Ayurved · Health

​#सामान्य_आयुर्वेद

​#सामान्य_आयुर्वेद
#Diabetes
प्रमेहाचे जसे दोन प्रकार आहेत तसेच डायबिटीजचे सुद्धा आहेत. प्रकार १ आणि प्रकार २, म्हणजेच Type 1 आणि Type 2. त्यामुळे प्रमेह आणि डायबिटीज कसे सारखेच आहेत असं बऱ्याच जणांचं मत बसेल. साधर्म्य म्हणजे प्रकार १चे रुग्ण हे बऱ्याचदा बारीक असतात आणि प्रकार २चे रुग्ण जाड जूड असतात.
Type 1 हा जन्मतः होणारा, अनुवांशिक किंवा वयाच्या अगदी सुरुवातीच्या वर्षांमधे होणारा प्रकार अाहे. वयाच्या सुरुवातीच्या वर्षांपासून होणारा असल्याने त्या रुग्णांमधे आधीपासूनच पोषणाच्या कमतरतेमुळे रुग्ण बारीकच असतात.
साधारणतः लाईफस्टाईल डिसाॅर्डर म्हणून होणारा जो प्रकार आहे तो दुसरा प्रकार. अंगमेहनतीच्या अभावात आणि जागेवरून न हलता काम करण्याच्या सवयीमुळे ही लाईफस्टाईल डिसाॅर्डर होऊ शकते. यामधे वजन हा सर्वात महत्वाचा भाग असतो. आणि या प्रकारामधे वजन कमी करणे हा चिकित्सेच्या दृष्टीने महत्वाचा भाग असतो. अर्थात तुम्ही जाड असाल तर या प्रकारचा डायबिटीज होणार.
प्रमेहाचं मात्र असं नाही. तू बारीक आहेस आणि तुझ्या घराण्यात कुणाला हा त्रास नव्हता, म्हणून तुला नाही असं गणित नाही. आपल्या देश आणि काळाला अनुसरून कुणी रहात नसेल, योग्य प्रमाणात व योग्य गुणांचा आहार घेत नसेल, योग्य व्यायाम करत नसेल, तर प्रमेह होणारच. मग कुणी बारीक असो वा अनुवांशिकता नसो, प्रमेहासाठी सब बराबर.
Type 1 हा तर जन्मतः होतो, म्हणजे Type 1 ची भिती मला तरी नाही, आणि आपण सडपातळ किंवा जिम मधे जात असल्याने फिट् आहोत, त्यामुळे Type 2 सुद्धा होणार नाही असं समजणारे सावधान. डायबिटीजचे प्रकार जरी तुम्हाला होणार नसले तरी प्रमेहाचे प्रकार होऊ शकतात. जन्मावरून भेदभाव डायबिटीज करत असेल, प्रमेह करत नाही.
©वैद्य अमित पाळ

॥श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद॥

गोमंतक

email- dramitsva@gmail.com

Ph- +919890493371
Vaidya Amit Pal
(लेखक हे मधुमेह आणि संबंधित समस्यांमधील आयुर्वेदीय उपचारतज्ज्ञ आहेत.)

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s