Ayurved · Health

वातव्याधि मधील पथ्य/अपथ्य

​#AyurSwasthya
वातव्याधि मधील पथ्य/अपथ्य

 

   ज्यांची वात प्रकृती आहे/वाताचा त्रास असेल म्हणजेच सांधे (घोटा, गुडघा, कमर, पाठ, मान, खांदा, कोपर, मनगट सारखे इतर सांधे) दुखणे, कुठचेही कार्य करण्यात असमर्थता/कष्ट होणे, हातापायात मुंग्या येणे या सारख्या तक्रारी असतील तर आहाराच्या (खाणे, पिणे) व विहाराच्या (कार्य करणे जसे कि प्रवास, पोहणे इतर) दृष्टीने आपल्या शरीराला काय पथ्य(हितकर) व अपथ्य(अहितकर) आहे हे कळाले पाहिजे. औषधी चिकित्सा नंतर. अगोदर आपण जे दिनचर्येत(दिवसभरात जे काही उपक्रम होतात, सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत सर्वच) करतो त्यावरच आपल्या रोगांची स्थिती अवलंबून असते म्हणजेच एखादा आजार होणे किंवा न होणे.
   वात प्रकृतीच्या लोकांनी आहारात तेल किंवा तूप वापरावे ते सुद्धा कच्चा स्वरूपातच. तळून वा परतून नव्हे. पोळी, भाकरी, दुध, साखर, गूळ, ताक, लिंबू, चिंच, सुखामेवा, सरबते, नारळाचे पाणी, मुरंबा, मिठाई, खवा, मटन, अंडी हे खावे/ह्यांचा आहारात उपयोग असावा. गरम/कोमट करूनच खावे/प्यावे.
   वाटाणे, बटाटा, बेसन, मिरच्या, मसाल्याचे(तिखट, कडू पदार्थ), चटण्या, कोरडे पदार्थ हे अतिप्रमाणात खाणे टाळावेत. थंड पदार्थ/ गार जेवण, शीतपेये, अवेळी जेवण, उपाशी राहणे, भुकेपेक्षा कमी खाणे हे करू नये.
   विहारात व्यायाम करावा पण तो ही झेपेल एवढाच. कानात, नाकात, डोक्यावर किंचित कोमट तेल घालणे, अंगाला-तळपायाला तेल लावणे(अभ्यंग), गरम पाण्याने आंघोळ करणे इतर.
   अति श्रम करू नये, गार वारा(AC/पंखा/प्रवास), गार पाणी यांचा अतिवापर टाळावा. रात्रीचे जागरण, खूप चालणे/धावणे, दगदग करणे, वजन उचलणे, प्राण्यांच्या वर बसून प्रवास हे शक्यतो कमीच करावे.
     ह्याचा अर्थ असा नव्हे कि वाताचा त्रास फक्त वात प्रकृतीच्या व्यक्तींनाच होतो. इतर ही प्रकृतींच्या(पित्त, कफ सारख्या) व्यक्तींना वाताचे त्रास होतात. म्हणूनच काळजी घेणे उत्तम. वरील उल्लेखित पथ्य अपथ्य फक्त आपल्या स्वास्थ्याची काळजी घेण्यासाठी आहे कारण वाताचे भरपूर प्रकार आहेत आणि प्रत्त्येकाची औषधी चिकित्सा हि निरनिराळी, जी वैद्यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावी.   
© DrSuraj Patlekar, MS(Ayu)

Shree Vyankatesh Aayurved

Margao, Goa
(लेखक हे योगासनातील तज्ञ तसेच मणक्याचे विकार/ सांधेदुखी अश्या वातांच्या विकारांवरील आयुर्वेदीय उपचार तज्ञ आहेत).

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s