Ayurved · Health

स्वास्थ्याची गुरुकिल्ली —- ऋतुचर्या पालन

​#real_health  #ayurved 
स्वास्थ्याची गुरुकिल्ली —- ऋतुचर्या पालन

 

अन्न ,वस्त्र आणि निवारा ….माणसाच्या या मुलभूत गरजांमध्ये एक मुलभूत गरज add करावी लागेल ती म्हणजे स्वास्थ्य!!!

कारण, अन्नादी तीनही गरजा सध्या सहजपणे पूर्ण होताना दिसतायेत, पण स्वास्थ्य मात्र दुर्मिळ होत चाललेय!
अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्याला आजारातून बरे करण्यास नक्कीच मदत करतेय, पण स्वास्थ्य लाभण्यास नाही!
माणूस हा निसर्ग साखळीतला एक महत्वाचा जीव आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने निसर्गातली प्रत्येक गोष्ट आपल्यात reflect होत असते. निसर्गात जसे ऋतूंचे चक्र चालू असते त्यानुसार सृष्टीत बदल जाणवू लागतात. सहा ऋतूंच्या बदलाची जाणीव आपल्याला शरीर करून देत असतेच. या सर्व ऋतुंनुसार शरीरातील त्रिदोषांच्या ( वात पित्त आणि कफ) अवस्था बदलत असतात. दोषांच्या संचय, प्रकोप,आणि प्रशम या तीनही अवस्था ऋतूनुसार अनुभवण्यास मिळतात.
उदाहरणार्थ ,वर्षा ऋतु म्हणजे पावसाळा  – पित्त  संचायाचा आणि वात प्रकोपाचा  काळ असतो. त्याच्यापुढील ऋतूत म्हणजेच शरद ऋतु ( बोली भाषेत ऑक्टोबर ) पित्ताचा प्रकोपाचा काळ असतो. यानुसार आपल्या शरीरात लक्षणे जाणवू लागतात. अंगावर पित्त उठणे, तहान तहान होणे, डोके दुखीचा त्रास होणे, क्वचित पाळीत अतिरिक्त राज:स्त्राव  (ब्लीडींग) होणे, घुळणा फुटणे, उष्णतेचे इतर काही विकार होणे ….हि सगळी लक्षणे पित्ताच्या प्रकोपाची असतात. शरीर  INTEL INSIDE असल्यामुळे आत चालणाऱ्या घडामोडी वेगवेगळ्या लक्षणाच्या रुपात आपल्याला लक्षात आणून देत असते. याच पद्धतीने इतर सर्व ऋतूत दोषांच्या अनुषंगाने घडामोडी चालू असतात.

 

हे साचलेले दोष अनेक आजारांसाठी कारणीभूत असतात. यांना वेळीच बाहेर जर काढले नाही तर स्वास्थ्य लाभण्यास अडचणी निर्माण होतात. याच साठी आयुर्वेदात “शमन” चिकित्सेबरोबरच “शोधन” चिकित्साही सांगितली आहे. त्या त्या ऋतूत साचणाऱ्या अथवा प्रकोप अवस्थेत असणाऱ्या दोषांना त्या त्या अवस्थेत बाहेर काढणे स्वास्थ्यासाठी आवश्यक असते. 
स्वस्थ राहण्यासाठी जशी दिनचर्या आवश्यक आहे, तशीच ऋतु चर्या देखील! ऋतु बदलला की त्या त्या ऋतु नुसार आपला आहार आणि इतर गोष्टीत बदल करणे आवश्यक असते. काही कारणास्तव या मुलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होते आणि आजारपणाचा पाया इथूनच घातला जातो. 
ऋतुचर्या पालनात आहार विहार यांच्या बदलासोबत आवश्यक असते, त्या त्या ऋतूत साचणाऱ्या अथवा प्रकोप करणाऱ्या दोषांचे शोधन! 
सध्या शरद ऋतु सुरु होणार आहे. या काळात शरीरात साचलेली उष्णता “विरेचन “ या शोधन चिकित्सेद्वारे शरीराबाहेर काढून स्वस्थ राहण्यासाठी शरीराला मदत करा.

यासाठी आपल्या भागातील उत्तम आयुर्वेद तज्ञांकडून या विषयी मार्गदर्शन घेऊन, आपल्या प्रकृतीनुसार आणि निदानानुसार स्नेहपान युक्त विधिवत विरेचन करण्यास प्राधान्य द्या!
©वैद्य ज्योत्स्ना पेठकर 

९७६४९९५५१७ 

परिवर्तन आयुर्वेद

सुख प्रसव आणि संगोपन

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s