Ayurved · Health

किचन क्लिनीक

​🔅किचन क्लिनीक 🔅
     सीताफळ
हे फळ सगळ्यांना आवडते.दिसायला आणी खायला देखील सुरेख.साधारण अक्टोबर महिन्यात सुरूवातीला हि फळे बाजारात येतात.ह्याचे १०-१२ फुट उंच झाड असते व फळ ४-५ इंच व्यासाचे असते.बाहेर काळपट हिरवी साल असते व आत पांढरा सुगंधी गर  व काळी बी असते.
हे चवीला गोड थंड व पित्तनाशक असून वात व कफ दोष वाढविते.
आता ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:
१)व्यवसाया निमित्त उष्णतेशी संपर्क येत असणाऱ्या व्यक्ती ज्यांना घसा कोरडा होणे,वारंवार तहान लागणे ह्या तक्रारी असतात त्यांनी सीताफळ अवश्य खावे.
२)मुलास दुध पाजत असणाऱ्या स्त्रीने सीताफळ खावे भरपूर दुध येते व थकवा देखील कमी होतो.
३)तळपाया व हात ह्यांची आग होत असल्यास सीताफळ खावे व साल तळव्यांना बांधावी.
४)गळवे पिकायला कच्च्या सीतांफळाचे पोटीस त्या गळूवर बांधावे.
५)सीतांफळाचे बियांचे चुर्ण हे केस धुवायला वापरल्यास कोंडा कमी होतो व केसांचे आरोग्य सुधारते.
सीताफळ खायचा अतिरेक केल्यास सर्दी खोकला होऊ शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर

आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,

म्हापसा गोवा.

संपर्क:९९६०६९९७०४

☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s