Ayurved · Health

​कडधान्ये  – समज आणि गैरसमज

​कडधान्ये  – समज आणि गैरसमज
आपला आहार हा संतुलित हवा ,त्यात सगळ्या प्रकारच्या  पदार्थांचा समावेश असावा अशीच साधारण आपल्या जेवणाच्या थाळीची रचना पूर्वापार चालत आली आहे .या प्रकारच्या खाण्यामुळे सगळ्या प्रकारचे रसही  आपल्या पोटात जातात.वरण,भात, भाजी,पोळी ,चटणी ,कोशिंबीर ,लोणचं ,पापड, लिंबाची  फोड ,आणि सणावाराला एखादा गोड पदार्थ अशी ही साधारण रचना आहे .

आधुनिक पद्धतीने जेव्हा आहाराचे  वर्गीकरण होऊ लागले तेव्हा ही परिभाषा थोडी  बदलली .रसांच्या ऐवजी carbohydrates ,proteins ,fats,roughage,  vitamins,minerals अश्या पद्धतीने पदार्थांचे गुणधर्म ओळखू जाऊ लागले.

पोळीभात वगैरे पिष्टमय पदार्थ  म्हणजे energy giving food अशी व्याख्या झाली म्हणजेच रोजचे शरीराचे चालणारे व्यवहार पार पाडण्यासाठी लागणारी ताकत हे देतात .सर्व प्रकारच्या डाळी  या body building  food आहेत म्हणजे शरीराची wear and tear भरून काढणे ,प्रतिकार शक्ति वाढवणे या गोष्टी डाळीमुळे साध्य होऊ शकतात.
मधला काही काळ तर असा होता की जेव्हा वजन , डाएट हे फार परवलीचे शब्द झाले होते .काय खाल्ल्याने काय होते ,किती कॅलोरीज मिळतात ,अमुक एका गोष्टीची nutritional  value  किती अश्या तऱ्हेच्या चर्चा होत ,पुस्तके मिळत.

त्यावेळी आपण नियमित घेत असलेल्या डाळी आणि कडधान्ये यांना अवास्तव महत्व प्राप्त झाले .जे लोक  मांसाहार घेतात त्यांना त्या पदार्थांमधून प्रथिने मिळतात परंतु शाकाहारी लोकांना मात्र प्रथिनांचे स्त्रोत  खूपच कमी असतात ,मग त्यातल्यात्यात डाळी खाल्ल्या तर प्रथिने मिळतात असे रूढ झाल्याने रोज अनेक घरांमधून भाजीबरोबर उसळही केली जाऊ लागली.त्यातही पुष्कळ वैविध्य असल्याने आवडीने उसळ खाल्ली  जाई .मूग,मटकी ,चवळी,हरभरे,वाटाणे ,वाल,छोले,राजमा अशी अनेक प्रकारची कडधान्ये वापरात नियमित येऊ लागली.रचनेच्या दृष्टीने म्हणजे अमुक %  पिष्टमय पदार्थ ,अमुक %  प्रथिने हे जरी साधर्म्य  असले तरी आयुर्वेदाच्या दृष्टीने मात्र हे प्रत्येक कडधान्य  एकमेकांपेक्षा वेगळे आहे ,नुसते त्यांचे रंग,रूप ,आकार एव्हढेच नव्हे तर गुणधर्मही  वेगळे आहेत .

हिरवे मूग आणि साल काढलेली मुगाची डाळ ही पचायला हलकी आणि अतिशय पथ्यकर सांगितली आहे ,म्हणूनच अजूनही आजारी माणसाला आपण पातळ मुगाची खिचडी देतो.

मटकी वारंवार खाण्याने पोटात जंत होतात.

उडदाची डाळ आणि अख्खे उडीद हे पचायला अतिशय जड असतात ,त्याच वेळी बलवर्धक असतात म्हणून जेव्हा थंडीच्या दिवसात आपली पचनशक्ती चांगली असते तेव्हा आपण उडीद लाडूंमध्ये  वापरतो.त्वचाविकारात  उडीद चालत नाहीत.

