Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

   आजची आरोग्यटीप 30.09.16

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
                *आहाररहस्य.*
            *आहारातील बदल* *भाग 9*

     

                  *शाकाहारी भाग चार*

                  

मांसाहारी प्राण्यांची  आणि शाकाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. मांसाहारी म्हणजे *कार्निवोरस,* जे फक्त मांसच खातात. शाकाहारी म्हणजे *हर्बीवोरस.* ज्यांचे मुख्य अन्न,  शाक म्हणजे पालाच आहे. 
शाकाहारी प्राण्यांच्या जवळपास जाणारी आणखी एक जमात अस्तित्वात आहे, तिला *फ्रूगीवोरस* म्हणतात. ही जमात फळे, धान्य, धान्याच्या बीया आणि पाला हे सर्व खाते. पण ज्यांचे मुख्य अन्न, धान्य  आणि बीया हे आहे. हे फ्रूगीवोरस हर्बीवोरसच्या जवळचे असतात. पण थोडा फरक असतो. 
*हर्बीवोरस* प्राण्यांचे पचन थोडे वेगळे असते. यांची आतडी ही इतर दोन प्रकारांपेक्षा मोठी असतात. शरीराच्या उंचीच्या  किंवा लांबीच्या सर्वसाधारणपणे  *बावीस ते चौवीस पट* मोठी असतात. पाल्यामधे असलेले घटक पचवण्यासाठी ही आतडी मोठी असणे, पचन सावकाश होणे, आवश्यक  असते. त्यामुळे या प्राण्यांनी भराभरा खाल्लेले अधिक रेषायुक्त पाल्याचे अन्न सावकाश पुढे सरकते,  आणि नंतर पुनः हे अन्न तोंडात आणून रवंथ केले जाते. पाल्यामधे अल्प प्रमाणात असलेला पिष्टमय पदार्थ पचवायला आवश्यक लाळ यांच्या तोंडात तयार होते. यामधे पिट्यूलीन हे एन्झाईम असते. 
हे एन्झाईम *फ्रूटीवोरस* जमातीमधे त्याही पेक्षा जास्त आढळते. यांची आतडी ही हर्बीवोरसपेक्षा थोडी लहान पण कार्निवोरसपेक्षा मोठ्ठी असतात. शरीराच्या तुलनेत आतडी साधारणपणे *बारा पट* मोठी असतात. आणि कार्निवोरसची आतडी शरीराच्या लांबीच्या तुलनेत फक्त *चार पट* एवढी लहान असतात. अन्न लवकरात लवकर पचून बाहेर पडून जावे, यासाठीची *त्याने* केलेली रचना आहे.
यांच्या लाळेमधील पिट्यूलीन मात्र जास्त  असते, कारण यांचा मुख्य आहार धान्य, बीया, फळे इ.  म्हणजे पिष्टमय पदार्थ आहे. 
या *फ्रूटीवोरसचे* आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे,  एकदा अन्न चावून, बारीक करून, वरून खाली ढकलले की, पचनाची जबाबदारी संपली.  पचनासाठी नंतर विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत. 

जसे, वाघ सिंहा सारखे मांसाहारी प्राणी खाल्लेले मांस पचवण्यासाठी गडाबडा लोळतात, किंवा अजगर झाडाला विळखा घालून अंगाचे बऱ्याच  वेळा आकुंचन प्रसरण करतात. तसे फक्त पाला खाणारे *हर्बीवोरस* करत नाहीत, पण यांना पचनाला मदत करण्यासाठी रवंथ मात्र  करावेच लागते. 
ही *त्याने* स्वतःची बुद्धीमत्ता वापरून केलेली रचना आहे.

बाय डिफाॅल्ट प्रोग्राम ने फिक्स झालेली.

यातील एकही प्राणी आपली जीवनपद्धती बदलत नाही. म्हणून यांचे अस्तित्व आजही टिकून आहे. 
या तीनही प्रकारच्या प्राण्यांच्या शरीराचा आतून बाहेरून विचार केल्यास, स्वभावगुणांचा विचार केल्यास, निर्माण होणाऱ्या  स्रावांचा विचार केल्यास, बुद्धी नावाची चीज जरा जास्ती दिली आहे, तो  *माणूस* नावाचा प्राणी कोणत्या गटात येतो. हे आपणच ठरवावे.
कोणाला *काय* आणि *किती* द्यायचे हे *देणारा* ठरवित असतो. 

त्याच्याकडे जे आहे, त्यापेक्षा अधिक तर कोणीच देऊ शकत नसतो.
देणाऱ्या पेक्षा *घेणारा* हा जर, स्वतःला जास्ती बुद्धिमान समजायला लागला, तर *देणारा*, 

*”भोग आपल्या कर्माची फळे”* असे म्हणत असतो.

 

वैद्य सुविनय दामले.

कुडाळ सिंधुदुर्ग  9673938021.

30.09.2016

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s