Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  आजची आरोग्यटीप 21.09.16

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

            

            *आहाररहस्य.*

*जेवणाची बैठक कोणती ?* 

                *भाग ५*
*जमिनीवर जेवायला बसायचे काही फायदे* नावाचा एक मेसेज व्हायरल झाला आहे. तेच परत लिहिण्यात वेळ आणि जागा घालवित नाही.
वास्तुतज्ञ सांगतात म्हणून नव्हे, पण वैद्यकीय तज्ञ सांगतात, म्हणून मलविसर्जनाची *वास्तु* देखील बदलण्यासाठी आता धडपड सुरू आहे, ही *वस्तुस्थिती* आहे. 
मल विसर्जन करताना पोटावर योग्य तो ताण निर्माण करणार् या  *स्क्वॅटींग* व्यायामावर आज परदेशात संशोधन चालले आहे.
पाश्चात्य लोकांच्या उंचीला साजेशी  म्हणजे कमोडवर बसल्यावर सहजपणे पाय टेकतील अशी उंच कमोडची भांडी त्यानी बनवली. पण त्याच उंचीची भांडी, भारतातही बनवली जाऊ लागली. कमोडवर बसल्यावर, *जमिनीला पाय टेकतच नसल्याने*, कितीतरी भारतीयांना अक्षरशः लोंबकळत बसावे लागते, हे सत्य आहे. पाश्चात्य  अनुकरणाची आणखी किती लाचारी करायची ? 

असो. ! पाय जमिनीवर, जमिनीला टेकलेले हवेत हे महत्वाचे.

( हो ! माझ्या *काॅम्प्लेक्स* मधील चिकित्सालयात, मी तपासणीकक्षातील जमिन शेण मातीचीच ठेवली आहे. आणि तपासणीसाठी बैठकपण भारतीयच ठेवली आहे. मस्त खाली बसून रूग्णांना तपासतो. त्यात लाज कसली ? ) मनापासून ठरवलं तर काहीच अशक्य नाही.
दुसरा काही पर्यायच नसेल,आणि  जिथे जेवायला टेबलखुर्चीचाच वापर करायचा असेल, तिथे न लाजता, खुशाल खुर्चीवर मांडी ठोकून बसावे.
कोणत्याही खुर्चीवर बसल्यावर पाय अधांतरी रहाता नयेत. टेकलेलेच हवेत. नाहीतर पुढे पाठीला बाक येणे, पीआयडी, चकती सरकणे, असे प्रकार सुरू होतात. हे व्यवहारात दिसते. म्हणून तर पुर्वीच्या मुख्याध्यापकांच्या लाकडी खुर्चीखाली पाय टेकायला,  पायपेटीला असते तशी तिरपी फळी ठोकलेली असायची.  आता ती पण गेली……..

……..आणि कंबरेला बांधून ठेवणारे बेल्ट मात्र आले.
जेवताना पण या गोष्टीचे भान हवे.

पायांना भक्कम आधार हवा, 

पोट आणि ताटात *सुरक्षित अंतर ठेवा* 

हे वाक्य विसरले जाऊ नये की झाले.
वैद्य सुविनय दामले.

कुडाळ सिंधुदुर्ग  9673938021.

21.09.2016

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s