याला येणारा हिरवेपणा आणि त्याच झाडाला मूळात खत-पाणी व्यवस्थित घातल्यावर पानांना येणारा हिरवेपणा यात काही फरक आहे की नाही ?? 
सध्या ‘बेस्ट /प्रशस्त /स्मार्ट /सेक्सी ‘ मुलाची लक्षणे म्हणजे काय ‘ टॉल डार्क एन्ड हॅण्डसम ‘ (मला तरी तीनच माहित आहेत . . यादी अजून वाढणार याची कल्पना आहे ) . हे पुरेसे आहे का ?? आकर्षणाच्या परिभाषा बदलल्या नंतर हे शक्य आहे . . पण बौद्धांच्या धर्मासार संग्रहात प्रशस्त पुरुष कोणता यासंबंधी एक सुंदर श्लोक आला आहे .. 
”पंचसूक्ष्म : पंचदीर्घ : सप्त रक्त : षडून्नत : ।

त्रिपृथुर्लघुगंभीरो द्वात्रिंशल्लक्षण : पुमान  ॥ ” 
याचा अर्थ असा – त्वचा , केस ,बोटे ,दात .बोटांची पेरं ही पाच सूक्ष्म , हात ,डोळे , हनुवटी ,जांघा आणि नाक ही पाच लांब . पायाचे तळवे ,हाताचे तळवे ,खालचा ओठ , डोळे ,टाळा , जीभ व नखे ही आरक्तवर्णी . . छाती , कुक्षी ,केस , खांदे , हात ,तोंड या सहा गोष्टींना उभार . . कपाळ ,कंबर , छाती ही तीन मोठी . . गळा , जांघा ,लिंग बारीक . . स्वर , सत्व ,बेंबी खोल अशा 32 लक्षणांनी युक्त असा तो प्रशस्त पुरुष मानावा . . 
रामगढ वालो . . बोलो कौन है ऐसा पुरुष इस गाव मै ?? 
बाह्य रूपापेक्षा , सौन्दर्य प्रसाधनापेक्षा वरील लक्षणांनी पुरुष असेल तर ‘ हाय हॅण्डसम हाय हॅण्डसम ‘ जरूर म्हणावे . . क्रीम लावलेल्याला काय म्हणायचे ?? 
वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे

9175338585
आयुर्वेद कोश (https://web.facebook.com/aarogyakosh/ )
(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s