Ayurved · Health

​#सामान्य_आयुर्वेद

​#सामान्य_आयुर्वेद
#Diabetes
#MythBuster
डायबिटीज झाला की भात बंद आणि चपात्या सुरू. आणि हा नियम सरसकट सर्वांना लागू. दक्षिणभारतात जिथे फक्त भात खातात तिथे सुद्धा भात बंद आणि चपाती सुरू.
भात खाल्ल्याने शुगर वाढते आणि गहू शुगर कमी करतं असा समज. हा समज हळू हळू एवढा बलवान झाला की डाॅक्टर स्वतः “चपाती खा, भात नको” असा सल्ला देऊ लागले. आणि आज सुद्धा बऱ्याच रुग्णांकडून डाॅक्टरांनी असे सल्ले दिल्याचं ऐकायला मिळतं.
हे खावं किंवा खाऊ नये अशी चलबिचल झाली की साधारणतः पाय वळतात आयुर्वेदाकडे. आयुर्वेदाकडे वळलेले पाय आयुर्वेदाचा अभ्यास करो वा न करो, पण आयुर्वेदाचं नाव मात्र फट्कन् वापरतात. मुळात आयुर्वेदाकडे वळणे याचा अर्थ ‘आयुर्वेद असं म्हणतो’ असं म्हणण्यासाठी त्याचा वापर करण्यापलीकडे काहीच नसतो. त्यामुळे मुक्या आयुर्वेदाच्या नावावर पावती फाटते. म्हणून भात सुद्धा आयुर्वेदच बंद करतो.
भात सरसकट बंद करावा असं आयुर्वेद सांगत नाही. किंवा फक्त गहूच खा असं सुद्धा म्हणत नाही. उलट अशा रोगांमधे तांदुळ कुठला आणि कसा वापरावा याची माहिती आयुर्वेद देतो. 

त्यामुळे ही आयुर्वेदाच्या नावावर फाडलेली चुकीची पावती आहे.
आयुर्वेद असं म्हणत नाही म्हटल्यावर आधुनिक वैद्यक शास्त्रात असं म्हटलंय असा तर्क निघतो. कारण इथे नाही तर तिथे तरी तर्क तर निघालाच पाहिजे.
दुसरी बाजू म्हणजे ज्यांना आयुर्वेद अावडत नाही ते तर आयुर्वेद असं सांगत नाही म्हटल्यावर आयुर्वेदावर तुटूनच पडतात. व्हीट डायबिटीजवर कसं चांगलं आणि राईस कसं वाईट आणि अायुर्वेद किती नादान आहे याचे पाढे सुरू होतात. याचं कारण म्हणजे त्यांना आधुनिक वैद्यक शास्त्र सुद्धा व्यवस्थित माहिती नसतं.
आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार विचार केला तर, गव्हामधे ग्लूटेनचं प्रमाण भरपूर असतं. ग्लूटेन हा पँक्रिआज् या अवयवाचा शत्रू असं ‘ते म्हणतात’. सोबतच याच्या अतिरिक्त सेवनाने आतड्यांना सुद्धा त्रास होतो असं ‘त्यांचं मत’. पँक्रिआज् इंशुलिन स्रवण करतो ज्यामुळे आहारातून रक्तात आलेल्या साखरेचं नियमन होतं. या अवयवामधे बिघाड झाला म्हणजे डायबिटीज होतो. अर्थात डायबिटीज झाला असताना ग्लूटेनच्या अतिरिक्त सेवनाने पँक्रिआज् निकामी होऊ लागतं, आणि त्यामुळे रुग्ण डायबिटीजपासून दूर जाण्याच्या प्रयत्नात अजून जवळ पोहोचतो. हे सिद्ध करणारे अनेक प्रयोग झालेले आहेत आणि प्रत्यक्षात सुद्धा असे बरेच रुग्ण मिळतात.
म्हणजे आयुर्वेदच नव्हे तर माॅडर्न मेडिसिन सुद्धा भात पूर्णपणे थांबवून फक्त गहूच सुरू करा असा सल्ला देत नाही. हा म्हणजे अजून एक ‘धोबी का कुत्ता’वाला सिद्धांत झाला. “ना आयुर्वेद का ना माॅडर्न का”
प्रमेहात घ्यायच्या अाहाराबद्दल सविस्तर माहिती आपण पुढे पाहूया.
©वैद्य अमित पाळ

॥श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद॥

गोमंतक

email- dramitsva@gmail.com

Ph- +919890493371

Vaidya Amit Pal
(लेखक हे मधुमेह आणि संबंधित समस्यांमधील आयुर्वेदीय उपचारतज्ज्ञ आहेत.)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s