Ayurved

​#AyurSwasthya

​#AyurSwasthya
नस्य
   नस्य हे पंचकर्म मधीलच एक. नस्य म्हणजे नाकातून ज्यावेळी औषध दिले जाते तो उपक्रम. कंठ/गळयाच्या वरील अंगाच्या(उर्ध्वजत्रू) कुठच्याही त्रासाला नस्य हे उपयोगी पडते. नाक हे डोक्याचे द्वार(सोप्या भाषेत सांगायचे झाले तर डोक्याच्या आत जाण्यासाठीचा दरवाजा) आहे असे आयुर्वेदात सांगितले आहे. औषधीयुक्त तेल, तूप, दुध, पाणी, औषधी द्रव्यांचा(फळ,पाने,मूळ,पुष्प सारख्यांचा) रस/काढा इतर स्वरूपात नाकातुन आत मात्रानुसार घातले/नाकात सोडले जातात.
   डोके बधीर होणे, दृष्टी कमी होणे(कमी दिसणे), अकाळी केस पिकणे, गळणे, झोप न येणे, नाकाच्या तक्रारी(गंध व्यवस्थित न येणे, पुनः पुनः शिंका येणे, नाकातून रक्त पडणे, श्वासोश्वास घ्यायला त्रास होणे, नाकात खाज येणे), डोके दुखणे, डोके जड होणे, तोंड वाकडे होणे, कानाचे विकार सारख्या तक्रारी मध्ये उपयुक्त आहे.
   नस्य केल्याने मन प्रसन्न राहते, दात अजून मजबूत होतात, बाहेर जायच्या अगोदर नस्य केल्याने धुळीचा व धुराचा त्रास होत नाही, थकवा घालवितो, शरीराला हलकेपणा देतो, नाकामधील कफ दूर करतो, म्हातारपण उशिरा येते, मुख सुगंधित राहते.
    दात, नाक, कान, डोळे, मान जर दुखत असतील तर नस्य चा फायदा होतो. आवाज(स्वर) बसलेला/बदललेला असेल(अस्पष्ट भाषण), मान आखडणे, अर्धशिसी, चित्र विचित्र स्वप्न पडणे, उन्माद, धाप/उचकी लागणे, खोकल्यामध्ये, पक्षाघात, चक्कर आली असताना हि नस्य उत्तम कार्य करते.
   तरीही नस्य चे औषध-मात्रा-काल-रुग्ण वय-ऋतु-दोषानुसार, व्यक्तीनुसार, रोगाच्या अवस्थेनुसार अनेक प्रकार आहेत. नाकात फक्त Drops टाकणे म्हणजे नस्य नव्हे. नस्य च्या अगोदर(पूर्वकर्म) व नंतर(पश्चातकर्म) उल्लेखित विधींचे पालन केले पाहिजे तरच इच्छित लाभ मिळतील. साधारण ८ वर्ष ते ८० वर्ष पर्यंतच्या व्यक्तींना आपण नस्य देऊ शकतो. 
    नस्य करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीत आपली मान व डोके ठेवावे लागते(न जास्त खाली न जास्त वर). तरच ते नस्य औषध योग्य मार्गाने डोक्याचा ठिकाणी जाईल. नाहीतर घशातून खाली उतरेल(गिळू नये). घशात जर आले तर सावकाश थुंकून बाहेर टाकावे. नस्य केल्यावर डोके जास्ती हलवू अन नये, जास्त बोलणे/हसणे टाळावे, राग आवरावा, नस्य केल्यावर लगेचच कामावर पळू नये. थोडा वेळ आराम करावे त्याच स्थितीत/आसनात(१०० अंक मोजून होतील एवढा तरी काळ), नस्य च्या अगोदर नाक, गाल, कपाळ, कंठ, गळा, मुख या ठिकाणी अलगद स्नेहन-स्वेदन व नस्य नंतर स्वेदन(तापस्वेद) अपेक्षित असते. कवल, गंडूष, धुमपान(धुमपान म्हणजे smoking नव्हे हे लक्षात ठेवावे) सारखी कर्म करावीत ज्यानेकरून नस्य चे लाभ वाढतील. म्हणूनच वैद्यांच्या सल्ल्यानेच नस्य करावे.
© DrSuraj Patlekar, MS(Ayu)

Shree Vyankatesh Aayurved

Margao, Goa
(लेखक हे योगासनातील तज्ञ तसेच मणक्याचे विकार/ सांधेदुखी अश्या वातांच्या विकारांवरील आयुर्वेदीय उपचार तज्ञ आहेत)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s