Ayurved · Health

आजची आरोग्यटीप

​🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

   आजची आरोग्यटीप 18.09.16

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

            

            *आहाररहस्य.*
 *जेवणाची बैठक कोणती ?भाग 2*
 पुरूषांनी दोन्ही पाय दुमडून  जेवायला बसायचे. तर महिलांनी ? 

त्यांनी जेवायला बसताना दोन्ही पाय दुमडून उकीडवे बसायचे नाही. तर उजवा पाय गुडघ्यातून आडवा दुमडून घेत, जमिनीला समांतर ठेवत, त्याच्यावर डावा पाय उभा दुमडून  पोटाकडे घेत जेवायला बसावे. 
आजही अनेक घरातील आज्ज्या याच पद्धतीने बसतात. केवळ जेवायलाच नव्हे तर केव्हाही. *बसायचं* म्हटलं की, उजव्या पायाची मांडी घालून डावा पाय गुडघ्यातून दुडुन काटकोनात सरळ. आणि पुनः डाव्या हाताने डावा उभा पाय घट्ट आवळून धरायचा.
मग ते वाती वळायला असो, किंवा दळण दळायला, तांदुळ निवडायला असो वा भाजी नीट करायला, मुलांचा अभ्यास घ्यायला असो वा नामजप करायला, धार्मिक कार्य असो वा *वो चार दिन* ! 

आसन मांडी एकच.
आज *वागणंच* एवढं *सैल* झालं आहे की,

 ” *बसणं* जरा *सैल* केलं, तर काय एवढं बिघडलं ? ” असं,  फक्त मांड्या घट्ट आवळून घेणारी (काही वेळा तर पायाकडील रक्तपुरवठाच कमी करणारी ) टाईट्ट जीन्स घालून, खुर्चीवर बसून, पाय अधांतरी हलवत, शरीराला झुलवत विचारणार्‍या, काही कमी नाहीत.

 

स्त्री पुरूष समानतेच्या काळात असं लिहिणं आणि विचार करणं देखील समस्त स्त्री वर्गावर अन्याय्य आहे, समस्त स्त्री वर्गाला आणि पुरोगामी  महाराष्ट्राला हे अपमानास्पद आहे. तीव्र शब्दात आम्ही याचा निषेध करतो. असं म्हणणाऱ्यांनी फक्त एक दोन गोष्टींचा जरूर विचार करावा, की, 

गेल्या तीस चाळीस वर्षांत स्त्रीयांची जाडी, पुरूषांच्या तुलनेत, वाढली की कमी झाली ? आणि,

स्त्रीविशिष्ट आजार वाढले की कमी झाले ? 
……नक्कीच वाढलेले आहेत.

…..जाडी वाढलेली आहे. 

… .वागण्यातला सैलपणा ( की सैराटपणा ? ) वाढलेला आहे. 
आसन मांडी बदलणे, हे त्यातील एक कारण असावे.
असं *घट्ट* बसल्याने गर्भाशय, मूत्राशय, पक्वाशय, डावी किडनी, डिसेंडींग कोलोन, स्वादुपिंड, प्लीहा, आमाशय, ह्रदय, डावे फुफ्फुस आणि पूर्ण पाठीचा कणा हे सगळं पोट, आतून एवढं आवळून घेतलं जाई, की, पोटाची काय हिम्मत होईल, …. बाहेर यायची ?
वैद्य सुविनय दामले.

कुडाळ सिंधुदुर्ग  9673938021.

18.09.2016

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s