Ayurved · Health

साबुदाणा

​साबुदाणा  – oh  !  I just love sabudana khichadi 
साबुदाणा असं नुसतं  नाव जरी काढलं तरी काही जणांचा हा dialog असतो तर काही जण मात्र शी !  साबुदाणा खिचडी ! मला नं ,अजिबात आवडत नाहीअसं म्हणणारेही महाभाग असतात .ही टोकाची आवडनिवड म्हणजे एक गमतीशीर प्रकार आहे खरा.

खरं तर साबुदाणा काही झाडाचं फूल किंवा फळ नाही तर sagu नावाच्या वनस्पतीच्या कंदापासून तयार होणारा पदार्थ आहे. कृत्रिम पद्धतीने बनविला जाणारा आणि माणसाच्या पचनसंस्थे साठी पचायला अत्यंत जड असणारा असा स्टार्च किंवा पिष्टमय पदार्थ आहे .त्याला स्वतःची चव ,वास ,रंग काहीही नाही तरी तो फार लोकप्रिय आहे ,तसे पाहिले  तर तो खूप काही गुणकारी आहे किंवा त्यात फार Nutritional  Value आहे असेही नाही ,पण ज्या पद्धतीने ,प्रकाराने तो खाल्ला जातो त्यामुळे त्याची जी काही विशिष्ट चव जाणवते त्यामुळे कदाचित ही लोकप्रियता असावी.

साबुदाण्याबरोबर  बहुतेक वेळा बटाटा आणि शेंगदाणा कूट ,कोथिंबीर ,हिरवी मिरची असे पदार्थ वापरून त्याची चव लज्जतदार बनविली जाते आणि लोक मग खिचडी काय किंवा साबुदाणा वडा काय अगदी आवडीने खातात ,कोल्हापूरकडे तर मिसळीत देखील साबुदाणा खिचडी मिसळली जाते .

ज्यांना साबुदाणा अजिबात आवडत नाही त्यांचीदेखील न आवडण्यामागे ठराविक कारणे असतात ,जसे खिचडी खाल्ली ना की दुसऱ्या दिवशी माझं डोकं दुखलंच म्हणून समजा किंवा मग बापरे ,नको बाबा ती खिचडी खाण ,दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी जाम पंचाईत  होते ,पोट फार दुखते ते वेगळंच आणि शी काय कडक होते रे देवा !!

असं होण्यामागच कारण म्हणजे साबुदाणा स्वतः फार रुक्ष गुणाचा आहे आणि प्रचंड प्रमाणात पाणी शोषून घेणारा आहे त्यामुळे दिवसभर उपास असेल आणि फक्त खिचडीच खाल्ली असेल तर मलप्रवृत्ती खूप कठीण ,कडक अश्या स्वरुपाची होते आणि कधी कधी रक्तही पडते .

खिचडी किंवा वडे  तयार करताना भरपूर दाण्याचा कूट वापरल्यामुळे पित्त प्रमाणाबाहेर वाढते आणि त्यात उपास केल्यानेही आहार कमी घेतल्यामुळे काही पित्त प्रकृतीच्या लोकांना मळमळ ,उलट्या,डोकेदुखी असे त्रास  जाणवतात.

वयोवृद्ध व्यक्तींनाही हा फार त्रासदायक पदार्थ आहे ,तेव्हा प्रत्येकाने जपूनच खावा हे बरे!! ज्यांना खूप आवडतो ,त्रास होत नाही त्यांनी अधून मधून खायला हरकत नाही .

साबुदाण्याविषयी अधिक माहिती वाचण्यासाठी आमचे ” आहारजिज्ञासा” हे पुस्तक अवश्य वाचा .
वैद्य राजश्री कुलकर्णी

M. D. ( आयुर्वेद)

नाशिक

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s