Ayurved · Health

​आयुर्वेद कोश – ‘ ब्रिक्स ‘ मधला आयुर्वेद !! 

​आयुर्वेद कोश – ‘ ब्रिक्स ‘ मधला आयुर्वेद !! 
भारत जगाला काय देऊ शकतो ?? 
या प्रश्नाचे उत्तर विचारले तर . . . भ्रष्टाचार , अस्वच्छता , बेकारी असली अनंत निराशाजनक उत्तरे मिळतील . कोणी जरा शिकलेला असेल तर म्हणेल ‘ भारताने जगाला शून्य दिला ‘ . अजून जरा शिकलेला असेल तर तो ‘शून्य ‘ या शब्दाचा (सोयीचा ) अर्थ काढून मार्मिक हसेल . . . भारत जगाला काय देऊ शकतो  ? या प्रश्नावरची सार्वत्रिक निराशा सोडून मला हा प्रश्न विचारला तर मी सांगेन – 
” भारत जगाला आयुर्वेद देऊ शकतो ” 
भारतात आणि जगात फरक असा आहे . . की आपल्याकडे व्हाट्सएप पोस्ट आली . . प्रमेह घालवायचा एकमेव उपाय . . गावाकडच्या नैऋत्येला असलेल्या ,बरोबर मध्ये विहीर असलेल्या  काळ्या मातीच्या शेतात सर्वात उंच तुरा असलेल्या ज्या निवडुंगाच्या फुलावर एक पंख तांबडा , एक पंख पोपटी आणि त्याचे पाय पांढरे असतील असे फुलपाखरू बसले असेल त्या निवडुंगाच्या फुलाच्या 3 पाकळ्या 100 मिली पाण्यात घालून रोज 3 दा प्यायचे . . अहो प्रमेह काय ?? साक्षात यम परत जाईल यम . . . लोकांची शोध मोहीम सुरु !! यातील अतिशयोक्ती सोडली तर भारतात आरोग्य विषयक ‘टिप्स ‘ पसरवायला शैक्षणिक पात्रता , पदवी , अनुभव काही लागत नाही . . हाण पांड्या या घोषित नियमाने सर्व कारभार सुरु असतो . . पण विदेशात तसे नसते . . तिथे ‘एव्हिडन्स ‘ यास महत्व असते . . . 
आयुर्वेदाला एफेकट नाहीत म्हणून साईड एफेकट नाहीत अशी कुचेष्टा करणाऱ्यांचे सध्या ‘वांदे ‘ झालेत . त्यांच्या आवडत्या देशात (भारत सोडून सर्व ) आयुर्वेदावर नवनवीन संशोधने होऊन आयुर्वेद किती इफेक्टिव्ह आहे हे रोज नव्याने सिद्ध होत आहे . असो !! तर जागतिक स्तरावर होणारी आयुर्वेदाची उलाढाल आणि भारतात हिमालय आणि पतंजली यांचा ‘टर्न ओव्हर ‘ पाहता भारत जगाला काय देऊ शकतो हे वेगळे सांगणे न लागे . . पण जगासमोर आयुर्वेद न्यायचा कसा ?? 
आजवरच्या सरकारांनी आयुर्वेदाबाबत काही ‘भरीव ‘ केल्याचे आमच्या ऐकिवात नाही . एखादा दुसरा ‘अपवाद ‘ असेल तर तो शेअर करून आमचे सामान्य ज्ञान वाढवावे ही विनंती ! मोदी सरकार आल्या पासून मात्र आयुर्वेदाला चांगले दिवस  आल्याचे  दिसत  आहे . प्रथम जागतिक योग दिवस – त्यास संयुक्त राष्ट्रांकडून मान्यता , आता आयुर्वेद दिवस आणि या पुढचे पाऊल म्हणजे ‘ब्रिक्स ‘ मध्ये आयुर्वेद याचा करणार असलेला प्रचार !
ब्रिक्स (BRICS ) म्हणजे ब्राझील , रशिया , इंडिया , चायना , साऊथ आफ्रिका या वेगाने वाढणाऱ्या अर्थसत्तांचा समूह !  यांची 2016 मधील बैठक भारतात गोवा येथे ऑकटोबर मध्ये पार पडणार आहे . या सभेत ‘वेलनेस इंडेक्स ‘ यात भारत ‘आयुर्वेदाचा ‘ प्रसार आणि प्रचार करणार असल्याची बातमी समोर आली आहे . आता काही टिकोजीराव म्हणतील ‘ आता अंबानी आणि अदानी आयुर्वेद फार्मसी सुरु करतील आणि त्यांची उत्पादने जगभर जातील . . . मोदींचे सरकार अजून काय करणार ?? ” विषय असा आहे की उत्पादन हे एकटे जात नसते . . सोबत त्या देशाचे नाव आणि प्रतिष्ठा घेऊन जात असते . . बेल्जीयम कार्पेट , फ्रांस चे सुगंध , स्विस घड्याळ , चायनीज फूड , ब्राझील कॉफी इत्यादी या सोबतच ‘ भारतीय आयुर्वेद ‘ हे नाव जागतिक स्तरावर एक ‘स्टॅण्डर्ड ‘ असावे अशी भावना असणे यात गैर काय !! 
सदर सभे नंतर अहवालात आयुर्वेदाच्या बाबतीत कोणत्या पातळीवर सहकार्याचे ठराव झालेत हे समजेलच पण या निमित्ताने काही ठळक मुद्दे अधोरेखित करावेसे वाटतात – 
1. जागतिक स्तरावर आयुर्वेद पोहोचवावा पण ‘आयुर्वेदाच्या सिद्धांतांना बायपास ‘ करून नाही !

2. वैद्यांना बायपास करून कंपनी टू कस्टमर ही चेन घातक आहे . 

3. जागतिक स्तरावर जाताना  एका कोपऱ्यात उधळलेला घोडा , मध्ये गोळ्या /तेल , खालच्या कोपऱ्यात चेकाळलेले अर्धनग्न कपल असल्या सवंग जाहिराती करू नयेत . 

4. जागतिक स्तरावरून जो काही ‘रेव्हिन्यू ‘ मिळेल त्यातील काही टक्के तरी भारतीय आयुर्वेद संशोधन , शिक्षण आणि विद्यार्थी यासाठी राखून ठेवावा . 

इत्यादी !! 
तर भारत सरकार तर्फे ‘ब्रिक्स ‘ मध्ये आयुर्वेदाचा प्रसार ही कौतुकाची बाब आहे . . . याचे पक्ष भेद विसरून स्वागत करायला हवे . . !!! 
वैद्य . अंकुर रविकांत देशपांडे 

9175338585
आयुर्वेद कोश (https://web.facebook.com/aarogyakosh/ )
(लेख कृपया लेखकाच्या नावासह व नाव न बदलता शेअर करावा . या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s