मटार किंवा वाटाणे हे अतिशय वातकर आहेत ,हरभरेही साधारण त्याच गुणाचे आहेत त्यामुळे या उसळी खाल्ल्या की पोट फुगते ,गुबारते ,आणि कधीकधी दुखते देखील !म्हणूनच सणावाराला पुरणपोळी ,भजी वगैरे खाल्ली की काही जणांना तर फार gases चा त्रास होतो ,ढेकर येतात ,जीव घाबरतो .आणि असा त्रास होऊ नये ,वात वाढू नये  म्हणून ,कोरडेपणा वाढू नये म्हणून पुरणपोळी बरोबर भरपूर तूप खावे असा आपल्याकडे नियम आहे .

चवळी खाल्ल्याने जास्त प्रमाणात मलप्रवृत्ती  होते .

तुरीची डाळ पित्तवर्धक आहे .

असे प्रत्येक कडधान्य वेगवेगळ्या गुणाचे,शरीरावर वेगवेगळा परिणाम करणारे आहे .प्रत्येक व्यक्तीची प्रकृती जशी असेल तशी त्याची शरीराची ठेवण,पचनशक्ती या गोष्टी बदलतात म्हणूनच काही लोक वाट्यावाट्या तुरीची आमटी आरामात खातात तर काही व्यक्ती चुकून हॉटेलमध्ये  इडली बरोबर चव म्हणून सांबार खातात तर दुसऱ्या दिवशी पित्त वाढले म्हणून उलट्या काढतात ,यांचे डोके दुखते.

या सगळ्यांपेक्षा वेगळे ,म्हणजे जे कडधान्य म्हणून वापरले जात नाही पण प्रथिनांचा उत्तम स्त्रोत म्हणून जरा जास्तच  नावारूपाला आलेले धान्य म्हणजे सोयाबीन ! 

इतर सगळ्या धान्य आणि कडधान्य यांच्या मानाने सोयाबीन मध्ये प्रथिने निश्चितच जास्त प्रमाणात आहेत पण याचे बाह्य कवच मानवी पचन शक्तीच्या मानाने पचायला खूप जड आहे .त्यामुळे न चाळता  जर सोयाबीन वापरले तर बऱ्याच जणांना जुलाब होतात .खूप जणांना तर याची allergy  असते .त्यामुळे केवळ fad म्हणून सोयाबीन वापरू नये .

या उलट सध्याचे नवीन fad म्हणजे Uric Acid  ची समस्या ! मग काय उलटी धावाधाव !! सगळ्या डाळी बंद करा .

या सगळ्या उलटसुलट गोष्टी ऐकून सामान्य माणूस गोंधळून जातो ,काय नेमके खावे आणि काय टाळावे ?

याचे सरळ साधे उत्तर असे आहे की कोणताच अतिरेक नको ,डाळी ,कडधान्ये रोजची खाऊ नये आणि पूर्ण बंदही  करू नये.अधूनमधून बदल म्हणून उसळ खायला हरकत नाही .त्यातही सांधेदुखी,मणक्यांचे आजार असे काही असेल तर फक्त मूग वापरावे .

पित्ताचा त्रास असेल तर तूर खाऊ नये ,मूग,मसूर वापरावे .

याशिवाय आपली नक्की प्रकृती कोणती आहे हे समजून घ्यावे आणि त्यानुसार योग्य सल्ल्यानेच आहार घ्यावा हे उत्तम !! 

डाळी,कडधान्ये याविषयी अधिक माहिती आमच्या ” आहारजिज्ञासा”  या पुस्तकात नक्की वाचा.ही post उपयुक्त  वाटली तर तुमच्या वेगवेगळ्या groups वर share करा कारण वाटल्याने ज्ञान वाढते.

वैद्य राजश्री कुलकर्णी

M. D. ( आयुर्वेद)

आयु:श्री आयुर्वेदिक हॉस्पिटल

स्वामी समर्थ केंद्राजवळ 

रथचक्र सोसायटीमागे 

इंदिरानगर

नाशिक

Ph. No.(०२५३)  २३२२१००

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s