Ayurved · Health

#आयुर्वेदामृत

​#प्रवास किती व कधी ?

#आयुर्वेदामृत

#जागर_आयुर्वेदाचा

#lifestyle_modifications

#अभ्यंग_वातशामक_उपक्रम
दररोज प्रवास म्हण्टला की

गाडया आले रस्ते आले व खड्डे आले !

परिणाम “वातवृद्धी” !!!

मग हळू हळू

कंबरदुखी,

मानदुखी ,

सांधेदुखी ,

पायदुखणे येतेच !!
*मग हे सर्व टाळायचे तरी कसे….* ?
विकृत वाताचे श्रेष्ठ औषध तैल आहे !

म्हणून अभ्यंग करायचा !

म्हणजे

कोमट तैल सर्वांगास

आंघोळीपुर्व ३० मिनिटे चोळावे.

व नंतर गरम पाण्याने आंघोळ करावी.

म्हणजे

दररोज थोडा थोडा वाढणारा वात

कंट्रोल मध्ये रहातो किंवा वाढल्यास कमी येतो

दुखणे कमी होऊन शरीर हलके व ताजे तवाने होते.
*तैल म्हण्टल की पहिला प्रश्न लगेच आला…*

कोणत तैल वापरायचे ?
मूळात तैल शब्दच तीळ ह्या शब्दापासून बनला आहे.

आयुर्वेदातील बहुतांश औषधी तैलांचा पाया हा तीळ तैल आहे.

त्यामुळे निर्धोक पणे तीळ तैल वापरावे.

परंतु व्याधीच्या विशिष्ट अवस्थांनुसार औषधी तैल हितकर ठरतात.

त्यामुळे, वैद्यांच्या सल्ल्यानुसार तैल वापरणे केव्हांही योग्य.
*प्रवासात जेवण कस कराल* ?
१. प्रवासी दिनचर्या असल्यास घरातून निघतानाच भूक असल्यास अल्पोपाहार करणे, पोट तुडुंब भरु नये.

२. प्रवासामध्ये भूक लागल्यास फलाहार / घरुन नेलेल्या लंच बॉक्स मधील गरम गरम हलका-तैल-तुपयुक्त आहार घेणे.

३. बाहेरील अन्न टाळणे.(समोसा ते इडली वडा, फ्रॅंकी,इ.)

४. भूकमार ही टाळणे.

किमान राजगिरा लाडू , साळीच्या लाह्या, सुके अंजीर, ओले खजूर,

तूप-साखर चपाती , ताजा फलरस (juice)घेणे.
चाळीसीनंतर आयुष्याचा प्रवास सुखकर व्हावा असे वाटत असल्यास …..

वर लिहलेल्या lifestyle modifications विचारपुर्वक अंमलात आणावेत !!
आपला आरोग्याभिलाषी,
संपादक व लेखक #आयुर्वेदामृत

आयुर्वेद प्रचारक

वैद्य प्र.प्र.व्याघ्रसूदन

९८६७ ८८८ २६५

पुनर्वसु आयुर्वेद चिकित्सालय, नवी मुंबई ७०५.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s