Ayurved · Health

​घरगुती उपचार आणि आयुर्वेद —–BREAK THE IMAGE 

​घरगुती उपचार आणि आयुर्वेद —–BREAK THE IMAGE 
आयुर्वेद शिकत असताना म्हणजे विद्यार्थी दशेत देखील “आयुर्वेद शिकतेय ? मग ****** यावर काहीतरी घरगुती उपचार सांग न” किंवा अमुक एका आजारासाठी हे घेऊन बघू का असेही प्रश्न येतात .अगदी  वैद्य होऊन क्लिनिक थाटून बसल्यावर देखील असे प्रश्न सुरुवातीला यायचेत. एव्हढेच काय कधीकाळी १० वी त विभक्त झालेल्या मैत्रिणी अचानक भेटल्या तरी विचारतात  “ए तु आयुर्वेदिक डॉक्टर आहेस ना, THYROID वर काहीतरी घरगुती  उपाय सांग ना” ……तळ पायाची आग मस्तकात जाते अशा वेळी! आज इतकी वर्षे  आम्ही वैद्यगण प्रयत्न करतोय “घरगुती” अथवा “घरेलू” या लेबल मधून आयुर्वेदाला बाहेर काढण्याचे त्यात या अशा  “घरेलू नुस्के” या मुळे आयुर्वेदाची प्रतिमा शास्त्र म्हणून नाही तर घरगुती उपचार अशी होतेय.

 

आता  ब्लड प्रेशर हा विषय काही शिंका येण्या इतका सोपा आहे का? घरगुती उपचार सांगायला? प्रत्येक रुग्णात उच्च रक्त दाबाचा  हेतू, आणि संप्राप्ती वेगवेगळी असू शकते.
यासाठी तुम्ही आदर्श दिनचर्या ऋतुचर्या याविषयी मार्गदर्शन केले असते तरी चालले असते. सरसकट सगळ्यांसाठी एक उपाय कसा काय लागू होईल बरे? आता लगेच काही लोक आक्षेप घेतील की उपाय सांगण्यात काय गैर आहे?  अशा post  वाचून बरेच followers इतर औषधांबरोबर असे  सोप्पे घरेलू उपचार करण्यास प्राधान्य देत असतील. किंवा फक्त tomato खाऊनही प्रयोग करत असतील ! जेव्हा अति त्रास झाला आणि इतर तज्ञांकडे जावेच लागते त्यावेळी असे घरेलू नुस्के तिथे चर्चिले गेले तर तिथे इज्जत निघते “आयुर्वेद शास्त्राची!”  कारण उपाय सुचवणारे idol हे आयुर्वेद तज्ञ आहेत!
कदाचित आचार्यांचा असा विशिष्ठ अभ्यासही अथवा संशोधन  याबाबत झालेले असेल ,तरीही माझ्यातल्या वैद्याला याचा कार्यकारण भाव काही समजत नाहीये. सैंधव आणि आम्ल रस अनुलोमन करतील इथ पर्यंत माझ्या अल्पमतीला कळतेय.पण सरसकट सगळ्यांना लागू  पडेल असा उपचार? नक्कीच नाही ! वाताचे अनुलोमन हे सुद्धा प्रत्येक रुग्ण परत्वे कसे करायचे हा भाग एक वैद्यच ठरवू शकेल! 
आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे असे  “घरेलू उपचार” का सुचवायचे?

आजी बाईचा बटवा हि concept वेगळी आणि  विविध व्याधींच्या मुळाशी जाऊन चिकित्सा करणे वेगळे !

असे घरगुती उपाय करण्याआधी आपल्या नजीकच्या वैद्यांचा सल्ला जरूर घ्या, तुमच्या व्याधीला,प्रकृतीला अनुसरून असे उपचार योग्य असतील तरच प्रयोग करून बघा!!
I object this type of  “घरेलू उपचार” which are far away from basic principles of Ayurved treatment!
वैद्य ज्योत्स्ना पेठकर

परिवर्तन आयुर्वेद 

सुख प्रसव आणि संगोपन 

९७६४९९५५१७

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s